विनोबा - लेख सूची

धर्म-विचार

मनुष्य रोज खातो-पितो, भोग भोगतो, हें सगळें तो करत असतो. पण एक दिवस एकादशीचा उपवास करतो आणि त्याच्या चित्ताचें समाधान होतें. मुसलमान लोक रमजानच्या दिवसांत उपवास करतात. एकादशीच्या किंवा रमजानच्या नांवाने खाणें सोडणारा मनुष्य हाच एक प्राणी आहे. याचा अर्थअसा की मनुष्याला केवळ खाण्या-पिण्यात किंवा भोग भोगण्यात जीवनाचीं सार्थकता वाटत नाही. तो जेव्हा आपल्या इंद्रियांवर …

कर्मयोगातील हानी

कर्मयोगातील हानी — विनोबा … आपल्या संस्थांचा जीवनरस उडून जात आहे, त्याचे कारण स्वाध्यायाचा अभाव हे आहे. आपण कर्मयोगात पडलो आहोत. कर्मयोगात लाभाबरोबर हानीहि होते. शंकराचार्य, रामानुज, बुद्ध, महावीर आदींच्या अनुयायांचे जे काही दोष होते, ते आपण सुधारले आहेत ही गोष्ट खरी. आपण कर्मयोगावर जास्त जोर दिला. ही सुधारणा जरुरीची होती. परंतु ते लोक आत्मज्ञानात …

विज्ञान व इंग्रजी

विज्ञान व इंग्रजी अत्यंत अस्वाभाविकरीत्या येथे इंग्रजी भाषा लादण्यात आली. त्यामुळे हे इंग्रजी शिक्षण फारच थोड्या लोकांपर्यंत पोहचू शकले. दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये फक्त 10 टक्केच लोक हे शिक्षण घेऊ शकले आणि 90 टक्के लोक त्यापासून वंचित राहिले. सामान्य जनतेचे अशा रीतीने दोन विभाग पडले. काही शिक्षित झाले आणि बाकीचे अशिक्षितच राहिले. परिणाम असा झाला …

मातृहस्तेन भोजनं – मातृमुखेन शिक्षणम्

मातृहस्तेन भोजनं – मातृमुखेन शिक्षणम् चर्चा चालली आहे की शिक्षणाचे माध्यम काय असावे? शिक्षण मातृभाषेद्वारा द्यावे की इंग्रजीद्वारे? परंतु मला तर हा प्रश्नच विचित्र वाटतो. ह्यात विचारण्यासारखे काय आहे? डात दोन मते कशी असू शकतात हे मला समजत नाही. गाढवाच्या बछड्याला जर विचारले की तला गाढवाच्या भाषेत ज्ञान देऊ की सिंहाच्या भाषेत? तर तो काय …

आपल्या भाषा पुरेश्या विकसित आणि समर्थ आहेत

कित्येक लोकांच्या मनात असा भ्रम आहे की आपल्या भाषा पुरेश्या समर्थ नाहीत आणि आजच्या जमान्यात सर्व व्यवहार आपल्या भाषेत चालू शकणार नाहीत. हा भ्रम पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. हे मी आपल्या भाषेच्या अभिमानामुळे केवळ सांगत नाही; परंतु हीच खरोखर वस्तुस्थिती आहे. खरे पाहता आपल्या भाषा खूपच विकसित भाषा आहेत. शेकडो वर्षांपासून आपल्या सर्व भाषांचा विकास …

थोडेसुद्धा ‘बहु’ आहे

“शेतकीतून मिळालेले थोडेसुद्धा ‘बहु’ आहे. कारण ते थोडे झाले तरी नवीन पैदाशीचे आहे. बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी. त्यात नवीन कमाई नाही. द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे. त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही. परंतु शेतकऱ्याच्या कमाईच्या हरएक कणात साक्षात् लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मी निराळी, पैसा …