मासिक संग्रह: जून, १९९८

संपादक

मासिकाचा प्रकाशक म्हणून अगदी पहिल्यापासून मी त्यांच्याशी संबंध ठेवून असल्यामुळे आणि आता संपादकांनी त्यांची सूत्रे खाली ठेवली असल्यामुळे हे सारे लिहिण्यास प्रवृत्त झालो आहे.)
ह्या अशा प्रकारच्या मासिकाचा खप फार होणार नाही ह्याची संपादक-प्रकाशकांना पुरेशी कल्पना होती. त्याशिवाय ह्या मासिकाच्या जाहिराती जिकडेतिकडे फडकवून वाचकांचे लक्ष त्याकडे वेधून घेणे इष्ट होणार नाही ह्याचीही संपादकांना जाणीव होती. आपल्या मासिकाची कीर्ती ज्यामुळे आपोआप पसरेल असे वर्तन ठेवण्याचे बंधन ह्या मासिकाच्या संपादकांनी आपल्यावर घालून घेतले होते, त्यामुळे काही ठिकाणी नमुना अंक पाठविण्यापलीकडे त्यांनी ह्याच्या प्रचाराचा कोठलाही प्रयत्न केला नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहारे

शेरशहा ते अटलबिहारी
जवळ जवळ रोज आपल्याला अशी बातमी वाचायला मिळतेः- “समोरून येणा-या वाहनाला चुकवताना बसगाडी रस्ता सोडून बाजूला गेली व झाडावर आदळली. ड्रायव्हर मृत व इतर ७ अत्यवस्थ.” फरक इतकाच की कधी बस, कधी ट्रक किंवा कधी कार, किंवा रस्ता सोडून बाजूला जाण्याचे कारण बदलते. कधी टायर फुटल्याने, कधी वाहन चालकाला डुलकी लागल्याने, तर कधी चुकार पादचायाला किंवा सायकलस्वाराला वाचवताना गाड़ी रस्त्याबाहेर जाते.
हायवे शेजारी जर मोठे वृक्ष, मजबूत बांधकामे, मोठे मैलाचे दगड अशा गोष्टी नसल्या तर रस्ता सोडून बाजूला गेलेली गाडी शेतातील पिकांमध्ये किंवा माळावरील झुडुपांमध्ये घुसून हळू हळू थांबेल, फार तर उलटी होईल.

पुढे वाचा

स्फुट लेख

एक शहाणा प्रयोग
क) शेतमालाच्या किंमती १९७७ ते १९९८
ज्वारी ‘स्वस्तावली
१९७० १९९८
१०० किलो ज्वारी = १,००० किलो सीमेंट २०० किलो सीमेंट
= २०० किलो लोखंड ४० किलो लोखंड
= ४०० लिटर डीझेल ५० लिटर डीझेल
= ११ ग्रॅम सोने १.५ ग्रॅम सोने
= १,००० किलो ऊस १,००० किलो ऊस
= २० किलो द्राक्षे ५० किलो द्राक्षे
म्हणजे ज्वारी, ऊस यांची किंमत तर घटलीच, पण द्राक्षांची किंमत थेट कोसळली. भाजीपाला दूध यांचेही असेच झाले.
ख) ज्वारी पिकवणारा तगला कसा? घरातल्या बायकापोरांना, गाईबैलांना, जमिनीला, भूगर्भातल्या पाण्याला आणि द्रव्यांना लुटून कारण हे घटक शेतक-यापेक्षाही कमकुवत!

पुढे वाचा

कालचे सुधारक

गुणग्राहक
आदि शंकराचार्यांनी बादरायण व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. त्या शांकरभाष्यामधले तर्कदोष दाखवून व्यासांतर्फे शंकराचार्यांवर फिर्याद लावणारे केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे एक लोकविलक्षण पुरुष नागपुरात होऊन गेले. हा थोर तत्त्वज्ञ पूर्णतया इहवादी असूनसुद्धा जीवनाच्या ऐहिक बाजूबद्दल अत्यंत उदासीन होता. दप्तरींचे कपडे घालण्याचे काही ठराविक नियम होते. उन्हाळ्यात अमक्या तिथीपासून तमक्या तिथीपर्यंत खादीचा सुती सदरा आणि गांधी टोपी ते घालीत आणि बाकीच्या (हिवाळ्याच्या) दिवसांत घोंगड्याचा उनी सदरा आणि तसल्याच कापडाची काळी टोपी ते वापरीत. मग उन्हाळ्यातल्या किंवा हिवाळ्यातल्या त्या त्या दिवशी हवामान प्रत्यक्षात कितीही थंड किंवा गरम असो.

