विषय «मानसिकता»

गोमांस आणि पाच प्रकरणे

गोमांस, पोर्क, गांधी, सावरकर, जिना
—————————————————————————
गोमांस ह्या सध्याच्या वादग्रस्त प्रश्नाशी संबंधित इतिहासाची काही महत्त्वाची पाने कोणत्याही टिप्पणीविना उलगडून दाखवत आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक तरुण अभ्यासक
——————————————————————–
प्रकरण 1: 10 डिसेंबर 2015 जागतिक मानवाधिकारदिनी तेलंगणातील ओस्मानिया विद्यापीठाचा परिसर युद्धभूमी बनला होता. निमित्त होते गोमांस विरुद्ध वराहमांस विवाद. गोमांसबंदी व त्यासंदर्भात देशभर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक कल्चरल फोरम या डाव्या विचारांच्या विद्यार्थीसंघटनेने उच्च न्यायालयाच्या स्थगितीला न जुमानता विद्यापीठपरिसरात गोमांसउत्सव साजरा करण्याचे ठरविले. यास प्रतिक्रिया म्हणून ओ.यु.जॅाईंट अॅक्शन कमिटी या दुसऱ्या संघटनेने वराहमांस उत्सवाचे आयोजन करण्याचे जाहीर केले.

पुढे वाचा

मानवी बुद्धी आणि ज्ञान

गीतेच्या तिसर्‍या अध्यायातील बेचाळीसावा श्लोक आहे :

इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।
मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स: ।(गीता 3.42)

अर्थ: (स्थूल शरीराहून) कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियांहून मन श्रेष्ठ आहे. तर मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीच्याही पलीकडे सर्वश्रेष्ठ असा “तो” आहे. इथे तो या सर्वनामाच्या ठिकाणी आत्मा अभिप्रेत आहे.
या श्लोकात श्रेष्ठतेची जी चढती भाजणी दिली आहे ती अचूक आहे. इंद्रियांवर मनाचे नियंत्रण असायला हवे. तसेच मनावर बुद्धीचे. बुद्धीच्या पलीकडे असलेला आत्मा हा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे.

पुढे वाचा

विवेकवाद विकसित करण्यासाठी…

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय विवेकवादाचं मुख्य स्वरूप सातत्यानं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संकुचित भूमिका घेतली म्हणून दुसऱ्या संकुचितांनी त्यांच्यावर हल्ला केला असं अजिबात नाही. त्यांनी व्यापक भूमिका घेतली. ती सहन न झाल्यामुळे जी संकुचित विचारांची मंडळी आहेत, त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय विवेकवादाचं व्यापक स्वरूप लक्षात घेताना याची उभी विभागणी करण्याची जी पद्धत आहे, ती मुळातून तपासली पाहिजे. उभ्या विभागणीत विवेकवादी एकीकडे आणि अविवेवकवादी दुसरीकडे किंवा अमूक एक परंपरा एकीकडे आणि दुसरी परंपरा दुसरीकडे अशी विभागणी केली जाते.

पुढे वाचा

थोड्याशांचे स्वातंत्र्य

मला स्वातंत्र्यावर लिहायला सांगणे हे काहीसे व्यंगरूप आहे, कारण मी गेली सहा वर्षे एका तुरंगातल्या ‘ बाले ’-तुरूंगात (तिहार जेलच्या अति धोकादायक कैदी विभागात) कोंडलेला आहे. इथे मुख्य तुरूंगात जाण्याचे किंवा आजारी पडल्यास इस्पितळात जाण्याचेही स्वातंत्र्य नाही.
अराजकापासून लोकशाही केंद्रीकृत सत्तेपर्यंतच्या पटात स्वातंत्र्य कुठेतरी बसवले जाते ती तशी ही एक सापेक्ष संकल्पना आहे. पण जी कोणती व्यवस्था असेल तिच्यात काही जणांना इतरांपेक्षा जास्त स्वातंत्र्य असते. भारतात ‘सितारे’ – सिनेक्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील, उद्योगधंद्यातील वा राजकारणातील – पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत असतात; अगदी खून करण्याचेही.

पुढे वाचा

शंका समाधान @शाखा

गेली अनेक वर्षे जो युक्तिवाद ऐकू येई, तो आताही ऐकू यावा याचा अर्थ कोणी काहीच बदललेले नाही काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कोणी काही विधान केले की, संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठरावीक उत्तर येते; ते म्हणजे टीकाकारांनी प्रत्यक्ष संघशाखेवर जावे आणि आपल्या शंकांचे निरसन करवून घ्यावे! गेल्या महिन्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर टीका करताच केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन यांनी त्यांना असाच सल्ला दिला. एक तर असा सल्ला राहुल गांधीच काय, अन्य कोणताही टीकाकार पाळणार नाही हे जितके खरे, तितकेच खरोखर कोणी टीकाकार शाखेवर येऊन गेले आणि त्याने/तिने आपले मत बदलले असेही झाल्याचे आढळून आले नाही.

