चार्वाकाविषयी आजच्या अनेक माणसांना विशेष आकर्षण का वाटते? ह्याचे सरळ उत्तर असे की तो निखळपणे जडवादी होता. ‘निखळपणे ’ असे म्हणायचे कारण असे की इतर काही भारतीय दर्शनेही जडवादाकडे झुकणारी आहेत. उदाहरणार्थ, वैशेषिक दर्शन. जे काही आहे ते सर्व परमाणूंचे बनलेले आहे, असे ते मानते, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पण प्रारंभी जरी ते ईश्वर मानीत नव्हते असे समजायला जागा आहे, तरी पुढे त्याने ईश्वराला सामावून घेतले. शिवाय ते कर्मसिद्धांतही स्वीकारते. म्हणजे व्यक्तींच्या कर्मानुसार त्यांना सुखदुःखरूप फळे भोगावी लागतात असे ते मानते.
विषय «तत्त्वज्ञान»
लोकायत, काल आणि आज
भारतीय उपखण्डात अनेक स्थानिक विश्वास-प्रणाली (belief systems) फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. “कर्म, पुनर्जन्म, मोक्ष” (कपुमो) ही चौकट या सर्व प्रणालींत समान आहे. कपुमो चौकट कधीपासून आणि कुणी सुरू केली किंवा झाली हा विषय इथे नाही. या चौकटीला आपण हिन्दू-वैदिक (ब्राह्मण परंपरा) किंवा बौद्ध (श्रमण परंपरा) हे आपापल्या विचारांनुसार किंवा आवडीनुसार म्हणू शकतो. भारतीय उपखण्डात जन्मलेले पण या चौकटीबाहेर राहिलेले दोन समूह आपण ढोबळ मानाने रेखांकित करू शकतो: एक म्हणजे निसर्गपूजक, बहुदेवतावादी (polytheist), चेतनवादी (animist) असलेला अतिप्राचीन किंवा इतिहासपूर्व (prehistoric) समूह ज्याचा एक मोठा भाग कपुमो चौकटीत यथावकाश आणला गेला आणि ज्याला आता अतिप्राचीनतेमुळे सनातनी (followers of eternal religion) असे संबोधिले जाते.
जागतिक आनंद निर्देशांक
जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report) हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास समाधान नेटवर्कचं एक वार्षिक प्रकाशन आहे. मार्च २०२५ मध्ये, फिनलँड सलग आठव्या वर्षी या यादीत पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर डेन्मार्क, आईसलँड आणि स्वीडन यांचा क्रमांक लागतो.
राष्ट्रीय आनंदाची क्रमवारी कॅन्ट्रिल लॅडर सर्वेक्षणावर आधारित आहे. यात सहभागींना एक शिडीची कल्पना करायला लावली जाते, ज्यात १० म्हणजे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आयुष्य आणि ० म्हणजे सर्वात वाईट आयुष्य. त्यानंतर त्यांना त्यांच्या सध्याच्या आयुष्याला ० ते १० च्या प्रमाणात मोजायला सांगितलं जातं. यात शीर्षस्थानी असलेल्या सर्व देशांमध्ये सहा प्रमुख घटकांचं मूल्य जास्त आहे, जे आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत: उत्पन्न, निरोगी आयुष्य, सामाजिक आधार, स्वातंत्र्य, विश्वास आणि औदार्य.
सुखाचा शोध
सुखाच्या मागे मागे आपण धावत रहावे का?
कदाचित हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा वाटेल. परंतु सुखी माणसाचा सदरा सापडणे व वाळवंटातील मृगजळ पकडणे दोन्ही सारखेच ठरतील. सुखाचा शोध घेण्याचा मार्ग फारच खडतर आहे याची जाणीव बहुतेकांना आहे व या मार्गावरील खड्ड्यात पडणार्यांची, टक्के टोणपे सहन करत राहणार्यांची संख्यासुद्धा कमी नाही. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात परमसुख मिळणार आहे या आशेने आपण मार्गक्रमणातील दु:ख, वेदना, त्रास, विसरून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. भरपूर पगाराची नोकरी, मुबलक (अतिरिक्त!) पैसा (disposable income), प्रशस्त घरात वास्तव्य, आवडत्या संगातीबरोबरचे कौटुंबिक सौख्य, आरोग्यमय जीवन, इत्यादीत अडकून घेतल्यामुळे आयुष्यात या व्यतिरिक्त काही गोष्टी असू शकतात, त्यातूनही मानसिक समाधान मिळू शकते, हे आपण विसरत आहोत.
सुखाचा शोध आणि आधुनिक आव्हाने
“सर्वेपि सुखिनः संतु” ही संकल्पना भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. चारही वेद, उपनिषदे, गीता तसेच संतसाहित्य यात सर्वत्र “सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय” ही भावना कमीजास्त प्रमाणात आढळते. सुख केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक असावे, ही धारणा प्राचीनतम आहे. भारतीय परंपरेतील पुरुषार्थचतुष्ट्य – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – ह्यांतूनही सुखाची कल्पना व्यक्त होते. येथे अर्थ आणि काम हे ऐहिक सुखाशी निगडित आहेत, पण त्यांना धर्म हा नियंत्रक घटक व मोक्ष हा अंतिम परिपाक आहे. म्हणजेच सुखाचा शोध वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीशी बांधलेला आहे.
