मासिक संग्रह: एप्रिल, १९९४

सातार्‍याचे विचारवेध संमेलन

साताऱ्याला जायची फार दिवसांची इच्छा होती. परवा अचानक योग आला. ‘विचार करू शकणाच्या माणसांची मतं बनविण्याची प्रक्रिया निर्दोष व्हावी, यासाठी सातार्‍याला चार मित्रांनी एक धडपड सुरू केली आहे. समाजपरिवर्तनाचे काम ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धम्‍’ या कोटीचे असते. या मित्रांनी त्या कामासाठी एक मंडळ स्थापन केले. त्याला ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी’ असे नाव दिले. विसाव्या शतकातील वैचारिक घडामोडींचा वेध अकादमीने घ्यायचे ठरवले. त्यातून हे विचारवेध संमेलन आकाराला आले. विषयधर्मजिज्ञासा. या शतकात आपल्या देशात धर्माच्या नावावर मोठमोठे उत्पात घडले. देश दुभंगला. लक्षावधींचे प्राण, वित्त आणि अब्रू लुटली गेली.

पुढे वाचा

नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भात कर्मचारी संघटनांकडे दृष्टिक्षेप

नवीन आर्थिक धोरणांच्या संदर्भात भारतीय कर्मचार्‍यांच्या संघटनांचे धोरण विरोधी व स्वार्थी आहे. उदाहरणार्थ भारतातील ५४,००० (यांपैकी केवळ १०० शाखा बंद झाल्या तरी) ५३,९०० राष्ट्रीयीकृत बँक शाखांतील अवाढव्य (बहुधा २० लाख) कर्मचारीवर्ग थोडेसे अपवाद वगळता, रा. स्व. संघ व भा.ज.प. मनोवृत्तीचा आहे व त्यांच्या संघटनाही त्याच मनोवृत्तीच्या असतात. ह्या कर्मचार्‍यांची वृत्ती कशाप्रकारची आहे? रशियात सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण होत आहे म्हणून टाळ्या पिटायच्या व भारतातील खाजगीकरणाविरुद्ध प्राणपणाने लढा देण्याची भाषा करायची! बँक कर्मचारी व त्यांच्या संघटनांप्रमाणेच, त्यांचेच सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायबंधू व त्यांच्या संघटना उदाहरणार्थ आयुर्विमा, राज्य परिवहन, विद्युत मंडळ, इत्यादि बँक कर्मचार्‍यांचाच कित्ता गिरवतात.

पुढे वाचा

डॉ. भीमराव गस्ती – एक व्रतस्थ जीवन

‘चोर-दरवडेखोर’ अशी मुद्रा धारण करणार्‍या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशातील बेरड-रामोशी जमातीत जन्माला आलेला एक कर्तृत्ववान माणूस – भीमराव गस्ती. उच्चभ्रू सभ्य समाजाच्या कुत्सित निंदेचे विषारी बाण सहन करीत केवळ जिद्द आणि कष्ट यांच्या भरंवशावर अत्युच्च शिक्षण घेऊन एक उच्च विद्याविभूषित शास्त्रवेत्ता झाला, केमिस्ट्रीत पीएच्.डी. ही अत्युच्च पदवी मिळविली. मनात आणले असते तर इतर विद्याविभूषितांसारखेच डॉ. गस्तींनाही सुखासमाधानाचे पांढरपेशी जीवन जगता आले असते. पण आपली आरामाची सरकारी नोकरी सोडून देऊन आपल्या बेरड-रामोशी जमातीच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येणारा छळ, निंदा, मनस्ताप वगैरे सर्व निमूटपणे सहन करून डॉ.

पुढे वाचा

गांधींचे ‘सत्य’

सत्य आणि अहिंसा हे गांधींच्या तत्त्वज्ञानाचे प्रमुख आधारस्तंभ होते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांपैकी अहिंसा म्हणजे काय? ‘अहिंसा’ या शब्दाने त्यांना नेमके काय अभिप्रेत होते? या प्रश्नाला बरेच निश्चित उत्तर त्यांच्या लिखाणात सापडते. परंतु ‘सत्य’ म्हणजे काय? हे मात्र मोठ्या प्रमाणात गूढच राहते. त्यांचे लिखाण काळजीपूर्वक वाचूनही त्यांना अभिप्रेत असलेली सत्याची संकल्पना अनाकलनीयच राहते. या लेखात या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.
सत्य, सत् आणि साधु
‘सत्य’ या संस्कृत शब्दाचे, आणि तसेच आपल्या इंग्रजी लिखाणात गांधींनी वापरलेल्या ‘Truth’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.

पुढे वाचा