मासिक संग्रह: मे, 1996

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक यांस
आपल्या मार्च १९९६ च्या अंकात प्रा. मधुकर देशपांडे ह्यांचे पत्र आले आहे. त्याविषयी मला काही खुलासा करावयाचा आहे.
(१)३९४ पानावरील त्यांच्या तिसर्याम परिच्छेदाशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्त्रीपुरुषांची लैंगिक गरज कमीजास्त कशीही असो, लैंगिक स्वायत्तता दोघांनाही सारख्या प्रमाणात असावी असेच माझे मत आहे.
(२)आता कुटुंब : आजचे आणि उद्याचे ह्यासंबंधी.
‘पाश्चात्त्य कुटुंबात मुले एकदा आईपासून सुटी झाली की ती पूर्ण बिरादरीची होतात’ हे माझे विधान अतिव्याप्त आहे ह्यात संशय नाही.
मी हे विधान मुख्यत: भारतीय आईबापांच्या तीन जबाबदार्यांदच्या संदर्भात केले होते.

पुढे वाचा

हवाला-एक कूटप्रश्न

‘हवाला’ या शब्दाने सध्या आपल्या देशात प्रचंड खळबळ माजविली आहे. सुरेन्द्र जैन हवाला एजंट आहेत आणि उद्योगपतीही. त्यांच्या घरावर सी.बी.आय्. ने टाकलेल्याधाडीत एक डायरी सापडली, तिच्यात मोठमोठे राजकीय नेते आणि बडे नोकरशहा यांमा दिलेल्या रकमांच्या नोंदी सापडल्या. त्यामुळे हे राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष संशयाच्या भोवर्यालत सापडले आहेत. सामान्य जनतेच्या मनात या नेत्यांबद्दल नाराजी आणि खरे काय प्रकरण आहे याबद्दल कुतूहल वाढले आहे.
‘हवाला’ हा शब्द परकीय चलनाच्या बेकायदेशीर विनिमय व्यवहाराशी संबधित आहे. हा व्यवहार फेरा (FERA) कायद्याचे उल्लंघन करणारा आहे.

पुढे वाचा

हिंदू व हिंदुत्व

आजचा सुधारकच्या ऑक्टोबर व डिसेंबर ९५ च्या अंकात प्रा. ह. चं. घोंगे यांनी ‘हिदुत्व अन्वेषण’ या शीर्षकाने हिंदू व हिंदुत्व या विषयी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांतील काही बाबी प्रातिनिधिक समजून त्यांचा परामर्श घेतला जात आहे.
संस्कृत कोषातील हिंदू व हिंदुधर्म याविषयी उपलब्ध माहिती
आपट्यांचा प्रसिद्ध संस्कृत-इंग्रजी शब्दकोष जरी वाचण्याचे थोडे कष्ट घेतले तर हिंदु शब्दापुढे पुढील विपुल माहिती आढळते.
(१)हिंदु शब्दाचा उल्लेख कालिका पुराणात आढळतो. उद्धरण असे आहे:
कलिना बलिना नूनमधर्माकालिते कलौ।
यवनैर्घोरमाक्रान्ता हिन्दवो विन्ध्यमाविशन्।।
“बलशाली कलीने कलियुगात अधर्माचा हैदोस माजवला असताना यवनांच्या भयंकर आक्रमणाने त्रस्त हिंदू विंध्य पर्वताच्या प्रदेशात शिरले.”

पुढे वाचा

एक नियंत्रित प्रयोग

डॉ. रिचर्ड क्लार्क कॅबट (१८६८-१९३९) हे हार्वर्ड विद्यापीठात एकाच वेळी निदानीय वैद्यकशास्त्र (Clinical Medicine) आणि सामाजिक नीतिशास्त्र (Social Ethics) या दोन्ही विभागांचे प्राध्यापक होते. त्यांना गुन्हेगारीकडे कल असणाच्या तरुणांनासुधारावे’ असे वाटत असे. त्यांचे असे मत होते की अशा माणसांशी कोणीतरी खूप परिचित व्हावे. हा परिचय मैत्रीच्या पातळीवर आणि खूप सखोल असावा. याने गुन्हेगारी कलाच्या तरुणांना तर फायदा होईलच, पण असा मैत्रीपूर्ण परिचय करून घेणार्यांरचे स्वत:बद्दल आणि भोवतालच्या विश्वाबद्दलचे आकलनही जास्त सखोल होईल.
हे विचार नीतिशास्त्रज्ञाला साजेसेच होते, आणि सोबत डॉ. कॅबट यांच्या वैद्यकशास्त्राचा मूर्त ज्ञानशाखेचा अनुभवही होता.

