खादी - लेख सूची

खादी (भाग १)

: एक प्रकट चिंतन आपल्या नोव्हेंबर २०००च्या अंकात खादी एका तत्त्वप्रणालीमधली कडी राहिली नसून तिचे आता फडके झाले आहे असे वाचले. पण त्यात संपादक नवीन काही सांगत नाहीत. खादीचे फडके कधीचेच झाले आहे. त्या गोष्टीला ५० वर्षे उलटून गेली आहेत. रिबेटची कुबडी ज्या दिवशी खादीने स्वीकारली त्या दिवशी किंवा त्या अगोदरच खादी निष्प्राण झाली होती. …

खादी (भाग २)

खादी ही जशी एक वस्तू आहे तसा तो एक परिपूर्ण विचार आहे. हा विचार समतेचा, स्वयंपूर्णतेचा तसा ग्रामस्वराज्याचा आहे. समतेचा अशासाठी की खादीमुळे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होऊन कातणाराला दरिद्रनारायणाशी एकरूप होता येते. स्वयंपूर्णतेचा अशासाठी की त्यामुळे कमीतकमी परावलंबन घडते; आणि ग्रामस्वराज्याचा अशासाठी की त्यामुळे परक्या देशांच्या किंवा शहरवासी भांडवल-दारांच्या शोषणातून ग्रामवासी मुक्त होतो. खेड्यांमधला पैसा …

खादी (भाग ३)

गरज आणि उत्पादन खादीग्रामोद्योगप्रधान समाजरचनेमुळे खेड्यापाड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो, तो शहरांत जात नाही आणि पैसा खेड्यांतच खेळल्यामुळे शहरे त्यांचे शोषण करू शकत नाहीत अशा जो एक समज आहे —- आणि हा समज विकेन्द्रित अर्थव्यवस्थेचे म्हणजे खादीग्रामोद्योगांचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो —- तो आता तपासून पाहू. तसे करताना पैसा म्हणजे काय आणि शोषण कशामुळे होते हे …

खादी (भाग ४)

सगळ्या महाग वस्तू फुकट! मागच्या लेखांकामध्ये संघटित उद्योग जेव्हा उत्पादन खपवितात तेव्हा ते आपला माल ग्राहकांवर लादत असतात असे एक विधान आहे आणि त्या पाठोपाठ हा लादलेला माल ग्राहकाला फुकट पडतो असे दुसरे विधान आहे. ह्या विधानांचे विवेचन ह्या नंतर करावयाचे आहे. माणसांच्या मनाची ओढ सुधारलेल्या जीवनमानाकडे आहे हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. पशृंमध्ये आणि …

खादी (भाग ५)

स्वावलंबन म्हणजे काय? मागच्या लेखांकामध्ये दोनतीन महत्त्वाचे मुद्रणदोष राहिले आहेत, त्याचप्रमाणे त्याची भाषा निष्कारण बोजड झाली आहे. हा विषय लिहिताना तो कसा मांडावा ह्याची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे, फार विस्तार करण्याची इच्छा मुळांत नसल्यामुळे आणि डोक्यांत विचारांची गर्दी झालेली असल्यामुळे लेखनात बांधेसूदपणा नाही, विस्कळीतपणा आहे ह्याची मला जाणीव आहे. लेखनातील ह्या दोषांकडे लक्ष न देता त्याच्या …

खादी (भाग ६)

खादी आणि रोजगार खादी आणि रोजगार ह्या दोन संकल्पनांची सांगडच बसू शकत नाही. तत्त्व म्हणून खादी स्वीकारल्यानंतर तिचा विचार रोजगारनिर्मितीसाठी करता येणार नाही असे माझे मत आहे. (पण माझे हे मत पूर्णपणे चुकीचे असू शकते आणि त्यासाठी ते तपासून पाहणे आवश्यक आहे.) खादीचा रोजगाराशी ३६ चा आकडा आहे. खादी ही स्वावलंबनासाठी आहे. रोजगार-निर्मितीसाठी नाही. कातणाऱ्याने …