दुबळी माझी झोळी!

वेताळ विक्रमादित्याच्या खांद्यावरून बोलता झाला : “राजा, तू मोठा विचारवंत आहेस. आपल्या प्रजेचे हित, न्याय, समाजव्यवस्था, मानवांचा स्वतःची उन्नती करायचा मूलभूत हक्क, असल्या विषयांवरची तुझी विवेकी, मानवतावादी आणि उदार मते सर्वांना माहीत आहेत. परंतु मला नियतीने नेमून दिलेले काम आहे, ते तुला गोंधळात टाकण्याचे. याच उद्देशाने मी तुला एक घडलेली घटना सांगतो. या घटनेसारख्या घटना घडू नयेत असे सर्वांनाच वाटते, ही माझी सुद्धा खात्री आहे. तर माझ्या कहाणीच्या शेवटी तू सांगायचे आहेस, की असल्या घटना कशा टाळाव्या. तुला नेमके उत्तर सांगता आले, तर मी माझ्या शिराचे सहस्र तुकडे करून ते एकेक करून तुझ्या चरणी-वाहीन.

पुढे वाचा

आधुनिक जैविक तंत्रविद्येचे सामाजिक आयाम

हल्ली विज्ञानातील संशोधनाचा प्रचंड आवाका आणि वेग जगात सार्वत्रिक क्रांती घडवीत असून, मानवी संस्कृतीच्या ५००० वर्षांच्या ज्ञात इतिहासात एवढी मूलगामी स्थित्यंतरे केवळ अभूतपूर्वच म्हटली पाहिजेत. या वैज्ञानिक संशोधनाचा उगम प्रामुख्याने पाश्चात्त्य प्रगत देशात असला तरी पृथ्वीतलावरील कोणताही मानव समाज या स्थित्यंतरापासून अलिप्त राहू शकत नाही. भौतिक शास्त्रांतील संशोधनामुळे मानवाच्या सुखसोयी वाढल्या व मानवी जीवन अधिक सुसह्य आणि गतिशील (dynamic) झाले. परंतु जीवशास्त्रांतील (Life Sciences) आधुनिक संशोधनामुळे मात्र मानवी जीवनाच्या अनेक सांस्कृतिक व सामाजिक परंपरा आणि मान्यता क्षीण होऊ लागलेल्या दिसतात. विशेषतः जैविक तंत्रविद्येच्या (Bio-technology) विकासामुळे तर मानवी जीवनाचे सूर व लय बदलू लागली आहे.

पुढे वाचा

लोकशाही आणि हुकूमशाही

शासनांचे दोन प्रकार करता येतील. पहिल्या प्रकारचे शासन म्हणजे ज्याचा अंत रक्तपातावाचून करता येतो ते, उदा. सार्वत्रिक निवडणुकांनी. अशा व्यवस्थेत ज्यांच्या साह्याने राज्यकर्त्यांना बडतर्फ करता येईल अशा संस्था असतात, आणि त्या संस्थांचा विध्वंस राज्यकर्ते करू शकणार नाहीत इतक्या मजबूत सामाजिक परंपरा असतात. दुसर्या् प्रकारात शासनाचा शेवट शासित केवळ यशस्वी क्रांतीनेच करू शकतात, म्हणजे अर्थात् बहुधा नाहीच. पहिल्या प्रकारच्या शासनाला ‘लोकशाही आणि दुसर्याक प्रकारच्या शासनाला ‘हुकूमशाही किंवा जुलूमशाही हे शब्द मी सुचवितो. त्या शब्दांच्या पारंपरिक अर्थाशी हा भेद स्थूलमानाने जुळणारा आहे असे मला वाटते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक स.न.
‘अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म या लेखामधून मधून तुम्ही ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना धर्मविरोध करावाच लागेल असे प्रतिपादिले आहे. गेल्या ७ वर्षातल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला काही मते नोंदवावीशी वाटतात.
हिंदू म्हणून समजल्या जाणार्या. इथल्या समाजात हिंदू धर्माची समजली जाणारी मूळ बैठक आणि धर्मग्रंथ एकीकडे, आणि विचित्र/विकृत कर्मकांड आणि भ्रष्ट धर्मग्रंथ दुसरीकडे अशी काहीशी विभागणी झालेली आहे. इथला हिंदू वेद-उपनिषदे, दर्शने जाणणारा क्वचित आढळतो. ग्रामीण भागात तर नगण्यच! पण ‘निर्मला मातेचे अध्यात्म ‘गाणगापूरचे माहात्म्य’, ‘ज्ञानेश्वरी, संतोषी माता व्रत/स्तोत्र अशी व्रतवैकल्ये व ग्रंथ तो उराशी कवटाळून असतो.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक,
स.न.वि.वि. जून ९४ च्या अंकांतील श्री. वर्हारडपांडे ह्यांचा लेख आणि जुलै ९४ च्या अंकांतील श्री. देशपांडे आणि मोहनी ह्यांचे लेख मला खूप आवडले. ना. सी. फडके ह्यांची भाषा सोपी होती. देशपांडे ह्यांची पण तशीच आहे. मोहनींनी त्यांच्या भाषेचा बोचरेपणा कमी का केला? त्यांनी बोचरे पणानेच लिहावे.
‘आज सर्व धर्माचा आढावा घेतला तर हिंदू धर्मच बरा आहे असे म्हणावेसे वाटते. मी वृद्ध आहे. मी मेल्यावर हिंदूधर्माप्रमाणे जाळणेच योग्य होय. लोकसंख्यावाढीमुळे मेल्यावर पुरावयाचे ठरविले तर कितीतरी जमीन पडीक राहील. तसेच विहिरीत प्रेत टाकणे पण अयोग्य होय.

