मासिक संग्रह: ऑगस्ट, १९९२

पत्रव्यवहार

प्रा. काशीकर ज्या स्टीफन हॉकिंगचे संदर्भ देतात त्या (आजचा सुधारक, मे-जून ९२) प्रोफेसर हॉकिंग यांचेबद्दल थोडी अधिक माहिती वाचकांना नसल्यास करून द्यावीशी वाटते. डॉ. स्टीफन हॉकिंग (वय वर्षे ५०) हे केंब्रिज विद्यापीठात थिऑरेटिकल फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड व नंतर केंब्रिज विद्यापीठात झाले व वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी १९६६ मध्ये “Universe could have sprung from a singularity, and there is a singularity in our past” हा विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीआपला Ph.D. चा प्रबंध मांडला व तो सर्वमान्यही झाला.
वयाच्या २१ व्या वर्षापासून हॉकिंग यांना ‘अ-मायोट्रॉफिक स्क्लरोसिस’ या भयानक रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसू लागली.

पुढे वाचा

चर्चा-केशवराव जोशी यांच्या पत्रास उत्तर

श्री. केशवराव जोशी यांचा मी आभारी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव मी उल्लेख केलेल्या नामवलीत घेणे शक्य होते. पं. नेहरूंनी, सावरकरांप्रमाणे, जाणीवपूर्वक समाजसुधारणेचे कार्य केले असे म्हणता येणार नाही. जसे रानड्यांचे शिष्य नामदार गोखले यांनीही केले नाही. पण या दोघांचेही जीवन व कार्य सामाजिक सुधारणांना उपकारक ठरले. पं. नेहरू दीर्घकाळ पंतप्रधान नसते तर केंद्रशासनाचे वळण जेवढे सुधारणांना अनुकूल राहिले तेवढेही राहिले नसते हे अगदी शक्य आहे.
मला जो मुद्दा करावयाचा होता त्या दृष्टीने सावरकरांचे नाव तेथे घेणे आवश्यकचहोते असे मात्र नाही.

पुढे वाचा

ग्रामीण महिलांच्या गंभीर लैंगिक व मानसिक समस्या

आरोग्यसेवेचे फायदे घेण्यासाठी स्त्रिया पुढे येऊ शकत नाहीत यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही. भारतीय आरोग्यसेवा पद्धतीत स्त्रीला फक्त माता किंवा भावी माता एवढ्याच स्वरूपात स्थान दिले जाते. ही या पद्धतीतील महत्त्वाची त्रुटी आहे. ही विचारसरणी जनारोग्य चळवळीतील पुरोगामी व्यक्तींनीसुद्धा कमी अधिक प्रमाणात स्वीकारलेली आढळून येते. माता-आरोग्य-संवर्धन या कार्यक्रमाचे फायदे गरीब, कामकरी महिलांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांप्रर्यंत परिणामकारक रीत्या पोहचू शकत नाहीत.
सार्वजनिक आरोग्य सेवेत, स्त्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने, महिला आरोग्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. जननक्षमता, तसेच अपत्यजन्माशी थेट संबंध नसलेले प्रश्न, सोयिस्करपणे वळचणीला टाकले जातात.

पुढे वाचा

शेअर बाजारातील अभूतपूर्व घोटाळा

गेल्या काही महिन्यांत शेअरबाजारातील व बँकांसारख्या वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहारांसंबंधीच्या बातम्यांनी खळबळ माजली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणून ह्याची नोंद केली जाईल असे म्हटले जाते. ‘शेअर बाजारातील महाबेलाचा धुमाकूळ’ इ. मथळ्यांखाली हर्षद मेहता, त्याचे साथीदार व काही अग्रगण्य देशी व विदेशी बँका यांच्या गैरव्यवहारासंबंधी वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. ह्या बातम्यांनी सर्वसामान्य माणूस संभ्रमित झालेला दिसतो. ह्या प्रकरणातील आर्थिक व्यवहार बरेच गुंतागुतीचे आहेत. तरी पण या घोटाळ्याची स्थूल मानाने कल्पना यावी या उद्देशाने केलेला हा लेखनप्रपंच.

पुढे वाचा

उपेक्षा लोकहितवादींची

महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ (इ.स. १८३२) या साप्ताहिकाच्या आरंभापासून झाला असे म्हणता येईल. परंतु सामाजिक सुधारणेला पोषक व प्रेरक असे साहित्य ‘प्रभाकर’ पत्रातून १८४६ सालापासून ‘शतपत्रां’च्या रूपाने महाराष्ट्राला दिले ते लोकहितवादी यांनीच. त्याच वर्षी पुण्यात पहिली मुलींची शाळाकाढून म. जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षात सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. पेशवाईच्या अस्तानंतर केवळ तीस वर्षांच्या कालावधीत हे सारे घडून आले. इंग्रजी राज्य हे शाप की वरदान याचा निर्णय होण्यापूर्वीच हे घडून गेले. या परिवर्तनाची कल्पना व योजना ज्या त्रिमूर्तीनी केली ते तिघेही तरुण होते.

पुढे वाचा

डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या आक्षेपांविषयी

माझ्या ‘गीतेतील नीतिशास्त्र या लेखावर डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. (आजचा सुधारक, मे-जून ९२, पृ. ८५) त्यांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. त्यांचा पहिला मुद्दा असा आहे.‘गीतेचे विवेचन महाभारताच्या पाश्र्वभूमीचा विचार केल्याशिवाय योग्य रीतीने होऊ शकत नाही. गीतेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर नाही असे प्रा. देशपांडे म्हणतात. या आरोपाची चिकित्सा करण्यासाठी अर्जुनाचा प्रश्न काय होता हे समजून घेतले पाहिजे. ‘कर्तव्य कोणते हे कसे ठरवावे?’ आणि ‘ युद्ध न्याय्य की अन्याय्य याचा निकष कोणता?’ या मूलभूत प्रश्नांची चर्चा महाभारतात इतरत्र आलेली आहे व गीतेच्या नीतिशास्त्रविषयक विचारात ती गृहीत धरलेली आहे.’

पुढे वाचा

ऐहिक सुख

आपण ज्या जगात जन्मलो, त्याची स्थिती सर्वांना शक्य तितकी सुखदायक व्हावी, अशीच खटपट सर्वांनी केली पाहिजे, व त्यांत ऐहिक सुखाचा विचार झाला पाहिजे, ही बुद्धिवाद्यांची भूमिका आहे. आज हिंदुस्थानाला आध्यात्मिक आढ्यतेने ग्रासले आहे. आम्ही सर्व जगाला धडे देऊ ही भूमिका केवळ घमेंडीची आहे, तींत बिलकुल तथ्य नाही. जेथे आम्हांलाच काही येत नाही, तेथे आम्ही लोकांना काय शिकवणार?शास्त्रीय ज्ञानांत आघाडी मारली तरच लोकांना काही शिकवता येईल, एरवी नाही. अध्यात्म हा कल्पनेचा खेळ आहे, त्याचा व्यावहारिक उपयोग बिलकुल नाही. प्रजोत्पत्तीच्या बाबतीत सर्व जगाने संयुक्त धोरण आंखणे जरूर आहे, त्यात आपल्यापुरताच विचार कोणीही करता नये.

पुढे वाचा