मासिक संग्रह: जानेवारी, २०००

आम्ही आणि ‘ते’! (भाग २)

मागच्या अंकामध्ये समाजाची चिकित्सक वृत्ती कोणत्याही एका जातीकडून कुंठित होत नसते हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. ह्या अंकात बहुजनांचे शोषण करण्याचा मक्ता फक्त ब्राह्मणांकडे नव्हता हे सांगण्याचा यत्न करणार आहे.
अन्याय आणि शोषण ह्यांचा देशमुख त्याच वाक्यात पुढे उल्लेख करतात. त्यांच्या वाक्यातून अन्याय आणि शोषण फक्त ब्राह्मणांनीच केले असे सूचित होते. परंतु ते तसे नाही हे इतिहासाच्या कोणत्याही चिकित्सक वाचकाला समजण्यासारखे आहे. आमच्या देशात अन्याय आणि शोषण आम्ही सर्वांनीच एकमेकांचे केले. येथे म्हणजे भारतात महाराष्ट्रातल्या काही मोजक्या प्रदेशात शाहूचे मुख्यप्रधान म्हणून पेशव्यांनी राज्य केले असले तरी अन्यत्र कोठेही ब्राह्मण राज्यकर्ते नव्हते.

पुढे वाचा

“पैसा” उत्पत्ती आणि उत्क्रांती

प्रत्येक मनुष्याला आपल्या कामाचा/वस्तूचा/वेळेचा मोबदला हवा असतो. हा मोबदला सोयिस्कर स्वरूपात, दीर्घकाळ टिकेल असा, भविष्यासाठीही राखून ठेवता येईल असा आणि त्याबदल्यात काही मिळवून देईल असा असावा. पूर्वी अशा त-हेची काही सोय नव्हती. लोक रोखठोक व्यवहारात वस्तूंच्या अदलाबदली करत. परंतु हे फारच जिकिरीचे असे. अशा प्रकारची स्थानिक पातळीवरची देवाणघेवाण म्हणजे व्यापार नव्हे.
तेव्हा मग व्यापा-यांनी, सावकारांनी हुंड्या, हवाला, वचनचिठ्या देण्यास सुरुवात केली. त्या त्या व्यक्तीची पत आणि विश्वासार्हता यांवर हा व्यवहार चाले. परदेशी व्यापाराच्या वेळी सावकार-श्रेष्ठी गायी, शेळ्या-मेंढ्या अशा वस्तू तारण म्हणून ठेवून घेत.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक,
१. ‘ब्राह्मणांचे गोमांस-भक्षण’ हा लेख छापून तुम्ही काय साधले? ब्राह्मण आता बदलले आहेत. बैदिक हिंदू आता पूर्वी होते तसे हिंसक राहिले नाहीत. समाजसुधारणा म्हणजे ऊठसूठ हिंदुधर्माला आणि ब्राह्मणांना झोडपणे असे तुम्ही समजता काय? ही एक प्रतिक्रिया.
२. पोपप्रणीत धर्मविस्तार ह्या लेखाचे प्रयोजन काय? उगाच धर्मा-धर्मात द्वेषबुद्धी जागृत करायची ही कुठली सुधारणा? ही दुसरी प्रतिक्रिया.
उत्तर इतकेच की, धर्माच्या नावावर मनुष्य किती वेडाचार करू शकतो हे दाखवावे. तो पूर्वी करत होता अन् आता नाही असेही नाही. अंधश्रद्धा निर्मूलनवार्तापत्राचा दिवाळी अंक (१९९९)पाहा.

पुढे वाचा

ईश्वर विनाकारण घोटाळ्यात पडायला नको

ईश्वराला अक्कल शिकवणारे लोकच प्रार्थना करीत असतात. पावसाकरतां प्रार्थना करणा-या लोकांची चेष्टा करण्याकरतां विन्स्टन चर्चिल यांनी एकदां वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यांत त्यांनी अशी शिफारस केली होती की, पावसाला व पिकांना सर्वांत सोयीचा वेळ कोणता हे ठरवण्याकरतां एक कमिटी नेमावी आणि त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याला धरून अमुक दिवशीं अमुक इतका पाऊस पाडण्याविषयी ईश्वराला सार्वजनिक प्रार्थना करावी, कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या दिवशी प्रार्थना केल्याने ईश्वर विनाकारण घोटाळ्यांत पडण्याचा संभव आहे. अर्थात् युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी आपणास विजय मिळावा अशी प्रार्थना केल्यामुळे ईश्वर नेहमीच घोटाळ्यांत पडतो, पण पिकांचे बाबतीत कदाचित् एका देशांतल्या लोकांचे तरी कमिटीचे द्वारें एकमत होण्याचा संभव आहे, तेव्हा वेगवेगळ्या देशांत तसतसा पाऊस पाडून त्यांचे समाधान करणे शक्य आहे.

पुढे वाचा