मासिक संग्रह: डिसेंबर, २००७

पत्रबोध

केशवराव जोशी, तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१, दूरभाष : ९५२१४८-२३८६५२
आ.सु.च्या सप्टे.०७ च्या अंकारा “वायकांचे आ.सु.बद्दलचे विचार मागविले आहेरा” हे फार चांगले झाले. दि.य.देशपांडे ह्यांनी आसुच्या पहिल्या अंकारा (एप्रिल १९९०) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की “शंभर वर्षांपूर्वीचे जे आगरकरांनी समाजास बुद्धिवादी घडविण्याचे कार्य करण्यास आरंभ केला; ते आज अपुरे ठरल्यामुळे पूर्णत्वाला नेण्याचे कार्य करण्याच्या हेतूने सुधारक काढीत आहोत. विवेकवादाच्या बरोबरच व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय इ. मूल्ये हाताळली तरी प्राधान्य विवेकवादाच्या प्रसाराला आहे.”
मुंबईला मराठी विज्ञान परिषद आहे. ते विज्ञान छापतात.

पुढे वाचा

भारतीय राज्यघटना व प्रचलित समाजव्यवस्था

भारताला स्वतःची राज्यघटना हवी अशी मागणी प्रथमतः १९२२ साली म. गांधी यांनी केली. त्यावेळी आणि त्यानंतरसुद्धा अनेकवेळा ब्रिटिश सरकारने ती फेटाळली. पेब्रुवारी १९४६ मध्ये ज्यावेळी नाविकांनी बंड केले. त्यावेळी सैन्य आता आपल्या ताब्यात राहणार नाही याची ब्रिटिशांना खात्री पटली आणि मे १९४६ पासून भारताला स्वातंत्र्य देण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर डिसें. ४६ मध्ये भारताची घटना तयार करण्यासाठी स्वतंत्र घटनासमिती निर्माण करण्याचे ठरले.
या घटनासमितीमध्ये प्रत्येक राज्याच्या विधानसभेने लोकसंख्येच्या प्रमाणात असे २९२ सभासद पाठविले होते आणि ९३ सभासद संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. साहजिकच या प्रतिनिधींना गरिबांबद्दल किंवा दलितांबद्दल कळवळा असण्याचे कारणच नव्हते.

पुढे वाचा

श्रॉडिंजरचे गूढवादी दर्शन

(भाषांतर)

हायसेनबर्ग वगैरे मंडळी ‘मॅट्रिक्स मेकॅनिक्सची’ (चरीीळ चशलहरपळली) बांधणी करीत होती त्याच वेळी इर्विन श्रॉडिंजरने, (Erwin Schroedinger [1887-1961]), स्वतंत्ररीत्या, तरंग यांत्रिकी (Wave Mechanics) चा शोध लावला. लगेचच, ते मॅट्रिक्स मेकॅनिक्सच्या समतल असल्याचे सिद्ध झाले. शिवाय हे Wave Mechanics अनेक बाबतींत Matrix Mechanics पेक्षा सुलभ व सुंदर आहे असे दिसून आले. म्हणूनच श्रॉडिंजरचे Wave Mechanics लवकरच आधुनिक पुंजयांत्रिकीच्या (Quantum Mechanics) हृदयस्थानी विराजमान झाले व सर्वत्र त्याचा गणिती शस्त्र म्हणून वापर चालू झाला.

श्री. केन् विल्बर (Ken Wilber) यांनी संपादित केलेल्या Quantum Questions या संग्रहातील श्रॉडिंजरचे खालील लिखाण, (उतारा) (बहुधा) What is Life ह्या पुस्तकातील आहे.

पुढे वाचा

विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका

लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. त्यात पाश्चात्त्यांपैकी बटैंड रसेल असावा, तसेच संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत. त्या लहान वयात उमेद फार असते आणि अवाजवी आत्मविश्वास असतो. मी विज्ञानविषयक माझी पूर्वपीठिका एका ‘श्लोकरूपात” मांडायचे ठरवले. वर्णनं नियमात् पूर्वम्, अनायासा हि भावना । समविचारी च तत् तुल्यश्च पूर्वग्रहाः मम दृढाः ।।
काव्यरचना खचितच बालिश आहे. पण तिच्यातला बराचसा विचार अनेक वर्षे संशोधक म्हणून वावरल्यानंतरही थोडाच बदलला म्हणून मला ती रचना अजून आठवते. तिचा भावार्थ : १.

पुढे वाचा

‘टिळक विरुद्ध आगरकर’

सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य यांमध्ये अग्रक्रम कशाला यासंबंधी लोकमान्य आणि आगरकर या मित्रद्वयांमध्ये टोकांचे मतभेद होते हे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित जनांना माहीत आहे. १६ जून १८९५ ला प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर २१ वर्षांनी मुंबईला त्यांचा स्मरणदिन म्हणून मोठा समारंभ झाला. त्यावेळी प्रसंगाला अनुसरून लोकमान्यांनी ‘आगरकरांची श्राद्धतिथी’ म्हणून केसरीमध्ये जो लेख लिहिला त्यामध्ये प्रि. आगरकरांविषयी त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत आपल्याला समजू शकतात आणि त्या समजणे आवश्यकही आहे. कारण सुधारकाग्रणी प्रिन्सिपल आगरकर यांचे कार्य पुढे चालविणारी मंडळी आजही आहेत.