चार्वाक — तर्काचा बंडखोर
नाकारले वेदांचे प्रामाण्य
तर्काचा तो बंडखोर—चार्वाक
इंद्रियप्रत्यक्ष सत्य मानले
अनुमान-आगम बुद्धीचे खेळ
ईश्वर नाही, आत्मा नाही
परलोकही केवळ कल्पना
“यावज्जीवं सुखं जीवेत”
विवेकातून आनंदाचा झरा
चार महाभूतांचा संगम
चैतन्य म्हणजे देहाचा योग
सृष्टी स्वाभाविक, ईश्वर नाही
भौतिकतेतच जीवनाचा भोग
नाही पाप, नाही पुण्य
नाही पुनर्जन्माचा व्यापार
जगणे म्हणजे अनुभवांचा उत्सव
नैतिकतेचा स्वाभाविक आधार
आज विज्ञानाचे युग उजळते
अनुभववादाची महत्ता ठळक
अंधश्रद्धा, रूढी, कर्मकांड
नाकारण्यातच प्रगतीचा मंत्र
डेटा, तर्क, प्रयोगशीलता
ज्ञानाचे खरे दीपस्तंभ
चार्वाक नाही अंतिम सत्य
पण विचारांना देतो दिशा
सुख म्हणजे भोग नव्हे केवळ
तर समता, सहजीवनाचा अर्थ
चार्वाक सांगतो—जगणे म्हणजे
जागृत मनाने अर्थपूर्ण जीवन
चेंजमेकर, बहुभाषिक अभ्यासक व स्तंभ लेखक
छ.
सुखाची बहुआयामी संकल्पना आणि भारतीय दृष्टिकोन
भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत एक अत्यंत मानवी असा आशीर्वाद वारंवार उच्चारला जातो “सर्वेऽपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः”. याचा सरळ अर्थ असा की सर्व लोक सुखी व्हावेत, सर्व लोक निरोगी राहावेत. प्राचीन ऋषींच्या चिंतनातून उमटलेली ही भावना इतकी वैश्विक होती की तिच्यात कोणत्याही जाती, धर्म, वर्ण, राष्ट्र यांचे बंधन नव्हते. ही भावना म्हणजे भारतीय विचारसरणीच्या सार्वत्रिक मानवी दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहे. मानवी जीवनाचा ध्यास केवळ मोक्ष, परलोक, आत्मसाक्षात्कार एवढ्यावर मर्यादित नसून, प्रत्यक्ष जगात लोकांनी सुखाने जगावे, ही देखील ह्या विचारांच्या मुळाशी असलेली आकांक्षा होती.
नास्तिक्य, विवेक आणि मानवतावाद
विवेक-मानवता : विवेक आणि मानवतावादावर लिहताना प्रथम विनय म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करावा लागेल. आपल्या विचारांचा अहंकार न बाळगता समाजभान राखून इतरांचा आदर करणे गरजेचे असते. विनम्रता तुमच्या वर्तनात सहजगत्या आलेली असावी. चांगले संबंध निर्माण करणे, सद्भावनांना प्रेरित करणे, इतरांची मते सर्वंकषपणे विचारात घेणे आणि व्यक्त होताना किंवा प्रतिक्रिया देताना सांवादिक राहाणे हाच विवेकशील वर्तनाचा पाया असतो. तुम्ही धार्मिक, नास्तिक किंवा पुरोगामी कोणीही असा, तुम्ही तुमच्या विचारांचे वाहक असता.
मानवतावाद : मानवतावादावर लिहिताना दया, सहानुभूती ह्या मूल्यांचा आपण वापर करीत असतो; पण सहिष्णुता आणि वैचारिक मूल्यांचा आदरभाव असे प्राथमिक विचार मानववादाचा पाया असतो.
मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद : एक सांप्रत दर्शन – परिचय
‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबर-२३ च्या अंकातील श्रीधर सुरोशे यांचा ‘मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २‘ हा लेख वाचला. त्यातील विचार आणि मी ज्या दर्शनाचा अभ्यास करीत आहे, यांतील साम्यस्थळे मला दिसली. त्यावरील माझ्या अभिप्रायांवर ‘आजच्या सुधारक’ने प्रोत्साहन दिले की ‘मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद’ याविषयी मी काही लिहावे, ज्याने एक नवा मौलिक विचार लोकांसमोर येईल आणि संवादाचा एक मोठा अवकाश खुला होईल. मला लिहिते केल्याबद्दल ‘सुधारक’चे आभार.
भूमिका :
सर्वप्रथम हे सांगणे आवश्यक आहे की मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद या दर्शनाचा मी गेले काही वर्षे अभ्यास करतो आहे.
मानवी ज्ञानाच्या मर्यादा
सर्वसामान्यपणे एखाद्या विषयाची प्राथमिक ओळख करून देताना त्या विषयाशी संबंधित बोधकथा विषय समजावून घ्यायला मदत करतात. मीही या लेखात अशा कथांची मदत घेणार आहे. पण या कथा एकाच वेळी अनेक पातळीवर वावरत असतात. त्यामुळे त्या निरनिराळ्या वाचकांना निरनिराळे बोध देण्याची शक्यता असते. यासाठी, मला काय म्हणायचे आहे ते प्रथम सूत्ररूपाने पाहूया आणि त्यानंतर आपण स्पष्टीकरणाकडे वळूया.
मला म्हणायचे आहे ते असे:
१. त्रिकालाबाधित, संदर्भरहित सत्य नावाची गोष्ट नसते आणि असली तरी ती तशी आहे हे सिद्ध करणे शक्य नसते.
२. ज्याला आपण सत्य म्हणतो ते प्रत्यक्षात गृहीतक किंवा त्यातून काढलेले निष्कर्ष असतात.