मासिक संग्रह: मार्च, १९९७

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपल्या मासिकाचा एक फार जुना वाचक आहे. जो विवेकवाद आपल्या लेखांमधून आपण वेळोवेळी मांडला आहे तो सगळा मी काळजीपूर्वक वाचला आहे आणि तो मला पटला आहे. त्यामुळे मी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत साशंक झालो आहे. एवढेच नाही तर त्यामुळेच मी कोणत्याही एका धर्माचा अनुयायी नाही असे मानू लागलो आहे. माणूस आपल्या जातीने किंवा धमनि सांगितलेले आचार सोडून देऊ शकतो व आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपले आचरण ठरवू शकतो असे मला वाटू लागले आहे.
पण तरीसुद्धा मला एक गुंता सोडविता आलेला नाही; आणि त्यासाठीच हे पत्र आपणाला पाठवीत आहे.

पुढे वाचा

संवेदनशैथिल्य आणि सामाजिक आरोग्य

मनुष्यजातीच्या वृत्तीतला थंडपणा, जाणिवांचा बोथटपणा वा कोडगेपणा याला मी संवदेनशैथिल्य असे म्हणते.
संवदेनशील असणे, संवेदनांना सचेतन करणे किंवा उत्तेजना देणे (stimulation) हे माणसाच्या विकासासाठी व वाढीसाठी अत्यावश्यक असते. अशी उत्तेजना (Stimulation) जर वातावरणामधून मिळाली नाही तर माणसात मानसिक व शारीरिक गोंधळ निर्माण होतो. त्यातून विकृती निर्माण होऊ शकते. या उत्तेजनाही विविध प्रकारच्या असल्या तरच माणसाचे कुतूहल, काहीतरी करण्याची आस व इच्छा व निरनिराळे शोध लावण्यासाठी लागणार्याह ऊर्मी जागृत होऊ शकतात, अन्यथा नाही. अशा ऊर्मी जागृत होणे, ही आजच्या समाजात एक दुरापास्त गोष्ट होत चालली आहे.

पुढे वाचा

माझे शिक्षक

एकोणीसशे एकोणचाळीस सालच्या हिवाळ्याच्या सुरुवातीचा दिवस होता. आमच्या ‘अपार्टमेंट’च्या बाहेर वार्यावने पाने उडत होती. घरातल्या उबेत, सुरक्षिततेत बसायला बरे वाटत होते. शेजारच्या खोलीत आई स्वयंपाक करत होती. वडील लवकरच परतणार होते. आई माझ्याजवळ आली आणि आम्ही दोघे मावळत्या सूर्याच्या प्रकाशात बाहेर पाहायला लागलो.
“बाहेर भांडतायत माणसं, मारतायत एकमेकांना”, आई अटलँटिक समुद्राकडे हात दाखवत म्हणाली. मी निरखून पाहिले, म्हणालो, “माहीत आहे मला – मला दिसत आहेत ती.
आई जरा कडकपणे म्हणाली, “काही दिसत नाही आहे तुला. फार दूर आहेत ती.” माझ्या मनात आले, की इतक्या ठामपणे कसे सांगते आहे ती, की मला काही दिसत नाही आहे?डोळे

पुढे वाचा

नैतिक बुद्धिमत्तेचा विकास

दक्षिण कोरियातील किम उंगयोंग या चार वर्षांच्या मेधावी बालकाच्या बुद्धिमत्तेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९६८ सालीच घेतलेली अनेकांना परिचित असेल. हा मुलगा वयाच्या चौघ्या वर्षापासूनच कविता करीत असे, चार भाषांमध्ये अस्खलितपणे संभाषण करी आणि टेलिव्हिजनवर त्याने इन्टिग्रल कॅलक्युलसचे प्रश्न सोडविण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते. ह्या मुलाचा टर्मन बुद्धयंक २१० मानण्यात आला होता. याचप्रमाणे इंग्लिश तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल तसेच जर्मन कवी वुल्फगांग गटे यांचाही बुद्धयंक २०० च्या वरच असावा असे सांगण्यात येते. सामान्य माणसांचा बुद्धयंक १०० ते १४० या दरम्यान आढळतो.

