ऑगस्ट १९९५ च्या आजच्या सुधारक मधील हा लेख वाचून आश्चर्यच वाटले. अशा प्रकारचा लेख आजचा सुधारकमध्ये अपेक्षित नव्हता. पुनर्जन्मावरील लेख छापायला माझा आक्षेप नाही. परंतु भारावून जाऊन लिहिलेल्या लेखाऐवजी अधिक विवेचक लेख शोभून दिसला असता. केवळ एक केस-रिपोर्ट वाचून श्री. प्र. के. कुलकर्णीचा अश्रद्धपणा हादरून गेला याचा खेद वाटला. प्रा. अकोलकरांचा मूळ शोधनिबंध वाचून निर्माण झालेली आपली वैचारिक अस्वस्थता श्री. प्र. ब. कुलकर्णी यांनी मोकळेपणाने मांडली आहे. ‘खरं, पुनर्जन्म आहे?’हा लेख वाचल्यावर (बहुधा मी श्री. प्र. ब. कुलकर्णीपेक्षा कमी अश्रद्ध असूनही) माझी प्रतिक्रिया मात्र वेगळी झाली.
गूढवाद
विज्ञान आणि धर्मशास्त्र यांच्यातील युद्ध चमत्कारिक प्रकारचे राहिले आहे. अठराव्या शतकातील फ्रान्स आणि विसाव्या शतकातील रशिया हे देश सोडले तर सर्वकाळी आणि सर्व स्थळी बहुतेक वैज्ञानिकांनी आपापल्या काळातील सनातनी मतांची पुरस्कार केला होता. अत्यंत प्रसिद्ध वैज्ञानिकांपैकी काही त्या बहुतेकांपैकी होते. न्यूटन जरी एअरियन असला तरी अन्य सर्व बाबतींत त्याचा ख्रिस्ती धर्माला पाठिंबा होता. कूव्हिअर हा कॅथलिक सनातनीपणाचा नमुना होता. फॅरडे सँडिमनियन होता, परंतु त्या पंथातील चुका त्यालाही वैज्ञानिक युक्तिवादांनी सिद्ध होणार्याफ वाटत नव्हत्या, आणि धर्म आणि विज्ञान यांच्या संबंधाविषयीची त्याची मते कुणाही धर्मपीठीयाला वाखाणण्यासारखी वाटणारी होती.
पुरुषप्रधान समाजात स्त्री पुरुषाची मालमत्ता
स्त्रियांच्या चळवळीला स्पष्ट असे विधायक उद्दिष्ट नसल्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कोठेही उण्या नाहीत हे दाखविण्यात स्त्रीचळवळीची बरीच शक्ती पाश्चात्य देशात खर्च होते…… भारतामधील स्त्री-चळवळी बलात्कार, नववधूच्या हत्या ह्या गंभीर गुन्हेगारीवर धार धरीत आहेत हे योग्यच असले, तरी हुंडा तसेच बलात्कार ह्या गोष्टी समाजात का घडतात व त्यांचे निर्मूलन कसे करता येईल ह्याचा विचार अजून सुरूही झालेला नाही. स्त्रियांवर असलेले गृहिणी, आई व मिळवती स्त्री ह्या तीन भूमिकांचे अवजड ओझे कसे कमी करता येईल ह्याचा विचार स्त्री-चळवळीने कोठेच सुरू केलेला नाही. ……. बलात्काराविरुद्ध चळवळ आहे ती बहुतांशी ‘गुन्हेगाराला शासन व्हावे ह्यासाठी आहे.
पत्रव्यवहार
आजच्या सुधारक च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकाच्या मलपृष्ठावर पंडिता रमाबाईंचा एक उतारा छापला आहे. त्यात बाई म्हणतात, “हिंदूधर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळून त्याचे गोडवे गाणाच्या माझ्या पाश्चात्य मित्रांना मी विनंती करते की हिंदुतत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकून भारून जाऊ नका. ह्या हिंदुबुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर – दरवाजे उघडून बघा, म्हणजे ह्या उदात्त तत्त्वज्ञानाचे व्यवहारातले रूप दिसून येईल”.
आग्रा येथील ज्या किल्ल्याच्या दर्शनाने हे विचार प्रेरित झाले आहेत त्याचा हिंदु धर्माशी किंवा तत्त्वज्ञानाशी अर्थाअर्थी काही संबंध नसला तरी विचार अगदी योग्य आहेत.
पण समजा एखाद्याने म्हटले की ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळू नका.
चर्चा -ज्ञानसाधनेचे मार्ग
आ. सु. च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात दोन विचारप्रवर्तक लेख ज्ञानसाधनेबद्दल आले आहेत. (१) ‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ हा श्री. श्री. गो. काशीकर यांचा व (२) अंतर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही’ हा डॉ. पु. वि. खांडेकर यांचा. विवेकवादासाठी ही चर्चा व हा विषय यांना फार महत्त्व आहे.
ज्ञानसाधनेसाठी वैज्ञानिक रीत अतिा सर्वमान्य झाली आहेच. म्हणून या चर्चेत सहभागी व्हावे असा विचार मनांत आला. या क्षेत्रांतील दोन उदाहरणे फार महत्त्वाची आहेत असे मला वाटते व त्यांकडे मी विवेकवाद्यांचे लक्ष्य ओढू इच्छितो.
(१) प्रथम रामानुजम सुप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ (pure mathematician) यांचे उदाहरण.