पुढे वाचा

शतकाचा ताळेबंद

१३ एप्रिल १९९८ चा टाईम साप्ताहिकाचा अंक हा संग्राह्य असा विशेषांक आहे. २० व्या शतकाच्या ह्या संधिकालात गेल्या १०० वर्षांत होऊन गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आणि त्यांचा सहभाग असलेल्या महत्त्वाच्या घटनांवर एक प्रकाशझोत टाकून १०० वर्षांच्या इतिहासाचा दस्तऐवज वाचकांसमोर मांडण्याचा टाइमच्या संपादकमंडळाचा विचार आहे. असे एकंदर सहा विशेषांक निघणार आहेत. हा पहिला विशेषांक जगातील प्रभावी राजकीय पुढा-यांवर विशेष भर असलेला आहे. पण त्यात स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या मागरिट सँगर आणि निग्रोंच्या नागरी हक्कांसाठी लढा देणारे मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनि.) यांचाही समावेश आहे.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय एकविसाव्या शतकाची तयारी (भाग २)

जागतिक कृषि आणि जैवतंत्रशास्त्र (Bio-technology)
नवीन वैज्ञानिक शोधांनी जागतिक कुपोषणाची समस्या हाताळली जाऊ शकणार नाही काय?
अगदी अलीकडेपर्यंत कृषिउत्पन्न समाधानकारकपणे वाढते आहे असे दिसत होते. १९५० ते १९८४ या काळात शेतीचे उत्पन्न २.६ पटींनी वाढले. ही वाढ जागतिक लोकसंख्यावाढीपेक्षा जास्त होती. लक्षावधि एकर जमीन नव्याने लागवडीखाली आणली गेली, आणि नवीन यंत्रे, अधिक खते, अधिक फलप्रद सिंचन (irrigation) आणि पिकांची फेरपालट यांचा जगभर उपयोग केला गेला.
आशिया खंडात धान्यांच्या नवीन जैवतंत्रशास्त्रीय प्रजननामुळे प्रगतीचे मोठे टप्पे गाठले गेले. संकरज जातींच्या वनस्पती अधिक टिकाऊ असून रोगांचा प्रतिकार अधिक समर्थपणे करू शकतात आणि अधिकृत उत्पन्न देऊ शकतात असे दिसून आले.

पुढे वाचा

स्त्री-विषयक कायद्यांची परिणामशून्यता

स्त्रीवर्ग हा समाजाचा अर्धा भाग. या वर्गाने स्वतःची प्रगती करून राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वाची भर टाकावी अशी अपेक्षा आहे. म्हणून तळागाळापासून सर्व स्तरावरील स्त्रियांना सक्षम सबल बनविण्यासाठी निरनिराळे उपाय, धोरणे, कार्यक्रम आखले जात आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, राज्य, राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय स्तरावर परिषदा, परिसंवाद, मेळावे आयोजिले जात आहेत. स्वातंत्र्यापासून भारतीय स्त्रियांच्या विशेषतः शहरी भागातील स्त्रियांच्या दर्जात बराच फरक पडला आहे. शिक्षणाचा प्रसार होऊन अनेक क्षेत्रांत त्यांचा शिरकाव झाला आहे. आर्थिक दृष्ट्या परावलंबन कमी झाले आहे. पण विकासाची फळे सर्व स्तरावरील स्त्रियांपर्यंत पोचली आहेत का ?

पुढे वाचा

ग्रंथ भ्रामक होऊ शकतात

अनुभव व स्वतंत्र विचार हेच ज्ञानाचे खरे साधन होय. ग्रंथ केवळ मार्गदर्शक आहेत व कित्येक वेळी तर भ्रामकही होतात. म्हणून कोणत्याही संशोधकाने स्वतःच्या अनुभवावरून स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. इतिहासात मात्र घडलेल्या गोष्टी ज्यांनी स्वतः पाहिल्या त्यांची वचने मुख्य प्रमाण मानली पाहिजेत. संशोधन करण्यात कितीही श्रम पडले तरी ते टाळू नका. असे करात्न तरच तुम्हास सिद्धी मिळेल. विचार करताना कोणताही अभिनिवेश धरू नका. आणि तुम्हास जे ज्ञान होईल ते कोणासही न भिता बोलून दाखवा. तुमची चूक झाली आहे असे दिसून आले तरी तीही बोलून दाखविण्यास कचरू नका.

पुढे वाचा