विषय «अभिव्यक्ति-स्वातंत्र्य»

देव, अनिवार्यता आणि मानवी अपेक्षा

२० डिसेंबर २०२५ ला लल्लनटॉपवर देवाच्या अस्तित्वावर एक सार्वजनिक वादविवाद झाला. जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यातील दोन तास चाललेला हा संवाद बऱ्यापैकी संयत आणि आजच्या काळात दुर्मीळ असा होता. विशेषतः भारतात अशा विषयांवरील चर्चा बहुतेकवेळा गोंगाटात संपतात. इथे मात्र दोन्ही बाजूंनी दिलेल्या वेळांत मुद्दे मांडले, आणि शेवटच्या भागात प्रेक्षकांनी शांतपणे प्रश्न विचारले.

तरीही हा वाद ऐकताना सतत वाटत होते की दोघेही वक्ते प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या स्तरांवर बोलत होते. मुफ्ती शमैल नदवी देवाच्या अस्तित्वाकडे ‘कारण’ (reason), ‘अनिवार्यता’, ‘कार्यकारणभाव’ (causation) अशा संकल्पनांच्या आधारे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहत होते.

पुढे वाचा

तर्क, श्रद्धा आणि निखळ संवादाचे उदाहरण

जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यात देवाच्या अस्तित्वाबाबत झालेली चर्चा एका धर्मसमूहातील व्यक्तीशी एक विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक व्यक्ती किती निखळ, सभ्य आणि तर्काधिष्ठित संवाद साधू शकते, ह्याचे उत्तम उदाहरण ठरते.

हा कार्यक्रम आयोजित करणारे, त्याचे मॉडरेटर सौरभ द्विवेदी, कार्यक्रमात सहभागी झालेले मुफ्ती शमैल नदवी, तसेच उपस्थित आमंत्रित वर्ग — ह्या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे.

जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांनी चर्चेचे स्वरूप निखळ आणि संयत ठेवले होते. प्रश्न तर्काचा होता, श्रद्धेचा होता, आणि धर्मव्यवस्थेशी निगडित आस्थेचाही होता. तरीही, त्याला गंभीर किंवा आक्रस्ताळे स्वरूप येऊ न देता चर्चा पुढे नेण्यात आली.

पुढे वाचा

भारतीय लोकशाहीपुढील संधी आणि आव्हाने

सर्वांत मोठ्या लोकशाहीपुढील संधी आणि आव्हानेही प्रचंड मोठी आहेत, हे प्रथम मान्य केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या संदर्भात निर्णायक महत्त्वाच्या वाटणाऱ्या खालील दहा स्तंभांचा विचार या लेखात करीत आहे.

१. विधिमंडळ
२. कार्यपालिका
३. न्यायपालिका (कायदा व न्याय)
४. प्रसारमाध्यमे (माहिती व ज्ञान)
५. संघराज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था
६. राजकीय पक्ष आणि व्यवस्था
७. सोशल मीडिया
८. मानवी हक्क (समानता, समावेशन व प्रतिनिधित्व)
९. स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज (सरकारबरोबर काम तसेच स्वातंत्र्य, न्याय आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्थन आणि संघर्ष)
१०.

पुढे वाचा

विरोध नेमका काय आणि कशाला आहे?

गेल्या काही दिवसांत दोन जाहीर कार्यक्रमांनी सार्वजनिक जीवनात बरीच खळबळ माजविली, मुंबईचा मायकेल जॅक्सन यांचा पॉप संगीताचा कार्यक्रम आणि बंगलोरचा विश्वसुंदरीचा स्पर्धात्मक कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रमांचे आश्रयदाते १५०००-२०००० हे. रुपयांचे तिकीट सहज परवडू शकणारे होते. बिनधास्त, बेपर्वा अशा या बाजारू संस्कृतीच्या बटबटीत कार्यक्रमांना दोन्ही ठिकाणच्या राज्य सरकारांनी ठाम, निर्धारपूर्वक, करडा पाठिंबा दिला. ही दोन्ही सरकारे त्यांच्या राजकीय मतप्रणालीत दोन ध्रुवांइतकी दूर आहेत. परंतु खुल्या अनिर्बध बाजारपद्धतीबाबत त्यांच्यात एकमत दिसते.

ही खुली बाजारू संस्कृती व्यक्तीच्या बाबतीत किती संवेदनशून्य असू शकते याची दोन उदाहरणे इथे देण्यासारखी आहेत.

पुढे वाचा

हुसेनसाहेबांचे अश्लील चित्र

सुप्रसिद्ध चित्रकार हुसेन साहेब ह्यांनी आपल्या धर्मातील देवदेवतांची विटंबना करणारे अश्लील चित्र रंगविले आहे. त्या चित्राची अस्पष्ट प्रतिमा ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली आहे. ती कृष्ण धवल आहे. त्यातून रंग संगती, रंगाचा तरलपणा, सुस्पष्ट होत नाही. चित्र परंपरावादी शैलीचे (क्लासिकल) नसून नूतन चित्रकलेचा नमुना आहे. या चित्रात गणपती वाटावा अशी आकृती आहे.

शंकराचे नुसते तोंड दर्शविले असून जटेतून प्रवाह दाखविला आहे. त्या प्रवाहात अवगाहन करणारी एक नग्न वाटणारी देवता बाजूला आहे आणि शेवटी एक सटवी रोग लागल्यासारखा वाकडा तिकडा कृष्ण आहे.

पुढे वाचा

कालचे सुधारक: नव्या मनूचे वात्स्यायन : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग १)

कर्व्यांचे प्रेरणास्थान आगरकर होते. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हा आगरकरी बाणा. तो कर्व्यांच्या अंगी इतका भिनला होता की त्यांचे जीवन ही एका झपाटलेल्या सुधारकाची जीवनकहाणी वाटावी. आगरकर १८९५ साली वारले. कर्वे १८९७ साली संपूर्ण मुंबई इलाख्यात मॅट्रिकला पहिले आले. कॉलेजात सतत गणितात पहिले येत गेले. फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी गणिताचा आणखी विशेष अभ्यास केला. एल्फिन्स्टन, डेक्कन अशा सरकारी आणि विल्सन कॉलेजसारख्या नामांकित मिशनरी कॉलेजांत मिळत गेलेल्या नोकऱ्या त्यांनी सोडल्या. आणि स्वतःला प्राणप्रिय, पण समाजाला अत्यंत अभद्र आणि ओंगळ वाटणाऱ्या कार्यासाठी त्यांनी कायम अर्धबेकार आणि ओढग्रस्तीचे जिणे पत्करले.

पुढे वाचा