मासिक संग्रह: जून, १९९६

पत्रव्यवहार

सम्पादक, आजचा सुधारक ह्यांस,
आपण आपल्या नियतकालिकाच्या एप्रिल १९९६ च्या अंकात प्रा. स. ह. देशपांडे ह्यांच्या भूमिकेचा जो प्रतिवाद केला आहे त्यासंबंधी काही शंका. ह्या शंकाच आहेत ह्याचा विसर न व्हावा.
(१)“एका बाजूला धर्मसंस्थापक ईश्वर असल्यामुळे…” ह्या शब्दांनी सुरू होणारा तुमचा तर्क घ्या. त्यात ईश्वर व प्रेषित हे शब्द येतात. आता ह्या संज्ञा सेमिटिक धर्मातल्या आहेत; पौर्वात्य धर्मपरंपरात त्या नाहीत, किंवा ईश्वराच्या संकल्पनेत उभय परंपरांत मूलभूतफरक आहे हे लक्षात घेतले तर धर्मसुधारणा अशक्य आहे किंवा तो व्याघात आहे असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरते?

पुढे वाचा

हिंदुत्वः ह. चं. घोंगे यांना उत्तर

एप्रिल १९९६ च्या आजचा सुधारक च्या अंकांत “हिंदुत्व : प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे’ हा श्री. घोंगे यांचा लेख आला आहे. त्याला हे उत्तर आहे.
प्रारंभी ‘‘हिन्दुत्व, अन्वेषण (उत्तरार्ध)” डिसेंबर १९९५ या त्यांच्या लेखातील अवतरणे असून त्या खाली मी फेब्रुवारी १९९६ मधील आजचा सुधारकमधील त्यांना विचारलेले प्रश्न आहेत. त्या खाली एप्रिल १९९६ च्या मासिकांतील श्री. घोंगे यांनी मला विचारलेले प्रश्न आहेत व त्यांना मी दिलेली उत्तरे आहेत.
आरंभीच फेब्रुवारी १९९६ मधील लेखात मी स्पष्टपणे लिहिले होते की, आक्षेप त्यांच्या प्रतिपाद्य विषयाबाबत नसून त्यांत जे ऐतिहासिक उल्लेख आले आहेत त्याबद्दल आहेत.

पुढे वाचा

श्री मधुकर देशपांडे यांच्या पत्राला (मार्च ९६) उत्तर

माझा बडगा फक्त भारतीय व आशियातील पुरुषांवर पडतो व पाश्चात्त्य पुरुष अतिशय उदारमतवादी असतात अशी कुणाची समजूत झाली तर त्यांची मी माफी मागते. स्त्रियांचे स्थान सर्व जगात दुय्यमच आहे. दुय्यमतेच्या पातळीत कमीअधिकपणा आहे एवढेच.
माझ्या मते अमेरिकेत अविवाहित स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे. विवाहपूर्व संबंधांमुळे स्त्रियांची लग्ने अडत नाहीत. बलात्कारित स्त्रियांवर अमेरिकेत कोर्टात अन्यायच होतो.
डोमेस्टिक व्हायोलन्स’मुळे, नवर्याकने, बॉय फ्रेंडने वा घटस्फोटित नवयाने केलेल्या मारहाणीमुळे बॉस्टनच्या परिसरात दर आठवड्याला एक स्त्री मृत्युमुखी पडते.
ज्या समाजात स्त्रिया अधिक प्रमाणात मुक्त आहेत तिथे पुरुष वेश्या असतात.

पुढे वाचा

‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ -काही विचार

प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी आजचा सुधारक, मार्च १९९६ च्या अंकात ‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ ह्या लेखातून प्रस्तुत विषयाची चर्चा पुन्हा उपस्थित केलेली आहे. पुन्हा म्हणण्याचे कारण असे की ह्या विषयाची चर्चा ह्यापूर्वीही केली गेलेली आहे. ह्या विषयाशी सततसंपर्क ठेवणाच्या व्यक्तींना डॉ. प्रदीप गोखले ह्यांच्या परामर्श, नोव्हें. १९८८ मधील ‘तत्त्वज्ञान-एक स्वदेशी विलापिका’ ह्या लेखाची सहज आठवण होईल. ह्या लेखात डॉ. गोखल्यांनी व्यक्त केलेली व्यथा वेगळ्याच प्रकारची आहे. आपल्या विद्यापीठांमधून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान शिकविण्यावर भर दिला जातो. ह्या तत्त्वज्ञानाचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतो.

पुढे वाचा

सामाजिक शास्त्रांच्या अध्यापनातील परंपरानिष्ठता

सांप्रत कला शाखेतील एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे असा अनुभव येऊ लागला आहे. कलाशाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे याचे मुख्य कारण कला शाखेची आवड हे नसून या विषयांत बी. ए., एम्. ए. केल्यावर बी. एड्., एम्. एड्. केले तर शाळेत शिक्षकाची नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे हे होय. कला शाखेत संशोधन करण्याची आवड, हा उद्देश क्वचितच आढळतो आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी काही। नामवंत विद्यापीठातील कला शाखेची स्थिती याला अपवाद आहे. कला शाखेतही तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए., एम्.

पुढे वाचा

अध्यात्म आणि तत्त्वज्ञान

लेखाचे शीर्षक पाहिल्याबरोबर अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान?’ ते उद्गारतील. म्हणजे ती दोन आहेत की काय?आमची तर अशी माहिती आहे की त्या दोन गोष्टी नाहीतच; एकाच गोष्टीची दोन नावे आहेत. आणि अशी समजूत आपल्या समाजात प्रसृत झालेली आहे हे मान्य केले पाहिजे. एखादा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे असे ऐकल्याबरोबर त्यात अध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचा बंध आणि मोक्ष यांविषयी विवेचन असणार हे गृहीत धरले जाते. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तत्त्वज्ञानाची पुस्तके हवीत अशी मागणी केल्याबरोबर विक्रेता आपल्यापुढे अध्यात्माची पुस्तके टाकील हे खरे आहे.

पुढे वाचा

स्वच्छतेसाठी घाणेरडा विषय

रोग्याचे कल्याण चिंतणार्याा खर्यार बैद्याने जसे पाहिजे तसले घाण काम करण्यास तयार असले पाहिजे तसे समाजहितचिंतक सुधारकाने पाहिजे त्या प्रकारचा विषय हाती घेण्यास सिद्ध असले पाहिजे. अमुक वस्तूचे किंवा अमुक अवयवाचे चारचौघात नाव घेणे किंवा त्याला स्पर्श करणे हा असभ्यतेचा किंवा अमंगलपणाचा प्रकार होय असे पाहिजे तर सामान्य लोकांनी मानावे. भिषग्वर्यांना तो निर्बध लागू करता येत नाही;आणि तसे न करणे जर प्रशस्त असेल तर सामाजिक सुधारकांना तरी तुम्ही अमुक प्रकारच्या विषयावर लिहिणे बरोबर नाही असे कसे म्हणता येईल? ज्या गोष्टीपासून लोकांना तोटा होत असेल ती त्यांना कितीही नाजूक किंवा अस्पृश्य वाटत असली तरी सुधारकाला तिचे उघडपणे दोषाविष्करण करणे भाग आहे.

पुढे वाचा