मासिक संग्रह: नोव्हेंबर, २००८

स्वयंस्फूर्त-समाजहितैषी कामः काल, आज व उद्या

या लेखातील मुख्य विवेचनाकडे वळण्यापूर्वी एका मूलभूत मुद्द्याचा येथे उल्लेख करायला हवा. मुख्यप्रवाही राजकारण, कामगार संघटन, सहकार या क्षेत्रांबाहेर केल्या गेलेल्या व्यापक समाजहितैषी कामाला उद्देशून ‘स्वयंसेवी’ कार्य ही संज्ञा वापरली जाते. स्वातंत्र्यपूर्वकाळ, स्वातंत्र्योत्तर १९६० पर्यंतचा काळ, १९६० ते १९८० चा काळ, व१९८० पश्चात, असे कालखंड भारतातील ‘स्वयंसेवी’ कामाचा अभ्यास करताना केले जातात. ह्या विविध कालखंडांत जे समाजहितैषी काम झाले, त्यासाठी जे संस्थात्मक आकृतिबंध व व्यूहनीती वापरल्या गेल्या या साऱ्यांत लक्षणीय म्हणावी इतकी विविधता आढळते. ती विविधता पाहता त्या कामाला ‘स्वयंसेवी’ (व्हॉलंटरी), गैरसरकारी (नॉनगव्हर्नमेंटल), किंवा ना-नफा (नॉनप्रॉफिट) या संज्ञा सुयोग्य वाटत नाहीत.

पुढे वाचा

N.G.O.s व सामाजिक परिवर्तन

लोकविज्ञान-चळवळ, आरोग्य-चळवळ व डावी चळवळ यांतील एक कार्यकर्ता म्हणून मी सुमारे २५ वर्षे पूर्ण वेळ काम केले.आता १९९९ पासून मी मुख्यतः एका N.G.O. चे काम करतो व उरल्यावेळात चळवळीचे काम करतो. या माझ्या अनुभवाच्या आधारे एन.जी.ओंचे सामाजिक परिवर्तनातील योगदान ह्याबद्दल काही विचार चर्चेसाठी मांडत आहे.
N.G.O.s कोणाला म्हणायचे हे आधी स्पष्ट करूया. सामाजिक कार्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या ज्या संघटना लोकवर्गणीच्या/सभासद वर्गणीच्या/वैयक्तिक देणगीच्या आधारे चालत नाहीत तर मुख्यतः एकरकमी स्वरूपात मिळणाऱ्या सरकारी/बिनसरकारी, देशी/परदेशी आर्थिक पाठबळावर चालतात त्यांस N.G.O.असे मी समजतो. सरकारचे समाजकल्याण खाते किंवा “आम्ही सामाजिक कामच करतो’ असा दावा करणारी नव्या प्रकारची तथाकथित धर्मादाय इस्पितळे, ट्रेड युनियन्ससारख्या संघटना, सहकारी संस्था व अर्थात विविध राजकीय संस्था संघटना ह्यांपेक्षा N.G.O..

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थांचे कार्य: चिकित्सक दृष्टीची गरज

कोणत्याही गोष्टीच्या सर्वसाधारण आकलनासाठी तिच्याकडे इतिहासाच्या चौकटीतून पाहणे फायद्याचे ठरते. त्याप्रमाणे स्वयंसेवी संस्थांचा उदय, त्यांचे चरित्र, त्यांत आलेले बदल इत्यादि गोष्टींच्या सारासार आकलनासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था संकल्पनेच्या पातळीवर खूप प्रचलित असू शकतात. पण त्यांचा वर्तमान स्वरूपातील उदय हा १९ व्या शतकात झालेला दिसतो. त्या काळात त्या गुलामगिरीविरुद्ध आणि स्त्रियांच्या मतदान-हक्कासाठी चाललेल्या चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. त्यांचे ‘बिगर सरकारी संघटना’ (Non-Governmental Organisation- NGO) हे नामकरण संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या स्थापनेनंतर म्हणजे १९४५ सालानंतर प्रचलित झालेले आहे.
या दोन शतकांतील स्वयंसेवी संस्थांच्या कामाकडे दृष्टिक्षेप टाकला तर त्यांना तीन प्रवर्गांमध्ये (Catagories) विभागता येते.

पुढे वाचा

समाजाप्रति जबाबदेही

एकीकडे शासनव्यवस्था आणि दुसरीकडे घर-कुटुंबे, यांच्यामधले सामाजिक संघटनाचे क्षेत्र म्हणजे ‘नागर समाज’ किंवा अधिक सोप्या रूपात ‘एन्जीओ’ज. १९९०-२००० च्या दशकात हे क्षेत्र चांगल्या प्रशासनासाठी आवश्यक आहे, आणि ते शासनव्यवस्थेच्या बऱ्याच जबाबदाऱ्या घेऊ शकते, असे मत लोकप्रिय झाले. याला पार्श्वभूमी होती नव-उदारमतवादी संकल्पनांची. शासनव्यवस्था स्वभावतःच भक्षकवृत्तीची असते; प्रशासक नोकरशाही अपरिहार्यपणे (शासकीय) मालमत्तेचे ‘भाडे’ खाणारी असते; राजकारणी नेहेमीच सत्तेच्या मार्गाने नफा कमावणारे हावरट असतात; अश्यावेळी नागरिकांनी स्वतःचा सांभाळ करायला नागर समाज घडवणे हेच चांगले ठरते; अश्या ह्या संकल्पना होत्या. त्या अर्थातच फार आकर्षक वाटत असत.

पुढे वाचा