Monthly archives: ऑगस्ट, 2012

पत्रसंवाद

गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स्, दर्यापूर, जिल्हा अमरावती -444803.
आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदू विज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचून झाल्यावर अतृप्तीच शिल्लक राहाते; व त्या अतृप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत. पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही..
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे मातीचे मडके तयार होते. त्या मडक्यात पोकळी असते. म्हणजे काहीच नसते. काहीच नसण्याचा अस्तित्वाचा घटक त्या मडक्याच्या उपयोगितेला कारण ठरतो!
माणसाच्या कवटीच्या आत मेंदू असतो.

पुढे वाचा

साहित्यातून विवेकवाद (४) – जॉन बर्जर

निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे सुमारे एक
लक्ष वर्षे पृथ्वीवर जगत आहेत, आणि या आयुष्याचा जवळपास नव्वद टक्के भाग माणसे अन्नसंकलक म्हणून जगत आहेत.
कधीतरी दहाबारा हजार वर्षांपूर्वी माणसे जाणीवपूर्वक अन्न पाळू लागली.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (४)

गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का?

या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव अस्तित्वात आला नसता. तद्विरुद्ध सशक्त आण्विक बल काही टक्क्यांनी जरी कमी असते तर आपल्या या जगाला आकार देणारे जड मूलद्रव्य अस्तित्वात आले नसते व त्याप्रमाणे मनुष्य प्राणीसुद्धा……
गुरुत्व बल आहे त्यापेक्षा कमी असते तर सूर्याचा गाभा फोडू शकणारी आण्विक , प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सूर्य किरण पोचले नसते.

पुढे वाचा

चळवळी का यशस्वी होतात? का फसतात?

[2011 सालाच्या सुरुवातीला आनंद करंदीकरांनी ‘निर्माण’ चळवळीच्या मुलामुलींपुढे एक भाषण दिले. त्या भाषणावरून खालील लेख घडवला आहे. भाषणातील तळमळ आणि जोम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. (जरी त्यामुळे कुठेकुठे प्रमाण भाषेबाबतच्या संकेतांचे उल्लंघन होते!) – संपा. ]
भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा गावागावांत दोन-तीन महत्त्वाचे सामाजिक बदल घडले, त्यांचा माझ्या परीने मी एक धावता आढावा घेणार आहे. हा काही त्यांचा पूर्ण इतिहास नाही. पण मला जे पुढे मांडायचे आहे ते मांडण्यासाठी एक सामाजिक भूमिका निर्माण व्हावी म्हणून मी त्यांचा धावता आढावा घेणार आहे.

पुढे वाचा

मर्यादित स्त्रीमुक्ती

कुटुंबनियोजन, बालसंगोपन ह्यांविषयीच्या धारणा, त्याच्याशी निगडित तंत्रविज्ञान व सामाजिक संस्था ह्यांच्यामुळे स्त्रियाही सड्या राहू शकतात. म्हणून आता सत्ता, मत्ता व प्रतिष्ठा ह्यांच्यासाठी पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असण्या-स्वीकारण्याची अपरिहार्यता फारशी उरली नाही. ही तशी चांगलीच घडामोड असली तरी एक प्रकारची दिशाभूल ह्या कारणाने झाली आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती एवढी दृढमूल झालेली आहे की, त्या चौकटीत समानता, स्वतंत्रता व मुक्तता साधण्यामध्ये स्त्रिया समाधान मानीत आहेत, पण ह्याची एक अलिखित शर्त अशी आहे की ज्यांना समान, स्वतंत्र व मुक्त व्हावयाचे असेल त्या स्त्रियांनी जवळपास पुरुषाचाच अवतार धारण केला पाहिजे.

पुढे वाचा