पुढे वाचा

यांत्रिक (कृत्रिम) बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता उपयुक्त की भावना या वादात अलीकडे भावनिक गुणवत्तेचे पारडे जड झाल्यासारखे दिसते आहे (आजचा सुधारक ६ : ३९९). केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून असलेली मानवाची बरीच कठीण कामे, आता यंत्राद्वारे पार पाडण्याच्या उद्देशाने अनेक वैज्ञानिक कठोर परिश्रम करीत आहेत. यांत्रिक अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence = AI) नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेच्या स्तरावर नेण्याचे प्रयत्न गेल्या चाळीस वर्षांपासून होत आहेत. अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांतून याविषयी संशोधनअध्यापन होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानियातील मूर स्कूल ऑफ इंजिनियरिंगमधील डॉ. अरविंद जोशी हे १९७० च्या दशकात या विषयाचे प्रमुख होते व मौखिक भाषेचे संगणकाच्या भाषेत तात्काळ रूपांतर करण्याचे प्रयोग ते करीत होते.

पुढे वाचा

“हट्ट”

आनंद दत्तात्रय मुठे हट्टी होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं आईपाशी हट्ट धरला, ‘खर्यारखुर्याह’ क्रिकेट बॅटसाठी. आई म्हणाली, “चारशेची आहे ती! चल, हट्ट न करता शहाण्या मुलासारखी दहा रुपयेवाली फूटपाथवरची बॅट घे.’ आनंद ऐकेना, म्हणाला, “मी श्वास कोंडून धरणार, खरीखुरी बँट मिळेपर्यंत’. दम कोंडून तो लालनिळा झाला, पण बॅट मिळाली.
पंधरा वर्षाचा असताना त्यानं व्हिडिओ गेम सिस्टिम’ साठी हट्ट धरला. मोठा भाऊ म्हणाला, चार हजाराचा आहे तो! चल, हट्ट न करता शहाण्यासारखा शंभर रुपयांचा ‘लोगो’ घे.’ आनंद ऐकेना. म्हणाला, “मी अभ्यासच करणार नाही.

पुढे वाचा

काम आणि नीती

कामव्यवहार आणि नीती यांचा परस्परसंबंध काय आहे?
सामान्यपणे असे मानले जाते की नीतीचे क्षेत्र मुख्यत: कामव्यवहाराचे आहे आणि या क्षेत्रात नीती म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कामव्यवहार विवाहांतर्गत होत राहणे म्हणजे नीती, आणि विवाहबाह्य कामव्यवहार म्हणजे अनीती अशी स्वच्छ समीकरणे याबाबतीत आहेत. एखादा पुरुष, त्यातही एखादी स्त्री, अनीतिमान आहे असे कोणी म्हणाले तर त्यांचे विवाहबाह्य लैंगिक संबंध आहेत असे अनुमान काढले जाते, आणि ते बरोबर असते.
परंतु वस्तुत: नीतीचे क्षेत्र कामक्षेत्रापेक्षा कितीतरी व्यापक आहे. चोरी, दरवडे, खून, मारामाच्या, फसविणे, नफेखोरी, काळाबाजार, गरिबांना, अशक्तांना, निराधारांना लुबाडणे, त्यांच्या मेहनतीवर पैसे मिळविणे, वेठबिगारी हे सर्व अनीतीचे भयानक प्रकार आहेत.

पुढे वाचा

अधर्म कशाला म्हणावे?

अनेकदा व्यक्त केली जाणारी ‘सर्वांनी सुखी असावे, कोणी दुःखी असू नये’ ही अपेक्षा उदात्तच आहे. परंतु जगात सहसा असे असत नाही. काही जण सुखी झाले, तर काही जणांच्या वाट्याला दुःख येतेच. ज्याच्या वाट्याला दुःख असेल त्याला धीर देणे, दिलासा देणे व त्याचे दुःख हलके किंवा दूर करण्याचा प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हाती असते. ते केले नाही, तरी त्याच्या दुःखाने दुःखी होऊन त्याच्याशी समरस होणे शक्य असते. त्याच्या दुःखामध्ये आनंद किंवा त्याउलट त्याच्या सुखामध्ये दुःख मानणे ही मात्र विकृती आणि अशी विकृती तो मनुष्य दुसर्याय, विशिष्ट धर्माचा असल्यामुळे आपल्या मनात निर्माण होत असेल तर अशा विकृतीला जन्म देणाच्या घटकाला आपणधर्म मानू शकत नाही.

पुढे वाचा