विषय «कला»

भव्यतेच्या वेडाने पछाडलेले दशक

इंग्रजी भाषेत मेगॅलोमानियाक (megalomaniac) असे एक व्यक्तिविशेषण आहे. त्याचा अर्थ सत्तेचा, संपत्तीचा किंवा भव्य योजनांचा हव्यास असणारे व्यक्तिमत्व. एक प्रकारचे मानसिक वेड. अशा व्यक्ती स्वतःची प्रतिमा मोठी करून दाखविण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतात. अहंकारोन्मादी असे त्याचे मराठी भाषांतर वाचण्यात आले. ते समर्पक आहे की नाही माहीत नाही. मात्र भव्यतेचे आकर्षण हे मानवी मनाचे लक्षण आहे. शिवाय मोठेपणाची मानसिकता कुटुंबांच्या, व्यावसायिकांच्या आणि संस्थांच्या प्रवर्तकांमध्ये, शासनातील अधिकारी वर्गात आणि राजकारणी नेत्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात असते. त्याची आवश्यकताही असते. जेव्हा मोठेपणाच्या स्वभावात निर्मळता, निरपेक्षता असते तेव्हा स्वतःसाठीच्या आणि देशासाठीच्या महत्त्वाकांक्षेचे लाभ आणि आनंद सर्वांना मिळतो.

पुढे वाचा

भाषा, लोकतंत्र, कला – जावेद अख़्तर के साथ बातचीत

(प्रश्नोत्तर सत्र में मशहूर फिल्मकार करातीं कानडे ने जावेद अख्तर से एक सवाल अंग्रेजी में पूछा, तो उन्होंने अंग्रेजी में जवाब देना शुरू किया. लेकिन, श्रोताओं की ओर से आवाज़ उठी कि वे हिंदी में बोलें. हिंदी में ही सवाल पूछने आग्रह करते हुए उन्होंने पहले सवाल दोहराया और जवाब दिया…) 

क्रांती कानडे : सवाल ये था कि मुस्लिम समुदाय में नास्तिकता का इतिहास क्या रहा है? 

जावेद अख्तर : मुस्लिम समुदाय से इनका मतलब क्या है? दुनिया के सारे मुस्लिम एक समुदाय नहीं है.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी सृजनात्मकतेसमोरील आव्हाने

होमो सेपियन म्हणून आपण स्वतःला आजपर्यंत मिरवले. गर्व बाळगला की या पृथ्वीवर आपणच तितके बुद्धिमान. “What a Piece of Work is Man!” हे हॅम्लेटमधील शेक्सपिअरचे वाक्य आणि त्यानंतर त्याने तुलना करून मानवाचे केलेले वर्णन आपल्याला सांगून जाते की आपल्याला ‘माणूस’ असण्याचा किती गर्व आहे..! विसाव्या शतकापर्यंत या गर्वाला नख लावणारे असे काही घडले नाही किंवा घडलेही असेल तर ते तात्पुरतेच. लक्षातही न राहण्यासारखे. उलट मानवाने बुद्धीच्या आणि कल्पनेच्या जोरावर प्रगतीच केली. थक्क करणारी. विमाने काय बनवली, पाणबुडी, वेगाने धावणारी वाहने…. जमीन असो, आकाश असो की पाणी, आपणच सर्वश्रेष्ठ ठरलो.

पुढे वाचा

गुणाकाराची बेरीज – वजाबाकी

लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.

पुढे वाचा

मुलांची नैतिक बुद्धिमत्ता

रॉबर्ट कोल्ज (Robert Coles) या हार्वर्डच्या मानसशास्त्रज्ञाचा विषय आहे ‘मुले’. त्याने या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत, व त्यापैकी एका पुस्तकाला पुलित्झर पारितोषिकही मिळाले आहे. त्याच्या मुलांची ‘नैतिक बुद्धिमत्ता’ (The Moral Intelligence of Children) या नव्या पुस्तकातील काही उतारे २० जाने. च्या ‘टाइम’ मासिकात उद्धृत केले आहेत. त्यातील काही कहाण्या –

(क) माझ्या नऊ वर्षांच्या मुलाला मी आणि माझ्या पत्नीने सुतारकामाच्या हत्यारांशी ‘खेळायला’ मना केले होते, तरी तो हत्यारांशी खेळला आणि त्याच्या हाताला जखम झाली. टाके पडणार यामुळे तर व्यथित होतोच, पण त्याने आम्ही घालून दिलेला नियमही मोडला होता.

