माधव गाडगीळ - लेख सूची

विकास साधू या विवेकानं!

विकास आज देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात विकास हा कळीचा मुद्दा बनला आहे. भरघोस बहुमतानं निवडून आल्यावर घेतलेल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते: ‘सरकार विकासाचं जनांदोलन उभारेल.’ खूष झालो. विचार केला की, आधीच्या सरकारनं विपर्यास केलेल्या आमच्या पश्‍चिम घाट परिसरतज्ज्ञ गटाच्या शिफारशींना आता न्याय दिला जाईल, कारण हा अहवाल म्हणजे सर्व सह्यप्रदेशात विकासाचं जनांदोलन …

लोकाभिमुख प्रगती

निसर्गाचे मनापासून रक्षण केले आहे लोकांनी. अमेरिकेत, युरोपात, जपानात पर्यावरणाच्या रक्षणाची पावले उचलली गेली, ती सारी लोकांच्या पुढाकारातून. ह्या पर्यावरणाच्या प्रेमातून जगभर दुसरीही एक चळवळ सुरू झाली. माहिती हक्काची. वेगवेगळ्या देशांत गेल्या काही दशकात माहिती हक्काचे कायदे पारित करून घेण्यात पर्यावरणवाद्यांनीच मुख्य भूमिका बजावलेली आहे. ही माहिती हक्काची चळवळ लोकशाहीच्या पुढच्या टप्प्यातल्या प्रगतीचे एक महत्त्वपूर्ण …

गोष्ट माणसाची, सांस्कृतिक उत्क्रांतीची

जीवन म्हणजे ‘एकमेकां साह्य करूं अवघे धरू सुपंथ’ असा सहयोगाचा प्रवास आहे ? का जीवन म्हणजे एक संघर्ष आहे ? एकमेकांचे गळे कापत ही यात्रा सुरू आहे ? जीवसृष्टीच्या इतिहासाच्या, उत्क्रांतीच्या अभ्यासकांपुढे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जीवनात नक्कीच सहकारही आहे. संघर्षही आहे. नेहमी संघर्षाबद्दल खूप बोलले जाते; पण जीवशास्त्राचे ज्ञान जसजसे सखोल होत चालले …

साकल्यवाद, संक्षेपणवाद आणि विज्ञान

मी शाळकरी मुलगा असताना बालकवींच्या ‘फुलराणी’च्या प्रेमात पडलो: हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती ! ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या ओढीनेच मी अखेर परिसरशास्त्राकडे वळलो. मग सारे आयुष्य हिरवाई पाहत, फुले निरखत, वृक्षांची मापे घेत, वनस्पती जमवत आणि त्यांचे विच्छेदन करत, त्यांच्यातला हिरवा रंग काढून तो स्पेक्ट्रोफोटोमीटर …

विज्ञानाचे रूपांतरण

कालिदासाच्या ‘शाकुंतला’त एक प्रसंग आहे. दुष्यंत शिकारीच्या नादात कण्वाच्या आश्रमाजवळ येऊन हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमवासी त्याला सांगतात की तसे करू नये, कारण पवित्र वनांत प्राण्यांची व झाडांची हिंसा निषिद्ध आहे. 1801 सालानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस बुकॅनन कारवारच्या देवरायांबाबत लिहितो की देवरायां-मधील झाडे तोडायला गावप्रमुखामार्फत देवाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी फुकट मिळते, पण ती …