पुढे वाचा

गांधींचे सत्य – डॉ. उषा गडकरींना उत्तर

‘गांधींचे सत्य- एक प्रतिक्रिया’ या लेखात डॉ. उषा गडकरी यांनी माझ्या ‘गांधींचे सत्य’ या लेखातील माझ्या प्रतिपादनावर अनेक आक्षेप घेतले आहेत. हे सर्व आक्षेप एकतर चुकीच्या माहितीवर आधारलेले आहेत, किंवा गांधीजींच्या वचनापेक्षाही अधिक दुर्बोध अशा भाषेत लिहिले आहेत. केवळ तीन पानांत त्यांनी इतके मुद्दे उपस्थित केले आहेत की त्या सर्वांना उत्तरे देण्याकरिता त्याच्या अनेकपट पाने खर्ची घालावी लागतील. म्हणून त्यातील प्रमुख मुद्द्यांना संक्षेपाने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
(१) प्रथम existence आणि subsistence या दोन प्रकारची अस्तित्वे मानणाच्या लोकांच्या मताविषयी. काही तत्त्वज्ञ स्थलकालात असलेल्या वस्तूंनाच अस्तित्व आहे असे मानतात; परंतु अन्य काही तत्त्वज्ञ (उदा.

पुढे वाचा

ईश्वरावरील श्रद्धा आवश्यक?

आम्हाला नांदेडचे श्री सुभंत रहाटे यांचे पुढे दिलेले पत्र आले आहे.
प्रा. दि. य. देशपांडे
देव असो वा नसो, देवावर विश्वास ही कित्येकांची मानसिक गरज असते. आपल्या दुःखाचे व काळजीचे ओझे देवाच्या डोक्यावर टाकले की आपला भार हलका होतो. देवावर श्रद्धा असणारा माणूस ऐहिक अडचणींनी खचून जात नाही. मानसिक ताण कमी करण्यापुरते देवाचे अस्तित्व कबूल करणे आवश्यक बनते, अशी एक मांडणी केली जाते. या मांडणीत ग्राह्यांश नाही का? विवेकवाद्यांचे या प्रतिपादनाला काय उत्तर आहे?
सुभंत रहाटे
रोहिणी सदन, कैलासनगर
वर उल्लेखिलेले मत फार मोठ्या प्रमाणावर व्यक्त केले जाते.

पुढे वाचा

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग २)

आजचा सुधारक ऑगस्ट १९९४ च्या अंकात मी एका प्रक्षोभक विषयाला हात घातला होता.
त्यात स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीला मानाने वागविणे, तिच्या विवेकशक्तीचा आदर करणे, तिच्या कोणत्याही (यामध्ये योनिविषयक वर्तनही आले) वर्तनामधील औचित्यानौचित्याविषयी तिला स्वतन्त्रपणे निर्णय करता येतो असा विश्वास तिच्या स्वतःच्या व इतरांच्या ठिकाणी निर्माण करणे ह्या गोष्टींचा मी ओझरता उल्लेख केला होता. आज त्याचा थोडा विस्तार करावयाचा आहे.
स्त्रीमुक्तीविषयी आमच्या सगळ्यांच्या मनांत पुष्कळ गैरसमज आहेत. माझा मागचा लेख वाचून झाल्यावर मला पुष्कळ लोक भेटले. पत्रे फार थोडी आली. त्यांपैकी एका पत्राचा काही अंश मी पुढे उद्धृत करणार आहे.

पुढे वाचा

दिवाळीतल्या गाठी भेटी

दिवाळीची आकर्षणे अनेक असतात. वयपरत्वे ती बदलतात. एक आकर्षण मात्र बहुतांश कायम आहे. दिवाळी अंकांचे. मात्र त्यातही आतला एक बदल आहेच. पूर्वी वेगळं साहित्य खुणावायचं, आता वेगळं. पूर्वी वेगळी अन् अनेक मासिकं घ्यावी वाटायची, आतात्यातली काही अस्ताला गेली; काही नाममात्र आहेत. काहींचा डौल मात्र तोच कायम आहे. वयपरत्वे अंगाने थोडी झटकली इतकेच. मौज, महाराष्ट्र टाइम्स, दीपावली हातात पडली की खरी दिवाळी सुरू होते. यंदाच्या दिवाळीत लक्षात राहाण्यासारखं पुष्कळ वाचलंय पण मनात घर करून बसलेल्या तीन लेखांविषयीची वाचकांना ओळख करून द्यायची आहे.

पुढे वाचा

उत्तमतेच्या समर्थनार्थ

पुढील लेख एका अमेरिकन लेखकाने अमेरिकेतील शिक्षणाविषयी लिहिलेला आहे. परंतु तो भारतातील शिक्षणविषयक परिस्थितीलाही तितकाच लागू आहे हे वाचकांच्या लक्षात येईल.
संपादक
‘Tinic’ साप्ताहिकाच्या २९ ऑगस्ट १९९४ च्या अंकात एका पुस्तकाचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाचे नाव आहे In Defense of Elitism आणि लेखकआहे William A. Henry III. हेन्री ‘टाईम’ मध्ये रंगभूमीबद्दल नियमित समीक्षात्मक लिखाण करीत असत. हे त्यांचे पुस्तक अमेरिकन समाजाबद्दल आहे आणि त्यांच्या अकाली निधनानंतर ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुस्तकाची आणि लेखकाच्या वैचारिक दृष्टिकोणाची प्राथमिक ओळख करून देताना म्हटले आहे, “माणसाच्या ज्या बौद्धिक गुणांना हेन्री महत्त्वाचे मानत त्यांच्या संध्या होत असलेल्या कोंडीचा ते निषेध करतात.

पुढे वाचा