मासिक संग्रह: मे, 1998

स्फुट लेख

२१ मार्च ९८ च्या ‘साधना’ साप्ताहिकात ‘लग्न जे कधी झालेलेच नसते’ या नावाचा एक लेख श्रीमती कुसुम पटवर्धन यांनी लिहिला आहे. याच विषयावर २८ मार्चच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत एक टिपण आले आहे.
मुळात लग्न झालेले नसताना लग्नाचे खोटे दस्तऐवज तयार करून मुलींचे जे शोषण सुरू झाले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या लेखांत दिली आहे. तो सारा वृत्तान्त वाचून दु:ख झाले, पण नवल मात्र वाटले नाही. न्यायपालिकेचा उपयोग अन्याय्य कामासाठी करण्याचा जो भारतीय नागरिकांचा स्वभाव आहे तोच त्या प्रसंगातून प्रकट झाला आहे.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय : एकविसाव्या शतकाची तयारी (भाग १)

Preparing for the Twentyirst Century हे पॉल केनेडी या अमेरिकेतील येल विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापकाचे अतिशय लक्षणीय आणि महत्त्वाचे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले. त्यात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीपुढे कोणत्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, कोणती भयस्थाने आणि कोणती आशास्थाने तिच्यापुढे उभी राहणार आहेत, यांचे अत्यंत विचारप्रवर्तक आणि समर्थ विवेचन लेखकाने केले आहे. लेखक अतिशय विद्वान असून आपल्या विषयात निष्णात आहे. पुस्तकातील विषयाशी संबद्ध शेकडो ग्रंथ, जन्ममृत्यूची कोष्टके, जगात होत असलेले संपत्तीचे उत्पादन आणि तिचा उपभोग याविषयीचे तक्ते (charts) पुस्तकात सर्वत्र विखुरलेले आहेत.

पुढे वाचा

ताज्या निवडणुकांचा संदेश

दोन वर्षांच्या काळातच पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या व दुसर्‍यांदा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली. कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. अनेक प्रादेशिक पक्षांचे उमेदवार निवडून आले. त्यातून निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की या प्रादेशिक पक्षांची मदत घेतल्याशिवाय कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला सत्तेवर येणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय पक्षाचे सरकार किती दिवस टिकवायचे हे आता प्रादेशिक पक्ष ठरवणार अशी अभूतपूर्व स्थिती आज निर्माण झाली आहे व हेच ताज्या लोकसभा निवडणुकांचे प्रधान वैशिष्ट्य आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

धर्म व जात यांच्या आधारे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता.

पुढे वाचा

रोजगार हमी योजना (रोहयो)

रोजगार हमी योजना सुरू झाल्याला जवळ-जवळ पंचवीस वर्षे होऊन गेली. त्यामुळे ह्याबाबत पुनर्विचार करणे फार महत्त्वाचे झाले आहे. रोहयोचे महत्त्व जाणूनच जगभर ह्या योजनेचे मूल्यमापन झाले व त्यात काही दोष असले तर ते काढून टाकून ही योजना राबवावी असा एक सूर होता. अर्थात बदलत्या राजकीय परिस्थितीत कोठल्याही विधायक कार्याची उपेक्षा होते आहे त्यात रोहयोचीही झाली आहे असे वाटल्यास आश्चर्याचे कारण नाही. कोठला कार्यक्रम आजच्या परिस्थितीत जोमाने उभा राहू शकेल ? परंतु गरिबी हटविणे व ग्रामीण लोकांचा लोंढा नागरी भागात जाऊन अनागोंदी न माजु देणे ह्या दोनही गोष्टींसाठी रोहयोचा उपयोग करवून घेणे शक्य होते.

पुढे वाचा

पर्यटन-व्यवसायातील एक अपप्रवृत्ती : बालवेश्या

अलीकडे नवीन आर्थिक सुधारणांबाबत खूप चर्चा होत आहे. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण व परकीय भांडवल गुंतवणूक ही या आर्थिक सुधारणांची मुख्य सूत्रे आहेत. भारताने हे नवे आर्थिक धोरण १९९१ पासून स्वीकारले आहे. भारताप्रमाणेच इतर ब-याच विकसनशील देशांत या धोरणाचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे हे देश विकसित संपन्न देशांकडून जास्तीत जास्त भांडवल (जास्तीत जास्त परकीय चलन) कसे मिळवावे यांबाबत
आटोकाट प्रयत्न करीत आहेत. वस्तूंची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्याचा रूढ मार्ग सगळे देशच वापरतात. पण गेल्या २५/३० वर्षांत पुष्कळ देशांनी आपले परकीय चलन वाढविण्यासाठी पर्यटन-व्यवसायाचा विकास व विस्तार करण्याचे धोरण ठेवले आहे पण ब-याच ठिकाणी पर्यटन विकासाच्या निमित्ताने बरीच लहान मुले (विशेषत: मुली) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात आणून ती भाड्याने देणे किंवा विकणे असे लांच्छनास्पद प्रकार घडत आहेत.