पुढे वाचा

विक्रम, वेताळ आणि समान नागरी कायदा

वेताळ : राजा, आजच्या सुधारकाचा ‘समान नागरी कायदा विशेषांक’ वाचलाच असशील ना? विक्रम : (गर्वाने) हो, तर! मी तर ताबडतोब माझ्या कायदेमंत्र्याला सांगून एक ‘आदर्श’ असासमान नागरी कायदा राज्यात लागूही केला. विद्वानांच्या सूचना मी नेहमीच तत्परतेनेअंमलात आणतो.
वेताळ: राजा, तू विद्वानांच्या सूचनाच फक्त अंमलात आणतोस, की त्याप्रमाणे केलेले कायदेहीअंमलात आणतोस?
विक्रमः (गडबडून) मला समजला नाही, तुझा प्रश्न.
वेताळ: (एक दीर्घ उसासा टाकून) म्हणजे तुला प्राथमिक शाळेतल्या नागरिकशास्त्राचे धडे पुन्हाघालून द्यायला हवेत! ऐक. समाजाने पाळायचे कायदे स्पष्टपणे घडवणे, त्याकायद्यांप्रमाणेसमाजाला वागायला लावणे, आणि जे लोक कायदे तोडताना दिसतात त्यांना न्याय देणे; या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

पुढे वाचा

परंपरा, प्रगती, आधुनिकता वगैरे …

आपले पूर्वज फार थोर होते, ज्ञानी होते, असे समजणारा समाज परंपरापूजक असतो. धर्माच्या नावाखाली जे चालत आले आहे त्याला चिकटून राहावे; स्वतंत्रबुद्धी चालवू नये, ही सामान्य माणसाची मनोवृत्ती. शिवाय आणखी एका कारणाने भारतीय माणूस पारंपरिक बनतो. चाणक्य इष्ट गोष्टी धर्माच्या नावाने प्रसृत कराव्यात असा सल्ला देतो. तो म्हणतो, कन्येला चांगल्या कुळात, पुत्राला विद्येत, शत्रूला संकटात आणि इष्ट गोष्टींना धर्माच्या आवरणात बसवावे. चालत आलेली रीत, परंपरा निरर्थक वाटली तरी हा ती पुढे चालवतो. कोणी सांगावे, पूर्वजांनी कोणत्या हेतूने अमुक धर्म सांगितला असेल?म्हणून,

पुढे वाचा

प्रा. ठोसर, प्रा. एकल्स आणि ईश्वर

या मासिकाच्या जानेवारी ९७ च्या अंकात प्रा. बा. वि. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात कार्ल पॉपर हे विज्ञानाचे तत्त्वज्ञानी आणि जॉन एकल्स हे विख्यात मज्जाशास्त्रज्ञ या दोघांनी मिळून लिहिलेल्या The Self and its Brain ह्या पुस्तकाचा उल्लेख करून प्रा. ठोसर म्हणतात की हे पुस्तक जरी या दोघांनी मिळून लिहिले असले तरी त्यांच्या मनांत एक मोठा भेद आहे. तो म्हणजे पॉपर पूर्ण नास्तिक आहेत, तर एकल्स आस्तिक आहेत.

पुढे वाचा

जुलमी सरकार वाघांहून भयंकर

थाई पर्वताच्या बाजूने जाताना कन्फ्यूशसला एक स्त्री एका थडग्याजळ धाय मोकलून रडताना दिसली. प्रभू तिच्याकडे गेले आणि त्यांनी त्सेलूला तिची विचारपूस करण्यास सांगितले. तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विलापावरून तुझ्यावर दुःखाचा कडेलोट झाला आहे असे वाटते.’ ती म्हणाली, “खरे आहे. माझ्या नवर्याुचे वडील येथे वाघाने मारले. माझा नवराही तसाच गेला. आणि आता माझा मुलगाही त्याच प्रकारे मारला गेला आहे. प्रभूने विचारले, ‘मग तू ही जागा सोडून दुसरीकडे का बरे जात नाहीस?’ ‘इथे जुलमी सरकार नाही -‘ तिने उत्तर दिले. प्रभू नंतर म्हणाले, ‘मुलांनो, हे लक्षात ठेवा, जुलमी सरकार वाघापेक्षाही जास्त भयंकर असते.

पुढे वाचा