हिन्दुत्व-अन्वेषण (पूर्वार्ध)
या लेखाचे प्रयोजन आहे काय? जनमानसात ज्या धार्मिक कल्पना रुजल्या आहेत त्यांना छेद देण्याची आवश्यकता काय? वर्तमान काळात हिन्दुत्व आणि राजकीय आकांक्षा याचे अतूट नाते जुळलेले आहे, आणि आजच्या सुधारक या मासिकाचा वाचक-लेखकवर्ग विचक्षण, प्रज्ञावंत, विवेकवादी, आणि सत्यान्वेषी आहे. ईश्वराचे अस्तित्व, ‘भारतीय समाजातील स्त्रीची भूमिका अशा विषयासंबंधी जनमानसात रूढ असणाच्या संकल्पनांना छेद देणारे लेख या मासिकातून वारंवार प्रसिद्ध होतातच. या लेखासंबंधी प्रतिवाद होऊ शकतो, किंवा पूर्वपक्ष म्हणून हा लेख वाचकांतर्फे विचारात घेतला जाऊ शकतो. शाब्दिक चावटीचा आश्रय न घेता हिन्दुत्व आणि हिन्दुधर्म यांच्या पारंपरिक अस्तित्वाची साक्ष देणारे पुरावे कोणी सादर करतील तर प्रस्तुत लेखकाला नकारात्मक आणि आग्रही भूमिका घेण्याचे कारण नाही.
खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ८)
ऑगस्ट अंकामध्ये म्हटल्याप्रमाणे मी प्रा. श्याम कुळकर्णी ह्यांच्या पत्रातील काही शिल्लक मुद्यांचा परामर्श घेतो व त्यानंतर ह्या चर्चेचा समारोप करतो. हा विषय आता समारोपापर्यन्त आला आहे असे वाटण्याचे कारण माझा दृष्टिकोन आता वाचकांच्या लक्षात आला आहे असे माझ्या ज्यांच्याज्यांच्याशी भेटी झाल्या त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितले आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
मला अभिप्रेत स्वायत्तता स्त्रियांना ताबडतोब मिळू शकणार नाही ह्याची मला पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच इष्ट त्या दिशेकडे आपली वाटचाल सुरू करण्याची मला घाई झाली आहे, त्याच कारणासाठी आपण सर्वांनी मिळून पुढचा कार्यक्रम ठरविण्याची गरज शिल्लक आहे.
मनुष्याची उत्क्रान्ती आणि आधुनिक समाज
प्रत्येक व्यक्तीमध्ये जगणे, तगणे, प्रजोत्पादन करणे, वगैरेंसाठी आवश्यक असे गुण कमी जास्त प्रमाणात असतात. या गुणांच्या संचाला एकत्रितपणे “परिस्थित्यनुरूपता”म्हणतात. कोणता गुणसंच अनुरूप, हे परिस्थितीमुळे ठरते. प्रत्येक परिस्थितीत जास्त अनुरूपता असलेल्या व्यक्तींची प्रजा भावी पिढ्यामध्ये जास्त प्रमाणात टिकते, आणि याउलट कमी अनुरूप व्यक्तींचे वंश रोडावत जातात.
आपल्या शरीररचनांसाठी हे तत्त्व लावणे जवळपास सर्वमान्य आहे. उदाहरणार्थ, सूर्याकडून पृथ्वीवर येणार्या आणि जमिनीपर्यंत पोचणार्याउ किरणांना पाहू शकणारे डोळे आपल्या “इतिहासामुळे घडले. सागर तळाशी राहणार्याा माशांना आणि इतर जीवांना या किरणांशी कर्तव्य नसते, त्यामुळे त्यांचे डोळे हे किरण पाहत नाहीत.
कारणाची संकल्पना आणि परमात्म्याचे अस्तित्व
याच अंकात अन्यत्र डॉ. के. रा. जोशी यांचा ‘विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप हा लेख प्रसिद्ध झाला आहे. काही महिन्यांपूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मी आस्तिक का आहे ह्या प्रा. मे. पुं. रेगे यांच्या आणि मी आस्तिक का नाही’ या माझ्या लेखांतील युक्तिवादांना ‘पाश्चात्त्य असे नाव देऊन त्याबद्दल ते पटणारे नाहीत’ असे मत त्यांनी दिले आहे. पाश्चात्त्यांच्या ईश्वरकारणतावादात त्याची मांडणी बरोबर असल्याचे जाणवत नाही आणि त्याचे खंडनही न पटणारे आहे असे ते म्हणतात. ‘वस्तुतः। ईश्वरविरोधी अर्वाचीन विवेकवाद्यांच्या प्रस्तुत आक्षेपापेक्षाही अत्यंत तर्ककठोर आणि शास्त्रीय आक्षेप चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य, मीमांसक यांनी प्राचीन काळी उपस्थित केले होते.
विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप
एकीकडे स्वतःच्या आस्तिकतेचे आणि दुसरीकडे स्वतःच्या नास्तिकतेचे क्रमशः मंडन करणारे प्रा. मे. पु. रेगे आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे दोन विशेष लेख आजचा सुधारकच्या जानेवारी १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. ईश्वर हा जगाचे कारण आहे, हा युक्तिवाद पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात कसा मांडला जातो आणि कसा खंडित केला जातो, याचा हा भारतीय अनुवाद दिसतो. त्यात पुढीलप्रमाणे मुद्दे आलेले आहेत. विवेकवाद्यांचा ईश्वरकारणवाद
(१)‘जी कोणती वस्तू अस्तित्वात असते तिचे तिच्याहून भिन्न असे काही कारण असते आणि ह्या कारणामुळे ती अस्तित्वात आली असते. आता जग अस्तित्वात आहे.