मासिक संग्रह: ऑक्टोबर , २००६

पत्रसंवाद/चर्चात्मक लेख

व्यावसायिक शेती [जयंत वैद्य यांनी दहा गुंठे प्रयोग व अशोक बंगांचे प्रतिमान यापेक्षा वेगळे एक प्रतिमान तपशिलात सुचविले आहे. या प्रतिमानाचे वैशिष्ट्य असे की ते सुट्या शेतकऱ्याऐवजी संपूर्ण खेड्याचा विचार करते. वैद्यांनी शेतीसोबत करावयाच्या इतर अनेक गोष्टींचे तपशीलवार विश्लेषण करून आकडेवारी प्रस्थापित केली आहे. आम्ही मात्र या पत्र-लेखात केवळ शेवटची गोषवारा देणारी आकडेवारी देत आहोत. तपशील हवा असणाऱ्यांनी वैद्यांशी थेट संपर्क साधावा, ही विनंती. सं.]
एखादी वस्तू खरेदी करणे व ती कमी जास्त भावात विकणे याला व्यापार म्हणतात. एखाद्या वस्तूचा उत्पादनखर्च कमीत कमी ठेवत, दर्जेदार व सुबक वस्तू तयार करून त्या वाजवी भावाने विकणे याला व्यवसाय म्हणतात.

पुढे वाचा

फायनल ड्राफ्ट

मी मांसकांची ग्रंथतात्पर्यनिर्णयपद्धती वर्गात शिकवली नि त्याच दिवशी फायनल ड्राफ्ट नाटक पाहिले. कदाचित त्यामुळे मीमांसकांनी दिलेल्या सात कसोट्यांच्या आधारे नाटकाचे मूल्यमापन करण्याचा मोह झाला. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती व फल ह्या सात कसोट्या ग्रंथांचे तात्पर्य ठरविण्यासाठी वापरता येतात. ग्रंथांप्रमाणेच एखाद्या नाटकाचे तात्पर्य ठरविण्यासाठीही त्यांचा वापर करता येईल. सुरूवात (उपक्रम) व शेवट (उपसंहार) यांचा येथे प्राधान्याने विचार करावयास हवा.
फायनल ड्राफ्ट च्या सुरुवातीलाच जाणवतो, तो प्रचंड ताण. तब्बल एक तास निव्वळ वाट पाहण्यात गेला नि आता पुण्याला जाणे बोंबलले म्हणून अस्वस्थतेने धुमसणारे सर नि, एकंदरीतच, हबकून गेलेली विद्यार्थिनी.

पुढे वाचा

आपल्या अस्तित्वाचे गूढ (The mystery of our being – Max Plank )

विज्ञानाचे एक यश म्हणजे चमत्कारांविषयी मानवी श्रद्धेला मर्यादा निर्माण होणे, असे आपण सहजच गृहीत धरतो. पण असे काही घडल्याचे दिसत नाही. गूढ शक्तींच्या क्षमतेवर विश्वास असणे हे आजच्या काळातही आहेच. गूढविद्या आणि अध्यात्माच्या अनेकानेक प्रकारांची लोकप्रियता पाहिली की हे दिसून येते. विज्ञानातून निघणारे निष्कर्ष अगदी कुतूहलशून्य असणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या नजरेतूनही सुटणे अशक्य आहे. तरीही शिक्षित व अशिक्षित माणसे, अनेकदा, त्यांच्या जीवनातल्या सामान्य प्रश्नावर प्रकाश पडावा म्हणून गूढ व धूसर प्रदेशात शिरतात. एखादा म्हणेल, की अशा प्रश्नासाठी मी तरी विज्ञानाचाच आधार घेईन.

पुढे वाचा

गावगाडा २००६ (भाग-१)

[त्रिंबक नारायण आत्रे यांचे गांवगाडा हे पुस्तक गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे उत्कृष्ट चित्र रेखाटते. प्रथम प्रकाशन १९१५ साली झालेले हे पुस्तक आजही उपलब्ध आहे. (‘वरदा’, पुणे, १९८९). मधल्या काळात पुस्तकातील अनेक शब्द सामान्य वाचकांना अनोळखी झाले असतील, या भावनेतून रा.वि. मराठे यांनी ‘गांवगाडा’चा शब्दकोश लिहून प्रकाशित केला. (मंजिरी मराठे, मुंबई, १९९०). पुस्तकाला पन्नास वर्षे होत असताना प्रसिद्ध अर्थशास्त्री वि.म.दांडेकर आणि शेतकरी म.भा.जगताप यांनी गावरहाटी या नावाने आत्र्यांच्या पुस्तकाला समांतर असे, पण किस्से-कहाण्यांच्या रूपातले पुस्तक घडवले (ह.वि.मोटे, मुंबई, १९६३). मूळ गांवगाडा इंग्रजीत ढहश तळश्रश्ररसश उसी या नावाने भाषांतरित झाल्याचेही स्मरते.

पुढे वाचा

मूल्यव्यवस्थेचा विकास

आमच्या मूल्यव्यवस्थेत मान्य व हव्याशा बदलांना जर विकास म्हटले, तर आम्ही विकासाचे केवळ विकास म्हणून विरोधक नाही. आमचा विकासाबाबतचा दृष्टिकोन श्रम-सघन, बेकारी उत्पन्न न करणाऱ्या तंत्रज्ञानांना महत्त्व देतो. अशी तंत्रज्ञाने संसाधनांच्या वापरात उपजीविकेच्या संधी उत्पन्न करतील. आम्ही नैसर्गिक संसाधने नष्ट किंवा प्रदूषित न करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पक्षाचे आहोत. आजच्या ग्रामीण समाजांच्या साध्या, उपभोगवादी नसलेल्या जीवनशैलीत ही संसाधने सुरक्षित आहेत. तंत्रज्ञानाची निवड अपरिहार्यपणे जीवनशैली व जीवनमानाच्या विकासाच्या दृष्टिकोनाशी निगडित असते.
मेधा पाटकरांची रॉबर्ट जेन्सेन यांनी घेतलेली मुलाखत मॉन्फकीरा (Monfakira) या कोलकात्याहून निघणाऱ्या नियतकालिकाने त्याच्या मे-जून २००६ च्या अंकात प्रकाशित (जुलै ७-१३, २००६) केली.

पुढे वाचा