मासिक संग्रह: एप्रिल, २००६

संपादकीय व्यासपीठ

काही महिन्यांपूर्वी भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी (Indian School of Political Economy) या संस्थेच्या अर्थबोध या मासिकाने मानवाचा मेंदू या विषयावर एक उत्कृष्ट विशेषांक काढला. अर्थशास्त्रासाठीच्या मासिकाने हा तसा दूरचा विषय घेतला, यावरून काही प्रश्न उभे राहतात.
मज्जाविज्ञान (neuroscience) या विषयाला स्वाभाविकपणे केंद्रस्थान देईल असे नियतकालिक मराठीत नाहीच का? मग काय मराठी वाचकांची वैज्ञानिक माहिती आणि चर्चेची भूक फक्त वृत्तपत्रे पूर्ण करतात ? विज्ञानाबद्दलचा हा प्रकार मानव्यशास्त्रे व कलाक्षेत्र यांच्यातही दिसतो. भाषेबाबत चर्चेसाठी भाषा आणि जीवन, तत्त्वज्ञानासाठी परामर्श, अर्थशास्त्रासाठी अर्थबोध, अशी थोडीशी विशिष्ट विषयांना वाहिलेली नियतकालिके आहेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आपल्या फेब्रुवारी ०६ च्या अंकातील श्री दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. आपल्या देशात बेरोजगार हमीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचा तसेच इंग्रजी राजवट येण्यापूर्वी तो प्रश्न नसल्याचाही उल्लेख त्यात आहे. हा विषय गेली शतक दीड शतक बराच चर्चिला गेलेला आहे. अर्थात लोकशाहीत आपली मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हे सर्वमान्य आहेच.
मी आजच्या रोजगार हमीची प्रशंसा करणे अत्यंत कठीण समजते. परंतु इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी आमच्याकडे रोजगाराचा प्रश्न अजिबात नव्हता, कोणी बेरोजगार नव्हतेच, त्या वेळी पैशाला महत्त्व नव्हते वगैरे उल्लेख मोहनींच्या लेखात आहेत.

पुढे वाचा

सपाटीकरणाचा सपाटा आणि विश्वाचे ‘वाट्टोळे’ वास्तव

टॉमस एल्. फ्रीडमन, दि वर्ल्ड इज् फ्लॅट : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द्वेन्टीफर्स्ट सेंचुरी, फरार-स्ट्राऊस अँड गिरॉक्स, न्यूयॉर्क २००५, पृष्ठे : ४८८. टॉमस फ्रीडमन हे न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाचे परराष्ट्रव्यवहार प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांना पुलित्झर पुरस्काराने तीनदा गौरविले गेले आहे. बैरुत टु जेरुसलेम (१९८९), दि लेक्सस अँड दि ऑलिव्ह ट्री (१९९९) आणि लाँगिट्यूडस् अँड अॅटिट्यूडस् (२००२) या त्यांच्या ग्रंथांचे जगभरच्या जाणकारांनी प्रचंड कौतुक केले आहे. जागतिकीकरण, माहिती-क्रांती आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे त्यांच्या विशेष व्यासंगाचे विषय आहेत. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत त्यांचा नित्य संचार असून देशोदेशीच्या दिग्गजांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत.

पुढे वाचा

उपयोगितावाद (३): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ३: उपयोगितेच्या तत्त्वाचा अंतिम प्रेरक
कोणत्याही नैतिक मानदंडाविषयी असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो आणि ते योग्यच आहे की त्याचा आधार काय आहे? तो मानला जाण्याचे कारण कोणते? किंवा त्याच्या बंधकत्वाचा उगम कशात आहे? त्याला त्याचा बंधक प्रभाव कोठून प्राप्त होतो? या प्रश्नाला उत्तर पुरविणे हा नैतिक तत्त्वज्ञानाचा अवश्य भाग आहे.

पुढे वाचा

दि. य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका(एक रूपरेषा)

कशी बरे सुरुवात करावी? गेले काही दिवस हाच प्रश्न सतावत आहे. सुनीती देव यांचा ‘दि.य. देशपांडे यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ या विषयावर लेख लिहून पंधरा दिवसांत हवा आहे असा फोन आला आणि मनावर एक प्रकारचे दडपण आले. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या तत्त्वज्ञानावर लिहिणे अतिशय अवघड काम आहे याची मला जाणीव आहे. तरीपण त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे धाडस करीत आहे.
स्वतः दि. य. आपल्या तत्त्वज्ञानात्मक भूमिकेबद्दल काय म्हणतात हे प्रारंभीच लक्षात घेणे इष्ट ठरेल आणि चुका होण्याची शक्यता कमी राहील.

पुढे वाचा

स्वातंत्र्ये आणि सुरक्षा

स्वातंत्र्य हे विकासाचे केवळ अंतिम साध्यच नाही, तर एक कळीचे आणि परिणामकारक साधनही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यांचे परिणाम आणि त्यांचे परस्परसंबंध यांच्या तपासातून असे दिसते की स्वातंत्र्ये एकमेकांना पूरक ठरतात. एखाद्या व्यक्तीपाशी नेमके काय साधायची क्षमता आहे, हे आर्थिक संधी, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक सोईसुविधा, मूलभूत आरोग्य आणि शिक्षण आणि नव्याने प्रश्नांची उकल करण्याचे प्रयत्न, अशा साऱ्यांतून ठरत असते. या सर्व बाबी फार मोठ्या प्रमाणात एकमेकांना पूरक असतात, एकमेकींचा वापर करतात आणि एकमेकींना बळ देतात. स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांचे एकत्रित आकलनच होऊ शकते.

पुढे वाचा