मासिक संग्रह: सप्टेंबर, २००१

मेंदू, भावना, सहजप्रवृत्ती, नैवेद्य वगैरे

मेंदूची रचना आणि कार्य यांचा अभ्यास दाखवतो की मेंदू आणि संगणक या एकाच नमुन्याच्या रचना आहेत. बाहेरून मिळणाऱ्या संवेदना आणि स्वतःत साठलेले सूचनांचे संच यांच्यावर तार्किक प्रक्रिया करून काही क्रिया घडवणे, हे संगणकाचे काम, आणि मेंदूचेही. बाहेरच्या संवेदना आणि सूचनांचे साठे वापस्न तर्क लढवणाऱ्या यंत्राची कल्पना अॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितीला १९३५ साली सुचली. १९४३ मध्ये मॅककुलक आणि पिट्स या अमेरिकन जैवभौतिकीतज्ञांनी मज्जाव्यवस्था आणि मेंदू यांचे काम टुरिंगच्या कल्पनेतल्या यंत्रासारखेच चालते, हे दाखवून दिले. तेव्हापासून आजवर मेंदूचे काम आणि संगणकाचे काम ह्यांच्या समरूपतेला पुष्टीच मिळत गेली आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

उषा गडकरी, २५७, शंकरनगर, नागपूर — ४४० ०१०
जुलै २००१ च्या अंकात श्री. ग. के. केळकर यांची पुण्याच्या ‘सकाळ’च्या १८ मे २००१ च्या अंकात श्री. यशवंत पाठक यांनी ‘नैवेद्य’ या शीर्षकांतर्गत केलेल्या लिखाणासंबंधातली प्रतिक्रिया वाचली. ती मला मननीय वाटली.
विवेकवादानुसार मेंदू, बुद्धी व मन यांचा परस्पर संबंध काय? असा प्र न समोर आल्यास विवेकवादी ‘मन’ या संज्ञेला कुठलाही शास्त्रीय वा वैज्ञानिक आधार नसल्यामुळे ‘मना’ला मोडीत काढतील. परंतु आपला प्रत्यक्ष अनुभव आपणास या बाबतीत वेगळी प्रचीती देतो. एखाद्या व्यक्तीने अत्यंत आपुलकीने, जिव्हाळ्याने व प्रेमाने आपले स्वागत केले; विचारपूस केली, आपली दखल घेतली व एखाद्याने केवळ शिष्टाचार म्हणून आपल्या संबंधात काही गोष्टी केल्या तर पहिल्या व्यक्तीच्या कृतीचा आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

पुढे वाचा

भारत नावाचे सामर्थ्य

आ.सु.च्या जुलै अंकात प्रा. द. भि. दबडघावांनी परीक्षण केलेले ‘आय प्रेडिक्ट’ हे भारताच्या लोकसंख्येवरचे माझे तिसरे पुस्तक. जवळजवळ हजार पानांच्या पाच आवृत्त्यांचा आशय दबडघावांनी पाच पानांमध्ये खूप परिणामकारकपणे सांगितला आहे.
आ.सु.च्या वाचकांपैकी कुणाला कदाचित वाटेल की पावसाचे विज्ञान मी सांगणे ठीक, पण लोकसंख्येशी माझा काय संबंध? तेव्हा एक खुलासा करतो. इंडियन सायन्स काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचा अध्यक्ष असताना ‘सायन्स, पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट’ हा माझ्या अध्यक्षीय भाषणाचा विषय होता. या तीन घटकांतील समान धागे तपासावेत, त्यासाठी स्वच्छ मनाने निरीक्षण करावे अशी वैज्ञानिक भावना माझ्या डोक्यात होती.

पुढे वाचा

उपजत प्रवृत्ती

आजचा सुधारक मधील लेखनात ‘उपजत प्रवृत्ती’ (Instinct) या मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे असे वाटते. मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या बुद्धी व भावना या दोन घटकांकडे आजचा सुधारक मध्ये पुरेसे लक्ष दिले जाते.
प्राण्यांचे वर्तन प्रामुख्याने उपजत बुद्धीने ठरत असते. आई-मुलांनी परस्परांना ओळखण्याच्या क्रियेपासून पिलांना पाजणेभरवणे, घरटे बांधणे, काय खावे काय खाऊ नये, अन्न कसे मिळवावे, लैंगिक जोडीदाराची निवड, आपल्या स्वामित्व-क्षेत्राचे मर्यादीकरण व रक्षण, शत्रूला ओळखणे व त्याच्यापासून संरक्षण वगैरे सर्वच क्रियांमध्ये सर्व क्षेत्रात उपजत बुद्धीच महत्त्वाची असते व शिक्षणाचे, अनुभवा-पासून शिकण्याचे महत्त्व गौण असते.

