संकलक आणि गुराखी जीवनपद्धती
सामाजिक शास्त्रांमध्ये एखाद्या समाजाचा आदिमानवी स्थितीपासून किती विकास झाला आहे हे तपासायला एक निकष वापरतात. त्या समाजात वस्तूंचे उत्पादन करण्याची प्रक्रिया, तिच्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि उत्पादन करणाऱ्यांचे एकमेकांशी संबंध, हा त्या समाजाचा पाया समजतात. या संरचनेला मार्क्सने पायाभूत संरचना, infrastructure, असे नाव दिले. समाजाचे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वगैरे व्यवहार म्हणजे या पायावरची इमारत किंवा Superstructure. पायाच अखेर इमारत कशी असेल ते ठरवतो, ही मार्क्सची मांडणी. ती सर्वमान्य नाही.
राज्यव्यवस्था आणि तिच्यातील सत्तेसाठीचा संघर्ष यांना पुरेसे वजन दिलेले नाही, ही एक टीका, प्रामुख्याने मार्क्सच्या अनुयायांकडून होणारी.