पुढे वाचा

विज्ञानाची शिस्त

वैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे ठरणे, या क्रमाने ‘सिद्ध झालेल्या गोष्टीबद्दल वाद असेलच कसा?
गंमत म्हणजे ही विज्ञानाच्या निर्विवाद असण्याची बाब फार सामान्य पातळीवरच्या विज्ञानाबाबतच खरी आहे. पाणी किती तापमानाला उकळते, यावर प्रयोग करून ते तापमान कोणते, हे सिद्ध करणे तसे सोपे असते.

पुढे वाचा

देवाशी भांडण

कालनिर्णय दिनदर्शिकच्या १९९८ च्या अंकामध्ये प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचा ‘देवाशी भांडण’ हा लेख आला आहे. आम्हा विवेकवाद्यांना त्याची दखल घेणे, त्याचा परामर्श घेणे भाग आहे. तेवढ्यासाठीच मागच्या अंकामध्ये श्रीमती सुनीति देव ह्यांचा लेख प्रकाशित केला आहे. आज आमचे देवाशी भांडण आहे की नाही व असल्यास का हे येथे आणखी एका दृष्टिकोनातून मांडत आहे.
प्रा. रेग्यांचा पूर्ण लेख ‘कालनिर्णय’मध्ये आला नसावा, पानाच्या मांडणीसाठी त्याची काटछाट झाली असावी अशी शंका येते, पण वाचकांच्या समोर फक्त मुद्रित भाग असल्यामुळे त्यावरच आपले मत मांडणे भाग आहे.

पुढे वाचा

जेथे श्रद्धा हेच ज्ञान असते

व्हॉल्तेर प्रमाणेच दीदरोलाही पाट्यांची चीड येत असे. व्हॉल्तेरने एके ठिकाणी म्हटले आहे. लोकांची श्रद्धा हेच त्यांचे ज्ञान’, दीदरो म्हणतो, त्यांच्या (पाद्रयांच्या) धंद्यामुळे त्यांच्या अंगात ढोंग, असहिष्णुता आणि क्रूरता हे गुण उत्पन्न होतात. पायांची शक्ति राजापेक्षाही अधिक, कारण राजा सामान्य लोकांना पदव्या देऊन बडे लोक बनवतो, पण पाद्री देवांना उत्पन्न करतो. पाढ्यापुढे राजालाही मान वाकवावी लागते. काही देशांत धर्मोपदेशक रस्त्यात नग्न हिंडतात आणि स्त्रियांना त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांच्या X X X चे चुंबन घ्यावे लागते. फ्रान्समध्ये होत नसले तरी पाद्री वाटेल तेव्हा ईश्वराला आकाशातून पाचारण करू शकतो आणि स्वत:पुढे तो इतरांना कस्पटासमान लेखतो.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

नाव नसलेला धर्म
आ.सु. हे जरी बुद्धिवादी लोकांचे मासिक असले तरी त्याच्या लेखक-वाचकांच्या घरी काही धार्मिक आचार होत असावेतच असा माझा अंदाज आहे. निदान माझ्या घरी तरी असे आचार होत असतात. पण तुमच्या-आमच्या या धर्माला (आजकालच्या फॅशनप्रमाणे त्याला उपासनापद्धती म्हणायचे) काही नावच राहिलेले नाही याचा मला नुकताच साक्षात्कार झाला. त्याचे असे झाले की ३ एप्रिल रोजी हैदराबादला प्रज्ञाभारती या संस्थेच्या विद्यमाने एक विचारसत्र घडवले गेले. विषय होता “हिंदुत्व आणि धार्मिक अल्पसंख्य गट’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उप-सर-कार्यवाह श्री सुदर्शन यांनी हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान विशद करताना म्हटले की हिंदू हा शब्द प्रथम परकीयांनी चलनात आणला आणि तेव्हापासून त्याचा अर्थ भारतीय असा आहे; भारतात निर्माण झालेला विचारप्रवाह म्हणजे हिंदुत्व असाच अर्थ घ्यायला पाहिजे; ‘राष्ट्रीय विचारधारेशी समरस होऊ इच्छिणाच्या मुसलमानांनीसुद्धा स्वत:ला हिंदू । म्हणवून घ्यायला कचरू नये वगैरे.

पुढे वाचा