मासिक संग्रह: सप्टेंबर, १९९२

पत्रव्यवहार

श्री. संपादक,
आजचा सुधारक स.न.वि. वि.
श्री केशवराव जोशी यांना पळशीकरांनी दिलेले उत्तर वाचले (आजचा सुधारक, ऑगस्ट ९२). सावरकरांची ‘धार्मिक-सामाजिक सुधारणेमागची प्रेरणा …. माणसांना कडवी, आंधळी, निरुंद, निर्दय, वैरवृत्तीची बनविणारी, विध्वंसक व विनाशक होती, असे पळशीकर म्हणतात. हिंदुसमाज बलवान करण्यासाठी सावरकरांना समाजसुधारणा हवी होती, त्यामागे न्याय, माणुसकी ही प्रेरणा नव्हती, असा आरोप समोर ठेवून पळशीकरांनी हे विधान केलेले आहे.
मी थोडाबहुत सावरकर वाचलेला आहे. अस्पृश्यता पाळणे म्हणजे ‘मनुष्यत्वाविरुद्ध अत्यंत गर्छ असा अपराध करणे होय असे सावरकर म्हणतात (खंड ३, पृ.४८३). न्यायाच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने, माणुसकीच्या दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे.

पुढे वाचा

पुस्तक परिचय -सावरकर ते भाजपः हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख

सावरकर ते भा. ज. प. हा ग्रंथ छोटेखानी दिसत असला तरी त्याचा आवाका मोठा आहे. किमान १९२० पासून १९९२ पर्यंत म्हणजे अंदाजे सत्तर-पंचाहत्तर वर्षांचा कालखंड त्यामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. भारताला भेडसावणाच्या मुस्लिम प्रश्नाचे त्यामध्ये केलेले चित्रण बरेचसे यथातथ्य आहे. काही ठिकाणी मात्र थोडे जास्त अतिसामान्यीकरण (overgeneralization) झाल्यासारखे वाटते.
ग्रंथाची रचना बांधेसूद आहे. लेखकाने त्याचा आरंभ मुस्लिम प्रश्नापासून करून आपल्या प्रतिपाद्य विषयाचा भरभक्कम पाया रचला आहे. हिन्दुराष्ट्रवाद किंवा हिंदुत्व हा विचार मुख्यतः मुसलमानांकडून (आणि गौणतः ख्रिश्चनांकडून) होणार्यार आक्रमणाची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाला आहे आणि आजही त्याचा मुख्य संदर्भ मुस्लिम प्रश्नाचाचआहे असे लेखकाचे मत आहे.

पुढे वाचा

चर्चा -गीता, मनुस्मृति व प्राध्यापक देशपांडे

ऑगस्ट ९२ च्या आजच्या सुधारकमध्ये प्रा. देशपांडे यांनी त्यांच्या गीतेवरील लिखाणावर मी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर दिल्याचा दावा मांडला आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे गीतेने नीतीच्या मूलभूत प्रश्नांना बगल दिलेली नसून देशपांड्यांनी मात्र माझ्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिली आहे. दोन कर्तव्यांत संघर्ष कसा टाळावा या प्रश्नाचे उत्तर त्यांना गीतेत सापडत नाही, मी दाखवून दिल्यावरही सापडत नाही. दुष्टांना शासन करण्यासाठी युद्ध करणे व शासनयोग्य स्वजनांना शासन न करता, आपण स्वजनांवर हात उगारला नाही याचे समाधान मिळविणे या दोन कर्तव्यांत अर्जुनापुढे संघर्ष होता. या संघर्षाची सोडवणूक गीतेने ‘लोकसंग्रह व ‘सर्वभूतहित’ हे दोन नीतीचे उद्देश सांगून केली आहे.

