हमीद दलवाई - लेख सूची

इमान

पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्या.मू. महंमद मुनीर आणि न्या.मू. कयानी यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे ? सर्वांनी …

हिंदू-मुस्लिम सहजीवन

‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र आता उलट फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही. ही आठ कोटी माणसे आपण काही समुद्रात बुडवू शकत नाही. …

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा भारतातील मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हिंदु जातीयवादाचा विचार करावयाला हवा. पण माझे मत असे आहे की हिंदु जातीयवाद हा मूलतः मुस्लिम जातीयवादाला प्रत्युत्तर देण्याच्या स्वरूपात आपल्या देशात निर्माण झाला आहे. हिंदु जातीयवाद असण्याची कारणे नष्ट करा – थोडक्यात मुस्लिम जातीयवाद नष्ट करा – आपल्याला या देशात मूठभरदेखील प्रभावी हिंदु जातीयवादी आढळणार …

मुस्लिम जातीयवादाचे आव्हान हे आहे

हिंदू-मुस्लिम संघर्ष खरा दोन मनांमधील प्रवृत्तींचा आहे…. मुस्लिम मन हे स्वभावतः विस्तारवादी आहे, कारण ते धर्मविस्तारवादी आहे. हिंदू हा बंधनवादी आहे. सीमा ओलांडावयाच्या नाहीत हा त्याने स्वतःवर घालून घेतलेला नियम….. तेव्हा हिंदू पुरेसा चैतन्यशील होण्यावर हिंदू-मुस्लिम संबंधाचे स्वरूप अवलंबून आहे…. ही चैतन्यशीलता येणे आणि मनाचा समतोलपणा साध्य होणे हे मुस्लिम राजकारणाचे आव्हान स्वीकारण्याचे खरे दोन …