किशोर देशपांडे - लेख सूची

अनवरत भंडळ (६)

आध्यात्मिक साधनाः सुंदर जगण्यासाठी योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्मांडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विशातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवाद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळ्यांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळ्या/अज्ञानी …

अनवरत भंडळ (५)

भौतिक-अभौतिक विशाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचार-प्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे …

अनवरत भंडळ (४)

मेंदूचे अंतरंग डॉ. जिल टेलर या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेंदूरचना शास्त्रज्ञ (neuroscientist) आहेत. मानवी मेंदूतील पेशींचा मनोविकारांशी ने का काय संबंध असतो, या बाबतीत संशोधन करत असताना वयाच्या अवघ्या सदोतीसाव्या वर्षी डॉ. टेलर यांना स्वत:लाच ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्या मेंदू ध्ये रक्तस्राव होऊन मेंदूची डावी बाजू दुखापतग्रस्त झाली व त्यामुळे शरीराचा उजवा हिस्सा पांगळा झाला. त्यांच्या …

अनवरत भंडळ (३)

मन व अंतःकरण आपल्या अस्तित्वाची अनेक अंगे अथवा घटक असतात. पदार्थय भौतिक शरीर हा एक घटक, प्राण दुसरा, मन तिसरा, बुद्धी चौथा आणि जाणीव हा आणखी वेगळा घटक आहे. त्याखेरीज आत्मा हाही एक घटक अति-महत्त्वाचा असल्याचे अध्यात्म मानते, परंतु आत्म्याचे अस्तित्व हा वादाचा विषय आहे. प्राण आणि बुद्धीच्या मधात मन आहे. मन म्हणजे वासना, भावना, …

अनवरत भंडळ (२)

[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारणपरिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विशाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या-नसण्याची व असावे-नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्द्यांध्येच दडून आहेत. त्यामुळे आ.स्.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. …