पुढे वाचा

चर्चा-डॉ. प्रदीप पाटील यांना उत्तर

डॉ. प्रदीप पाटील यांनी (आजचा सुधारक मे-जून ९२) उपस्थित केलेल्या तेरा मुद्द्यांसंबंधी लिहिण्याची सुरुवात शेवटल्या वाक्यातील वैज्ञानिक’ या शब्दापासून करतो.
तंत्रवैज्ञानिक मार्ग वा उपाय म्हणजे काय हे चटकन कळते. वैज्ञानिक मार्ग म्हणजे काय?
आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या मर्यादेत बोलावयाचे तर भौतिक जगाविषयीचे एका विशिष्ट प्रकारचे ज्ञान म्हणजे (आधुनिक पाश्चात्य) विज्ञान होय. हे ज्ञान पक्के असते व ते स्थलकालनिरपेक्ष (युनिव्हर्सल) असते. या ज्ञानाचा उपयोग करून एखादा प्रश्न सोडवला गेल्यास वैज्ञानिक मार्गाने प्रश्न सोडविला असे म्हणता येईल. मग वैज्ञानिक = तंत्रवैज्ञानिक असे समीकरण होईल.

पुढे वाचा

कालचे सुधारक: नव्या मनूचे वात्स्यायन : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग १)

कर्व्यांचे प्रेरणास्थान आगरकर होते. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हा आगरकरी बाणा. तो कर्व्यांच्या अंगी इतका भिनला होता की त्यांचे जीवन ही एकझपाटलेल्या सुधारकाची जीवनकहाणी वाटावी. आगरकर १८९५ साली वारले. कर्वे १८९७ साली संपूर्ण मुंबई इलाख्यात मॅट्रिकला पहिले आले, कॉलेजात सतत गणितात पहिले येत गेले. फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी गणिताचा आणखी विशेष अभ्यास केला. एल्फिन्स्टन, डेक्कन अशा सरकारी आणि विल्सन कॉलेजसारख्या नामांकित मिशनरी कॉलेजांत मिळत गेलेल्या नोकऱ्या त्यांनी सोडल्या. आणि स्वतःला प्राणप्रिय, पण समाजाला अत्यंत अभद्रआणि ओंगळ वाटणार्यान कार्यासाठी त्यांनी कायम अर्धबेकार आणि ओढघस्तीचे जिणे पत्करले.

पुढे वाचा

डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीतिविचारावरील आक्षेप

आजचा सुधारकच्या जुलै अंकात डॉ. के. रा. जोशी यांनी मी केलेल्या विवेकवादी नीतिविचाराच्या मांडणीवर ती भोंगळ असल्यास आरोप केला असून त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक युक्तिवादही सादर केले आहेत. त्यांना उत्तर देण्यापूर्वी प्रथम डॉ. जोशी यांचे आभार मानणे मी आपले कर्तव्य समजतो. त्यांनी माझ्या लिखाणावर आक्षेप घेतले याचा अर्थ ते त्यांनी वाचले, आणि नुसतेच वाचले नाहीत तर ते काळजीपूर्वक वाचले (कारण आक्षेप घेण्याकरिता ते अवश्यच असते), आणि त्यावर आक्षेप घेण्याच्या लायकीचे ते आहेत असे त्यांना वाटले. गंभीर लिखाण वाचणारे लोक अतिशय दुर्मिळ असलेल्या या काळात वरील गोष्ट मला फार स्वागतार्ह वाटते, आणि म्हणून मी त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

पुढे वाचा

आपण काय करावे?

आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि जगाकडे ताठ मानेने पाहिले पाहिजे. जगातील चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, त्यातील सौंदर्य आणि कुरूपता- या सर्व जशा आहेत तशा निर्भयपणे आपण स्वीकारल्या पाहिजेत. जग बुद्धीने जिंकायचे आहे, त्यातील भयप्रद गोष्टींनी गुलामांप्रमाणे पराभूत होऊन नव्हे. परमेश्वराची सबंध कल्पना पूर्वेकडील सर्वशक्तिमान हुकूमशहांच्या अनुभवातून निर्माण झालेली असून ती स्वतंत्र मनुष्याला मुळीच शोभणारी नाही. जेव्हा माणसे चर्चमध्ये स्वतःला दीन पापी म्हणून लोळण घेतात, तेव्हा ते तिरस्करणीय, स्वाभिमानी मनुष्याला न शोभणारे असते. आपण ताठ उभे राहून जगाकडे निर्भयपणे पाहू या, जगाचा पुरेपूर उपयोग करू या; आणि ते जर आपल्याला कुठे उणे वाटले तर ती उणीव दूर करू या.

पुढे वाचा