जयदेव डोळे - लेख सूची

शंका समाधान @शाखा

गेली अनेक वर्षे जो युक्तिवाद ऐकू येई, तो आताही ऐकू यावा याचा अर्थ कोणी काहीच बदललेले नाही काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कोणी काही विधान केले की, संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठरावीक उत्तर येते; ते म्हणजे टीकाकारांनी प्रत्यक्ष संघशाखेवर जावे आणि आपल्या शंकांचे निरसन करवून घ्यावे! गेल्या महिन्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर टीका करताच केंद्रीय मंत्री …

बाजारबावरी

प्रसारमाध्यमांची मराठी भाषा फार बिघडून गेली असे माझे मत नाही. त्या त्या काळाप्रमाणे आणि माणसाप्रमाणे तिचा वापर होत असतो. त्यामुळे जुन्या काळच्या माणसाच्या परिचयाची मराठी दिसेनाशी झाली अथवा ती भलत्याच रूपात प्रकटू लागली की तक्रारी होऊ लागतात. तसे माझे नाही. भाषेला सोवळे नेसवणाऱ्यांना तिचे विद्यमान कपडे तोकडे, अपुरे, विसंगत अन् चुकीचे वाटायला लागतात. ‘कार्यक्रम उत्साहात …

संमतीचे उत्पादन: प्रसारमाध्यमांचे राजकीय अर्थशास्त्र (उत्तरार्ध)

[मागील अंकात या लेखाच्या पूर्वार्धात हर्मन व चोम्स्की ह्यांनी मांडलेल्या प्रचाराच्या प्रारूपातील पहिल्या चार चाळण्यांचे वर्णन केले होते. (१) आकार, मालकी आणि नफाकेन्द्री माध्यमे, (२) जाहिरात, (३) प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे स्रोत आणि (४) झोड आणि अंमलदार, अशा या चार चाळण्या. आता पुढे….] कम्युनिझम-विरोध : एक नियंत्रक यंत्रणा शेवटचे गाळणे आहे ते कम्युनिझमविरोधाच्या तत्त्वज्ञानाचे. संपत्तिवानांना कम्युनिझम हा …

संमतीचे उत्पादन: प्रसारमाध्यमांचे राजकीय अर्थशास्त्र (पूर्वार्ध)

प्रसारमाध्यमे म्हणजे सर्वसामान्य जनतेला संदेश व प्रतीके यांचे संज्ञापन करून देणारी एक व्यवस्था. समाजाच्या संस्थात्मक रचनांमध्ये एकात्मता पावण्यासाठी जी मूल्ये, श्रद्धा व संकेत माणसाला आवश्यक असतात ती रुजवण्यासाठी तसेच त्याला माहिती व ज्ञान देण्यासाठी आणि त्याचे मनोरंजन करण्यासाठी माध्यमे काम करतात. वर्गहिताचे तीव्र संघर्ष आणि एकवटलेली अर्थसत्ता यांच्या जगात माध्यमांना हे कार्य करण्यासाठी पद्धतशीर प्रसार …