मासिक संग्रह: ऑगस्ट, २००६

पत्रसंवाद

‘आर्यांचे निसर्गगीत’
वाहोत हे झुळूझुळू मधु मंद वात
राहो वहात जल गोडचि या नद्यांत
देवोत दुग्ध मधु गोऽऽडचि नित्य गाई, रात्रि-प्रभातही असो,
मधु सौख्यकारी वर्तात गोड जन पार्थिव ते आम्हास
वृष्टीमुळे नभ करो, जग रक्षणास
झाडातुनि मधुरचि रस पाझरोत आरोग्यदायक असो रविची ही ज्योत
वरील निसर्गगीत ऋग्वेदातल्या ऋचा/सूक्ताचा अनुवाद आहे. आर्य (भारतार्य) निरीश्वरवादी होते आणि निसर्गोपासक.
माझ्या सनातनी कुटुंबातून आलेल्या आईने (स्मृतिरूप लीला मोडक यांनी) आमच्या प्रार्थनासमाजी पार्श्वभूमीला सुसंगत म्हणून ही ईश्वररहित ‘प्रार्थना’ आम्हा दोन भावंडांसाठी परवचांबरोबर म्हणण्यासाठी मिळविली होती व आम्हाला गोड चालीवर म्हणायला शिकवली होती.

पुढे वाचा

गुन्हेगारी आणि मूल्यशिक्षण

२८ एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेस मधील पहिल्याच पानावरील बातमी रांची युनिव्हर्सिटीतील बी.ए. च्या प्रश्नपत्रिकेत पुढील प्रश्न विचारले गेले. “(१) सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेल्या झारखंड पोलीस डिपार्टमेंटमधील इन्स्पेक्टर जनरलचे नाव काय ? (२) झारखंडामध्ये उद्योगप्रकल्पाच्या उभारणीसाठी जमीन बळकविण्याच्या विरोधात पोलीस आणि आदिवासी ह्यांच्यात कोणत्या ठिकाणी झटापट झाली ? (३) आपण राधा आहोत असे म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशातील इन्स्पेक्टर जनरलचे नाव काय?”
रांची विद्यापीठाचे कुलपति राझी यांनी ही प्रश्नपत्रिका कोणी काढली ह्याबद्दल तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी अशा प्रश्नांनी करणे योग्य नाही असे मतही काही आय.ए.एस.

पुढे वाचा

केंद्रित संपत्तीचे पुनर्वाटप शक्य होईल?

नुकतेच अमेरिकन कोट्यधीश बिल गेटस् यांनी असे जाहीर केले की ते निवृत्त होत असून त्यांच्या संपत्तीचा ९५ टक्के भाग ते एका न्यासाच्या स्थापनेसाठी वर्ग करणार आहेत. या न्यासाच्या अध्यक्षा त्यांच्या पत्नी असतील. या परोपकारी, भूतदयाधिष्ठित न्यासाचा उपयोग गरीब, विकसनशील देशातील एडस् वगैरे समस्यांच्या परिहारासाठी होणार आहे. पन्नाशीतल्या या उमद्या कोट्यधीशाच्या या घोषणेमुळे प्रभावित होऊन वॉरन बफे नावाच्या तुल्यबळ धनाढ्यांनीही आपल्या संपत्तीचा ३३ टक्के वाटा या न्यासाला देऊ केला आहे. गेटस् यांनी असेही सांगितले की मी माझ्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे.

पुढे वाचा

सहकारी ग्रामीण पतव्यवस्था

संयुक्त प्रागतिक आघाडीचे युपीए सरकार केंद्रात स्थापन झाल्यावर समान किमान कार्यक्रम जाहीर झाला. हा कार्यक्रम आघाडीच्या सर्व घटकांनी मंजूर केला व त्याप्रमाणे जमेल तशी अंमलबजावणी चालू आहे.
या कार्यक्रमांत सहकार या विषयावर दोन मुद्दे अंतर्भूत केले आहेत. आज ग्रामीण सहकारी पतव्यवस्था दयनीय अवस्थेत आहे. थकबाकी, भ्रष्ट व्यवहार, अकार्यक्षम नोकरशाही, बेताल नेतृत्व यामुळे काही राज्यांत ही चळवळ कोमामध्ये आहे, काही ठिकाणी लुळी पडली आहे तर काही जागी ती निर्जीव झाली आहे. या व्यवस्थेला संजीवनी देऊन ती ऊर्जितावस्थेत आणण्याचे आश्वासन या कार्यक्रमांत दिले आहे.