पुढे वाचा

परिचायक:

द्वितीय युद्धपूर्व साम्राज्यवादातून मुक्त झालेले गरीब देश पूर्वीच्याच राज्यकर्त्या देशांच्या (काही देश त्यात जोडले गेले) कडून घेतल्या गेलेल्या कर्जाच्या (मुद्दल + व्याजाची परतफेड) विळखात सापडले आहेत. १९५५ साली ९ अब्ज डॉलर्स असलेले हे कर्ज १९८० मध्ये ५७२ अब्ज डॉलर्स झाले आणि १९९८ पर्यंत ते २२०० अब्ज डॉलर्स इतके वाढले. १९९७ मध्ये एक असा अंदाज व्यक्त केला गेला की हे वार्षिक देणे जर नसले तर एकट्या आफ्रिका खंडात दर वर्षी ७० लक्ष मुलांचे प्राण वाचतील आणि सुमारे ९ कोटी स्त्रिया व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळू शकेल.

पुढे वाचा

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग १)

चिं. मो. पंडित यांनी (आ.सु. ११.११, १२.३) एका मोठ्या व महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. भविष्यातली समाजव्यवस्था ‘स्त्री-केन्द्री कुटुंबव्यवस्थे’ वर आधारित असावी असे मत मांडणाऱ्यांचा भूमिकेची ते वेगवेगळ्या अंगांनी पाहणी / तपासणी करतात. यासाठी जो ‘अप्रोच’ त्यांनी घेतला आहे व जी पद्धती अवलंबिली आहे ती फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
कुटुंब हे समाजाच्या बांधणीचे पूर्वापार प्राथमिक व पायाभूत एकक राहिले आहे. पण या सामाजिक संस्थेवर गेल्या पन्नास वर्षांमध्ये सैद्धान्तिक आघातही केले जात आहेत. स्त्रीला पुरुषांच्या प्रभुत्वापासून मुक्त करावयाचे असेल तर तिला नवरा नावाच्या पुरुषाशी बांधून, जखडून ठेवणाऱ्या विवाह बंधनातून सोडविण्याची आवश्यकता मांडली गेली आहे.

पुढे वाचा

“मुलांना वाढविणे —- यंत्रे आणि निसर्ग’ (२)

१०. परीकथा, कहाण्या, गोष्टी
मुलांचे जग स्वप्नांचे, अद्भुतरम्यतेचे असते. आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल अचंबा वाटत असतो. शिवाय स्वतःचे काल्पनिक जगही ती उभी करू शकतात. कल्पनेनेच चहा करून देतात, बाजारात जाऊन भाजी आणतात, घर घर खेळतात, फोन करतात. शहरातल्या मुलांचा परिसर म्हणजे रहदारी, गोंगाट, भडक जाहिराती असा धामधुमीचा असतो. आजकाल घरचे वातावरण पण धावपळीचे आणि यंत्राच्या तालावर नाचायला लावणारे असते (दूरदर्शन, पंखे, गीझर, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, नळ, वीज . . . .) आयुष्याची गतीच ‘चाकांवर’ आधारित. अशा मुलांना स्वप्ने तरी शांत, कल्पनारम्य, अद्भुत कोठून पडणार?

पुढे वाचा

देवांची गरज आणि ‘पदभ्रष्टता’

अज्ञात प्रदेशातून ध्वनी ऐकू आला, माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना, सबब भूताची कल्पना केली. निरनिराळ्या अज्ञातोद्गम ध्वनींना, हावभावांना, आकाशचित्रांना, रोगांना, दुःखांना, सुखांना, जन्माला व मरणाला एक एक भूत कल्पिले. सुष्ट भुते व दुष्ट भुते निर्माण झाली. त्यांची उपासना सुरू झाली. नंतर रोग्यांची, सुखांची व दुःखाची खरी कारणे व तन्निवारक उपाय जसजसे कळू लागले, तसतशी सुष्ट भूतांची म्हणजे देवांची व दुष्ट भुतांची म्हणजे सैतानाची टर उडून जरूरी भासतनाशी झाली. . . . देवाची आणि देवीची जरूर कोठपर्यंत, तर संकटनिवारणाचे उपाय सुचले नाहीत तोपर्यंत.

पुढे वाचा