विषय «तत्त्वज्ञान»

तत्त्वज्ञानाची ओळख -५ तार्किकीय ज्ञान (२)

गेल्या लेखांकात आपण तार्किकीय सत्यांचा (logical truths) किंवा तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांचा परिचय करून घेतला. तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांत जरी न-तार्किकीय (non-logical) शब्द असले तरी त्या विधानांच्या सत्यतेच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती व्यर्थ असते, कारण तार्किकीय सत्यांची सत्यता केवळ तार्किकीय शब्दांच्या उपस्थितीवरच अवलंबून असते. म्हणूनच तार्किकीय विधाने आपल्याला जगाविषयी कसलीही माहिती देत नाहीत.
तार्किकीबलाने सत्य असणारी विधाने आपल्याला जगाविषयी कसलीही माहिती देत नाहीत असे आपण म्हणालो आहोत. पण जर हे खरे असेल तर तार्किकीय सत्यांचा उपयोग काय? असा प्रश्न या ठिकाणी उद्भवेल.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख ४ (तार्किकीय ज्ञान)

अनुमान शेवटी प्रत्यक्षावर म्हणजे ऐंद्रिय अनुभवावर आधारलेले असते हे आपण गेल्या लेखात पाहिले. जगात कुठे काय आहे, किंवा कुठे काय केव्हा घडले याचे ज्ञान आपल्याला प्रत्यक्षाशिवाय होऊ शकत नाही. अमुक दिवशी सहा महिन्यानंतर सूर्यग्रहण होईल हे आपणअनुमानाने सांगू शकतो. पण या अनुमानात वापरायची साधके शेवटी इंद्रियांनी झालेल्या सामग्रीवरच आधारलेली असतात. अनुमान हे प्रत्यक्षाहून भिन्न असे ज्ञानसाधन असले आणि ते अतिशय महत्त्वाचे असले, तरी ते स्वतंत्र प्रमाण नाही हे मान्य केले पाहिजे.
परंतु असेही काही ज्ञान आहे की जे शुद्ध तार्किकीय ज्ञान आहे.

पुढे वाचा