पुढे वाचा

जिकडे पैसा जास्त तिकडे आयाआयटीयन्स

मागच्या आठवड्यात बेंगळुरूमधील आयआयएसच्या पदवीदान समारंभात इन्फोसिसचे एक संस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वोत्तम शिक्षणाचा दावा करणाऱ्या आयआयटी व आयआयएम या शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी काय संशोधन करतात, यावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. एकप्रकारे त्यांनी उच्चशिक्षणाचं ऑडिटच केलं आहे. नारायण मूर्ती यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याची कारणं माझ्या दृष्टिकोनातून अशी आहेत की, आयआयटीमधून बाहेर पडलेले बहुसंख्य विद्यार्थी परदेशात गेले. तिथे त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या नोकऱ्या स्वीकारल्या, त्या सगळ्या रुटीन स्वरूपाच्या होत्या. त्यात स्वतंत्र संशोधनाला फारसा वाव नव्हता. तिथेसुद्धा विद्यापीठांमध्ये फार कमी जण गेले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रिय मिलिंद,
कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…
काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर

पुढे वाचा

मेंदू प्रदूषण….

“दूषित करणे” म्हणजे बिघडविणे, वापरण्यास अयोग्य बनविणे. “प्र” उपसर्ग प्रकर्ष, आधिक्य (अधिक प्रमाण) दर्शवितो. यावरून प्रदूषण म्हणजे मोठ्या प्रमाणात बिघडविण्याची क्रिया. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, नदीप्रदूषण, भूमीप्रदूषण इत्यादि शब्द सुपरिचित आहेत.”मेंदुप्रदूषण” हा शब्द तसा प्रचलित झालेला नाही. पण त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. इंग्रजीत ब्रेन वॉशिंग असा शब्द आहे. त्याचे मराठीकरण मेंदूची धुलाई असे करतात. परंतु धुतल्यामुळे वस्तू स्वच्छ होते. तो अर्थ इथे अभिप्रत नाही. मेंदुप्रदूषण हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो. तुम्ही म्हणाल हे मेंदुप्रदूषण करणारे कोण ? ते कोणाच्या मेंदूचे प्रदूषण करतात ?

पुढे वाचा

लेखकाचा मृत्यू

सगळी माणसं मरणाधीन असतात, लेखकसुद्धा माणूस आहे म्हणून तो मरणाधीन आहे. हे लॉजिक आज सांगायचं कारण म्हणजे सध्या साहित्यक्षेत्रात लेखकाचं मरण ह्या विषयावर चर्चा सुरू आहे. मीडिया, मार्केट आणि मनी ह्या साहित्यबाह्य प्रभावांचा साहित्यावर कसा प्रभाव पडतो, हे ह्या पूर्वी आपण बघितलं आहे. अखेरीस मरणाची हूल आणि साहित्याचा परस्परसंबंध काय असू शकतो हे बघू या.
श्री. पेरुमल मुरुगन ह्या तमिळ कादंबरीकाराने ७ जानेवारी २०१५ रोजी स्वतःचा लेखक म्हणून मृत्यू जाहीर केला. ह्यापुढे आपण फक्त एक शिक्षक म्हणून जगू, लेखक म्हणून नाही अशी मुरुगन ह्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवरून घोषणा केली.

पुढे वाचा

मराठी नियतकालिकांची हतबलता

सलग २० हून अधिक दिवस पुण्याच्या ‘एफटीआय’मधील विद्यार्थ्यांचे नव्या संचालकांविरोधातले आंदोलन तग धरून आहे. त्यातून इतर काही निष्पन्न होईल न होईल; पण एक गोष्ट सिद्ध व्हायला हरकत नाही की, आपल्यावरील अन्यायाला आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे दिवस अजूनही पूर्णपणे इतिहासजमा झालेले नाहीत; पण ही मिणमिणती पणती म्हणावी, तशा प्रकारची अंधूक आशादायक घटना आहे. कारण महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या, कलाक्षेत्रातल्या आणि साहित्यक्षेत्रातल्या चळवळी जवळपास संपल्यात जमा आहेत. या क्षेत्रातील मान्यवर संस्था-संघटना यांनाही मरगळ आली आहे. सुशिक्षित, बुद्धिजीवी (हल्ली यांनाच ‘बुद्धिवादी’ म्हणण्याची/ समजण्याची प्रथा पडली आहे.)

पुढे वाचा