पुढे वाचा

विरोध नेमका काय आणि कशाला आहे?

गेल्या काही दिवसांत दोन जाहीर कार्यक्रमांनी सार्वजनिक जीवनात बरीच खळबळ माजविली, मुंबईचा मायकेल जॅक्सन यांचा पॉप संगीताचा कार्यक्रम आणि बंगलोरचा विश्वसुंदरीचा स्पर्धात्मक कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रमांचे आश्रयदाते १५०००-२०००० हे. रुपयांचे तिकीट सहज परवडू शकणारे होते. बिनधास्त, बेपर्वा अशा या बाजारू संस्कृतीच्या बटबटीत कार्यक्रमांना दोन्ही ठिकाणच्या राज्य सरकारांनी ठाम, निर्धारपूर्वक, करडा पाठिंबा दिला. ही दोन्ही सरकारे त्यांच्या राजकीय मतप्रणालीत दोन ध्रुवांइतकी दूर आहेत. परंतु खुल्या अनिर्बध बाजारपद्धतीबाबत त्यांच्यात एकमत दिसते.

ही खुली बाजारू संस्कृती व्यक्तीच्या बाबतीत किती संवेदनशून्य असू शकते याची दोन उदाहरणे इथे देण्यासारखी आहेत.

पुढे वाचा

हुसेनसाहेबांचे अश्लील चित्र

सुप्रसिद्ध चित्रकार हुसेन साहेब ह्यांनी आपल्या धर्मातील देवदेवतांची विटंबना करणारे अश्लील चित्र रंगविले आहे. त्या चित्राची अस्पष्ट प्रतिमा ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली आहे. ती कृष्ण धवल आहे. त्यातून रंग संगती, रंगाचा तरलपणा, सुस्पष्ट होत नाही. चित्र परंपरावादी शैलीचे (क्लासिकल) नसून नूतन चित्रकलेचा नमुना आहे. या चित्रात गणपती वाटावा अशी आकृती आहे.

शंकराचे नुसते तोंड दर्शविले असून जटेतून प्रवाह दाखविला आहे. त्या प्रवाहात अवगाहन करणारी एक नग्न वाटणारी देवता बाजूला आहे आणि शेवटी एक सटवी रोग लागल्यासारखा वाकडा तिकडा कृष्ण आहे.

पुढे वाचा

वा.म. जोशी यांची वाङ्मयविषयक भूमिका

वामन मल्हार जोशी यांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी प्रस्तुत लेखात केलेली नाही. त्यांच्या वाड्मयविचाराची अशा प्रकारची मांडणी व चिकित्सा वा.ल. कुळकर्णी व अन्य काही ज्येष्ठ समीक्षकांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळेच वामन मल्हारांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी करण्यापेक्षा त्यांचा वाड्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कोणता आहे, म्हणजेच त्यांची वाड़मयविषयक भूमिका कोणती आहे, ती कोणत्या तत्त्वांवर, सूत्रांवर आधारलेली आहे. तिची वैशिष्टये कोणती आहेत, याची चर्चा -चिकित्सा प्रस्तुत लेखात केली आहे.

वामन मल्हारांनी फार मोठ्या प्रमाणात वाङ्मयविषयक लेखन केले आहे असे दिसत नाही. ‘विचारसौंदर्य’ हा वाङ्मयविषयक लेखसंग्रह व अन्य काही ग्रंथनिविष्ट वा असंगृहीत वाङ्मयविषयक लेख वा परीक्षणे हे त्यांचे या प्रकारचे लेखन आहे.

पुढे वाचा