अवधूत परळकर - लेख सूची

एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…

पुस्तक: एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…लेखक: विजय पाष्टेप्रकाशक: सिंधू शांताराम क्रिएशन्स अशुद्ध लेखन, सदोष प्रूफ रीडिंग आणि ‘एका पुरुषावर बलात्कार होतो तेव्हा…’ असं भलंमोठं, भडक, अंगावर येणारं नाव हा या कादंबरीचा प्रथम नजरेत भरणारा दोष! त्याकडे दुर्लक्ष करून ही कादंबरी वाचावी का? हरकत नाही, वाचू. पण त्यावर समीक्षा लिहायची? का नाही लिहायची? लेखन अशुद्ध आहे, …

देव-धर्मवेड्या समाजाचं व्यंगचित्र

‘देवनगरीत शेजाऱ्यावर प्रेम करणारे कमी आहेत, त्यामानानं शेजाऱ्यांच्या मांजरावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मांजरवेडय़ांना इथे शहाणं समजलं जातं, मात्र अशा या प्रात:स्मरणीय मांजरांना देवनगरीत हमरस्त्यावर यायला बंदी आहे. कारण मांजरं माणसांना आडवं जाऊन त्यांचा खोळंबा करतात, ही सामूहिक श्रद्धा. देवनगरीत एकदा एक माणूस साप चावून मेला. त्याला जिवंत करण्यासाठी इथला सुप्रसिद्ध मांत्रिक लगबगीनं निघाला, …

पुरुष: एक वाट चुकलेला मित्र

स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवाद याकडे सुजाण पुरुष नेहमीच आपुलकीनं आणि मैत्रीपूर्ण नजरेनं पाहात आला आहे. पण असं मी म्हणालो, की माझ्या स्त्रीवादी मैत्रिणी म्हणतात ”आहे कोठे तो सुजाण पुरुष?” हा काय तुमच्या समोर उभा आहे, असं गंमतीत त्यांना सांगावसं वाटतं. पण त्यांचा हा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही, त्यामागे त्याचं अनुभवसिद्ध निरीक्षण आहे याची मला जाणीव …

हे सर्व येते कोठून ? (विज्डम : स्टीफन हॉल यांच्या पुस्तकाचा परिचय)

अलौकिक कलागुण अंगी असणाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला नेहमी प्रश्न पडतो – ही मंडळी हे कोठून घेऊन येते? अलौकिक बौद्धिक प्रतिभा असलेल्या लोकांच्या बाबतीतही हा प्रश्न आपल्याला पडतो, खरेच हे सर्व कोठून येते? थोर तत्त्वज्ञ वैचारिक पातळीवरून विश्वाच्या अवघ्या पसाऱ्याचा अन्वय शोधू पाहतात, विश्वात मानवाची भूमिका काय, त्याच्या जीवनाचे प्रयोजन काय आहे, हे तपासून पाहतात. व्यवहारात कसे …