बंडखोर पंडिता - लेख सूची

बंडखोर पंडिता (भाग १)

पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी …

बंडखोर पंडिता (भाग २)

एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असे रमाबाईंचे जीवनचरित्र आहे. कलकत्याहून रमाबाई पुण्याला आल्या खर्या , पण मध्यन्तरी अशा काही घटना घडल्या की कदाचित् त्या कधीच पुण्याला आल्या नसत्या. कारण त्यांनी लग्न करून आसामात सिल्चर येथे संसार थाटला होता. हे लग्नही जगावेगळे होते. त्यांचा भाऊ श्रीनिवास याचे एक बंगाली मित्र बिपिनबिहारी दास मेधावी यांनी त्यांना मागणी घातली …

बंडखोर पंडिता (भाग ३)

रमाबाईंनी हिंदू धर्म सोडला, पण हिंदुस्थानची नाळ तोडली नाही, बाईंनी हिंदुसंस्कृतीचा त्याग केला नाही याची विपुल उदाहरणे त्यांच्या चरित्रात आहेत. ‘तुमचे आईवडील सद्धर्माने (ख्रिस्ती धर्माने) देऊ केलेल्या तारणाला वंचित झाले’, असे कुणीसे म्हणाले. त्यावर ताड्कन त्या उत्तरल्या : ‘माझे आई-वडील इतके परमेश्वरभक्त, कनवाळू व सच्चरित्र होते की, त्यांच्या बाबतीत असा संशय व्यक्त केला तरी मला …

बंडखोर पंडिता (भाग ४)

आगरकरांनीही अखेर पाठिंबा काढून घेतला ही गोष्ट रमाबाईंना लागली असणार. ज्या समाजात मोठमोठ्या धुरंधर नेत्यांबरोबर त्यांची उठबस होती, ज्योतिबा फुल्यांसारख्या बहुजनसमाजातल्या सुधारक कार्यकत्र्यापासून तो केरूनाना छत्र्यांसारख्या ज्योतिर्विद पंडितापर्यंत सर्वांच्या कौतुकादराचा विषय त्या झालेल्या होत्या, त्या समाजापासून त्या तुटत जाऊन एखाद्या मठस्थ जोगिणीचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. तेही त्यांनी शांतपणे पत्करले. यानंतर १८९६ सालची गोष्ट. आता …