पुढे वाचा

अनुल्लेखनीय अडीच अक्षरे वर्ग

[डिसेंबर ‘९२ ते जानेवारी ‘९३ या काळात डेव्हिड बार्सामियनने (David Barsamian) नोम चोम्स्कीच्या तीन मुलाखती घेतल्या. १९९४ साली ओडोनियन (Odonian) प्रेसने या मुलाखती मूठभर श्रीमंत आणि अनेक अस्वस्थ (द प्रॉस्परस फ्यू अँड द रेस्टलेस मेनी), या नावाने प्रकाशित केल्या. मुलाखती चौदा भागांत/प्रकरणांत विभागल्या आहेत. त्यापैकी ‘अनुल्लेखनीय पंचाक्षरी शब्द’, द अन्मेन्शनेबल फाईव्ह-लेटर वर्ड या प्रकरणाचा हा संक्षेप.] बार्सामियनः असे सांगितले जाते की वैचारिका (Ideology) आणि प्रचार (Propaganda) हे इतर संस्कृतींमध्ये दिसतात. अमेरिकेत ‘तसे काही’ नसतेच. वर्ग, Class, ही भानगडही त्याच प्रकारची आहे.

पुढे वाचा

शेतकऱ्यांच्या आत्महत्याः डुर्खाइमच्या तत्त्वांनुसार विश्लेषण

जमिनीवरील वास्तवः
मराठेशाहीच्या व नंतरच्या (१८०३-१८५३) निजामशाही काळात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये श्रमविभाजनाची आणि श्रममूल्याची बलुतेदारी पद्धत होती. ब्रिटिश राजवटीत जमिनींचे मालकी हक्क शेतकऱ्यांना देण्याची रयतवारी पद्धत अंमलात आली. सुरुवातीला करभार कमी होता, पण नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेला. वसुलीसाठी मोठी नोकरशाही उभारली गेली. या पद्धतीत उच्चवर्णीय (ब्राह्मण, राजपूत) जातींनी मालकी हक्क प्रस्थापित केले. यात कुणब्यांचा वाटा सर्वाधिक होता. ‘खालच्या’ जाती कुळे बनून राहिल्या, तर अस्पृश्य (१५ ते २० टक्के लोक) भूमिहीन झाले. काही अस्पृश्यांना वतनी जमिनी होत्या, पण त्या भरड आणि हलक्या होत्या.

पुढे वाचा

उपयोगितावाद (५): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण ५: न्याय आणि उपयोगिता यांच्या संबंधाविषयी
विचारांच्या सर्वच युगात उपयोगिता किंवा सौख्य हा युक्तायुक्ताचा निकष आहे ह्या सिद्धान्ताला सर्वांत मोठा विरोध न्यायाच्या कल्पनेच्या आधाराने केला गेला आहे. त्या शब्दाने आपल्या मनात उद्भावित होणारी समर्थ भावना आणि स्वच्छ वाटणारी कल्पना ज्या त्वरेने आणि निश्चितपणे उद्भवते ती सहजप्रवृत्तीला समजेल अशी असते, आणि त्यामुळे बहुतेक विचारवंतांना ती निसर्गाचा अंगभूत भागच असल्याचे दिसते.

पुढे वाचा

शंका

जर हवा श्वास घेता येऊ नये इतकी घाणेरडी असेल, पाणी पिता येऊ नये इतके दूषित असेल, रस्ते गलिच्छ असतील, शाळा इतक्या वाईट असतील की तरुण लोक सुज्ञपणे त्यांच्यापासून दूर राहत असतील, कर चुकवून साठवलेल्या मूठभर डॉलर्ससाठी गुंड नागरिकांना लुबाडत असतील; तर मला थोडेसे अधिक डॉलर्स खर्चायला उपलब्ध असण्याच्या लाभाबद्दलच शंका वाटते.
[जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०९-२००६), अर्थशास्त्री, बहुप्रसव लेखक, अमेरिकेचे भारतातले माजी राजदूत टाईम १२ जून २००६ मध्ये उद्धृत.]