सामाजिक सुरक्षाः अमेरिकन अनुभव - लेख सूची

सामाजिक सुरक्षाः अमेरिकन अनुभव (भाग १)

‘औद्योगिक क्रांती’ ही प्रक्रिया युरोपात सुरू झाली. अनेक वर्षे मुरत असलेले, पिकत असलेले घटक एकत्र होऊ लागले, आणि पारंपरिक शेती-बलुतेदारी जीवनशैलीने जगणाऱ्यांचे समाजातील प्रमाण कमी होऊ लागले. मुख्य फरक होता ऊर्जेच्या स्रोतांत. तोवर शेती व तिच्याशी संबंधित उद्योगांमध्ये मुख्यतः माणसे आणि जनावरे यांच्या स्नायूंची ऊर्जा वापरली जात असे. नव्या जीवनशैलीत इंधनाची ऊर्जा वापरून यंत्रे काम …

सामाजिक सुरक्षा: अमेरिकन अनुभव (भाग २)

शेतीकडून माणसे उद्योगांकडे वळली, की बहुतांश लोकांचे आणि सर्वच श्रमिकांचे आयुष्य अनिश्चित होते. कधी जिथे काम करायचे तिथली परिस्थिती धोके उत्पन्न करते, अपंगत्व उत्पन्न करते, तर वयोमानाने किंवा इतर स्वस्त कामगार उपलब्ध झाल्याने नोकरी जाऊन उत्पन्नच थांबते. कधी याहीपुढचा प्रकार होऊन कारखाने बंद पडतात म्हणून श्रमिक बेकार होतात. या सर्व बेकारीच्या कारणांमध्ये कामगाराचा दोष नगण्य …

सामाजिक सुरक्षा: अमेरिकन अनुभव (भाग ३)

“सव्वीस वर्षांपूर्वी या देशाने सर्व श्रमिक आणि त्यांची कुटुंबे यांना निवृत्ती, मृत्यू, बेरोजगारीमुळे बुडणाऱ्या निर्वाहवेतनाच्या भीतीपासून मुक्त करण्याचे तत्त्व मान्य केले. पण आजही वार्धक्यातल्या आजारपणाच्या खर्चापासूनचे संरक्षण फार थोड्या श्रीमंतांनाच उपलब्ध आहे. ही मोठीच त्रुटी आहे.” हा आहे जॉन केनेडी,१९६१ साली काँग्रेसपुढे अध्यक्षीय भाषण करताना. अमेरिकन मेडिकल असोसिएशन (अचअ), चेंबर ऑफ कॉमर्स, नॅशनल असोसिएशन ऑफ …