पुढे वाचा

दशावतारांचे पुनरवलोकन

भारतातील बहुसंख्य लोक आपला धर्म हिंदू असल्याची कागदोपत्री नोंद करतात. हिंदू धर्माच्या काही मूलभूत मान्यता अथवा आधारभूत संकल्पना आहेत त्या म्हणजे ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व, ब्रह्मा-विष्णु-महेश व शक्ति या प्रमुख देवतांना मान्यता देणे, मोक्ष, पुनर्जन्म, दशावतार, वर्णव्यवस्था, वेद, ब्राह्मणे, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत (गीतेसह) हे धर्मग्रंथ, इत्यादी. ह्यांपैकी वेद फार पूर्वीपासून, आर्यांचे उत्तर भारतात आगमन झाल्यापासून, मौखिक परंपरेने अस्तित्वात आहेत. वेदांमधील आराध्यदेवता निसर्गातील विविध शक्ती होत्या. त्यात ब्रह्मा, विष्णु, महेश यांना स्थान नव्हते असे म्हटले तरी चालेल. या तीन ‘देवता’ व शक्ती ह्यांचे उल्लेख इसवी सनापूर्वी पाचव्या सहाव्या शतकानंतरच्या पुराणांमध्ये आढळतात.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळाः भाग-१

एक राजकीय आदर्श

‘सार्वभौमता’ ह्या संकल्पनेसारखी ‘सेक्युलॅरिझम’ची एक संकल्पना म्हणून ओळख सहज पटते पण तिची व्याख्या दुष्कर आहे. समाजशास्त्राच्या व राज्यशास्त्राच्या पंडितांत बौद्धिक व्यवहारात ह्या संज्ञेचा सर्रास प्रयोग होत असला तरी ह्या संकल्पनेतला नेमका व्यवच्छेदक अंश कोणता ह्याबद्दल मतभेद आहेत. भिन्न काळी भिन्न देशांत ‘सेक्युलर’ किंवा ‘सेक्युलॅरिझम’ ह्या संज्ञा समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक आशयांनी परिप्लुत झालेल्या आहेत.
“अतीन्द्रिय आणि साक्षात्कारमूलक पूर्वगृहीतांचे ज्यांमधून निर्मूलन केलेले आहे असा स्वयंशासित ज्ञानप्रदेश म्हणजे सेक्युलॅरिझम” अशी व्याख्या करण्यात आली आहे. सामाजिक शास्त्रांच्या (Encyeclopaedia of Social Sciences) ज्ञानकोशातून घेतलेली ही व्याख्यासुद्धा वर्जनात्मक (restrictive) आहे.

पुढे वाचा

विवेकवादाला एवढे नक्कीच साधेल

धर्म ही एक सामाजिक आवश्यकता आहे असे म्हणता येईल. प्राचीन काळात धर्माने पार पाडलेली सामाजिक कार्ये म्हणजे, (१) विशिष्ट कर्मकांडांच्या निर्मितीमुळे समाज एकत्रित येणे. (२) भीती, अनिश्चितता या भावनांपासून माणसाची बऱ्या प्रमाणात सुटका होणे. (३) मरणाची व अज्ञाताची भीती बरीचशी कमी होणे. (४) मानवी जीवनात देवाचे साह्य मिळण्याची आशा निर्माण होणे. त्यामुळे माणसाची वैफल्यग्रस्तता कमी झाली व त्याला संकटकाळात आधार प्राप्त झाला. पुढे धर्मात नवनवीन कल्पनांची भर पडत गेली. काही संकल्पना मागे पडल्या. धर्माचे स्वरूपही बदलत गेले. या बदलत्या धर्माचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.

पुढे वाचा

अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!!
आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा आणि लेखनकलेचा काळजी करण्याइतका संकोच होत आहे. आता सुकर्ण (रोलळश्रश) आले आहेत. आधी पत्र लिहा, मग उत्तराची वाट पाहा ह्या अभिक्रमांना उल्हास लागतो, चिकाटी लागते. त्याला फाटा देऊन वाचक सरळ संवाद साधतात.

पुढे वाचा

लेखकाचा अंगरखा

समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांच्याकडे विद्यार्थिदशेत एकच सदरा असल्याने रोज रात्री धुऊन वाळत घालीत व दिवसा पेहरत. ही कथा अनेकांनी ऐकली असेल. अमेरिकन साहित्यिक एडगर अॅलन पो (ज्याने आधुनिक रहस्यकथा लेखनाचा पायंडा पाडला) आणि नॅथानियल हॉथॉर्न हे दोघे एकत्र राहत. दोघेही साहित्याच्या मस्तीत धुंद, परंतु खायला चण्या-कुरमुऱ्यांचेही वांधे. त्यांच्या साहित्यावर लुब्ध होऊन एका धनिक स्त्रीने त्यांना पार्टीचे निमंत्रण दिले. दोघे मिळून एकच कोट बाहेर जाताना आळीपाळीने वापरीत. आता आली का पंचाईत ? पो ने बाईसाहेबांना विचारले, ‘बाईसाहेब, आम्ही बरोबर न येता, एकानंतर दुसरा असं आलेलं चालेल का?’

पुढे वाचा