मासिक संग्रह: ऑक्टोबर , २००५

संपादकीय

एखाद्या साहित्यिकाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण वाचक म्हणून काही प्रतिक्रिया व्यक्त करतो म्हणजे नेमके काय करतो? काळाच्या एका विशिष्ट बिंदूशी अथवा पटाशी त्या वाययीन व्यक्तिमत्त्वाचे जे नाते आहे ते समजावून तर घेत असतोच पण त्याहून महत्त्वाचे हे की आजच्या दर्शन तारतम्याने आपण त्या वाययीन व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करतो. आपल्या आजच्या विचारव्यूहाचा नवा अन्वयही लावण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. एकाप्रकारे आपल्या इतिहासाची निवड करीत असतो.
‘विभावरी शिरूरकर’ या नावाने लेखन करणाऱ्या बाळूताई खऱ्यांची जन्मशताब्दी साजरी करताना मालतीबाई बेडेकर हेही व्यक्तिमत्त्व अर्थातच आपल्यासमोर आहे. बाळूताई खरे ते मालतीबाई बेडेकर या प्रवासात लेखिकेने कथाकादंबऱ्यांच्या लेखनासाठी उमा (१९६६) या एका कादंबरीचा अपवाद वजा करता विभावरी शिरूरकर हे नाव वापरले आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

समाजवाद जिन्दाबाद “लाँग लिव्ह सोशलिझम” या मथळ्याखाली खांदेवाले यांनी माझ्या ‘समाजवादी स्मृति’च्या घेतलेल्या परामर्शावर वर्गयुद्ध : भांडवलदार मजुरांचे शोषण करतो हे दाखविण्यासाठी खांदेवाले यांनी औद्योगिक क्रान्तीच्या सुरुवातीला कारखान्यातील मजुरांचे जीवन कसे यातनामय होते याचे नेहमी करण्यात येणारे वर्णन पुनरुक्त केले आहे. पण अशा पुनरुक्तीने “भांडवलदार मजुरापासून काय हिरावून घेतो?’ या माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. “कारखान्यातील मजुरांचे कष्टमय जीवन हे भांडवलदाराने त्यांचे केलेले शोषण होय.” असे म्हणताना कारखानदाराने दुसरीकडे सुखाचे जीवन जगणाऱ्या कामगारांना पकडून आणून त्यांना यातनात लोटले असे दाखवून द्यावे लागेल.

पुढे वाचा

विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर यांच्या लेखनाचे आकलनः सामाजिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून

१९०५ साली जन्मलेल्या बाळूताई खरे या लेखिकेने १९३३ साली कळ्यांचे निःश्वास नावाचा ग्रंथ श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या प्रकाशनपूर्व अवलोकनासह प्रसिद्ध केला. मराठी समाजामध्ये या लघुकथासंग्रहाने वादळ उठविले. त्या काळातील शिक्षित तसेच अविवाहित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्य आणि आकांक्षांबद्दल या लघुकथांमधून काही मांडले आहे. विशेष म्हणजे अशा स्त्रिया ज्या दडपणुकीच्या बळी ठरतात त्याबद्दल स्पष्टपणे बोट दाखवीत या कथा लैंगिकतेची चर्चाही करतात. स्त्रियांची लैंगिकता आणि स्वत्व ही दोन्ही पुरुषाच्या अहंकारामुळे छिन्नभिन्न कशी केली जातात याचे चित्रण या कथांमधून येते. भारतीय समाजातील दुहेरी नीतिमूल्ये आणि संकुचित, कठोर आणि कर्मठ आदर्श या सर्वांची चिकित्सा अप्रत्यक्षपणे करून स्वतंत्र देश म्हणून भारताची घडण घडवायची तर स्त्रीप्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या लेखनातून पुढे येताना दिसते.

पुढे वाचा

जहाल विभावरी, मवाळ मालतीबाई

आपल्याला आवडणाऱ्या, प्रिय असणाऱ्या कोणत्याही कलावंताला पाहायची, त्याच्याशी बोलायची उत्सुकता सर्वसामान्य वाचकांच्या मनात जशी असते तशी ती मलाही विभावरी शिरूरकर या लेखिकेबद्दल बरीच वर्षे वाटत होती. वास्तविक मराठी भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास करत असून आणि त्यांत पुरेपूर रस वाटत असूनही पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत मी केवळ त्यांची ‘बळी’ ही एकमेव कादंबरी वाचली होती. प्रौढ-अविवाहित कुमारिकांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडणाऱ्या ‘कळ्यांचे निःश्वास’ मधील काही कथांविषयी (उदा. बाबांचा संसार माझा कसा होणार ?’ किंवा ‘त्याग’, ‘अंतःकरणाचे रत्नदीप’ इ.) अभ्यासकांनी जे ओघाओघात लिहिले होते, ते नजरेखालून गेले होते.

पुढे वाचा

विभावरी शिरूरकर/मालतीबाई बेडेकर/ बाळूताई खरे

अव्वल इंग्रजी अंमलातील शिक्षणविषयक आणि स्त्रीविषयक विचारातून निर्माण झालेले हिंगण्याचे ‘कर्वे विद्यापीठ’ विसाव्या शतकाच्या प्रारंभी एका मध्यमवर्गीय आकांक्षी शिक्षकाने आपल्या मुलींना शिक्षण देण्याचा निर्धार करणे. शंभर वर्षापूर्वी जन्माला आलेल्या बाळूताईंनी आपल्याला मिळालेल्या नव्या नजरेने स्वतःकडे, जगाकडे आणि उद्याच्या स्त्रीकडे पाहणे!
‘विभावरी शिरूरकर’ या वाययीन व्यक्तिमत्त्वाने कळ्यांचे निःश्वास, हिंदोळ्यावर, बळी, शबरी, खरे मास्तर अशा कथा कादंबऱ्यांची निर्मिती करणे. समाजाला हडबडून टाकणारे लेखन! विभावरीचे टीकाकार मध्ये सामाजिक प्रक्षोभाचे प्रतिसाद! बळी मध्ये तथाकथित गुन्हेगारी जमातीचे चित्रण स्त्रियांच्या प्रश्नावर समाजशास्त्रीय लेखन. विभावरीच्या साहित्यात विसाव्या शतकातील बदलत्या मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्र तिच्यासमोरील प्रश्नांचे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील द्वंद्वाचे चित्रण!

पुढे वाचा