मासिक संग्रह: जुलै, 2010

चिडीचूप

वाद हा प्रगल्भ समाजाचा अविभाज्य भाग. विचारपूर्वक केलेल्या संवादाचाच एक हिस्सा. पण वादाकडे भांडण म्हणून पाहणारा स्तर वेगळा असतो. वाद म्हणजे भांडण हे समीकरण पुरोगामी, प्रगल्भ आणि सशक्त समाजरचनेत स्वीकारार्ह ठरू शकत नाही. बुद्धिजीवी वर्गाची गळचेपी सुरू झाली की ही अशी अस्वीकारार्ह समीकरणे सहजपणे स्वीकारली जाऊ लागतात.
अनेक समाजधुरीणांचे तात्त्विक वाद महाराष्ट्राने अनुभवले आहेत. ‘आधी स्वराज्य की आधी सुराज्य’ यासारख्या टिळक-आगरकर वादातून सामाजिक-राजकीय सुधारणांची जाहीर चर्चा मराठी समाजमनाने ऐकली. तिचा वैचारिक पोत संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. साहित्याच्या प्रांतातील ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ यापासून श्लील-अश्लीलतेच्या मापदंडांपर्यंतचे अनेक वाद महाराष्टात सारस्वताच्या इतिहासात नोंदले गेले.

पुढे वाचा

नाशिकच्या बैठकीचा वृत्तान्त

आजचा सुधारक तीन मंडळे आणि एक व्यक्ती मिळून चालवले जाणारे मासिक आहे. मासिकाची मालकी विश्वस्त-मंडळा कडे असते, पण दैनंदिन व्यवहारांत तो अधिकार प्रकाशका चा असतो. इतर सर्वांचे काम मासिकाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत ठेवणे व यात चुका होत असल्यास योग्य त्या सूचना देणे ही विश्वस्त-मंडळाची जबाबदारी असते. प्रकाशक यासोबत मासिकाचे उत्पादन आणि वितरण यावरही देखरेख करत असतो.
मासिकातील मजकूर जमवणे, संपादित करणे, अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, छपाई व वितरण करवून घेणे, ही संपादक-मंडळाची जबाबदारी असते. यातही कार्यकारी संपादक जास्त जबाबदेह, रपीशीरलश्रश आहे.
सल्लागार-मंडळ मासिकातील लेख, त्यांत यायला हवेत असे विषय, इत्यादींबद्दल संपादक-मंडळाला सल्ला देते.

पुढे वाचा

अज्ञानाचे तत्त्वज्ञान

मी अज्ञानाचे समाधानकारक तत्त्वज्ञान मांडणारा वैज्ञानिक आहे; अशा तत्त्वज्ञानाने किती प्रगती करता येते, याचे मूल्य जाणणारा. या तत्त्वज्ञानाचे फळ म्हणून विचार-स्वातंत्र्य मिळते, हे जाणणारा. शंकांना घाबरायला नको. उलट नव्या शक्यता माणसांमध्ये जागवणारे मूल्य तेथून मिळते, हे शिकवू पाहणारा, जाहीर करू पाहणारा.
तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही ती स्थिती सुधारू शकता, अशी शक्यता असते. मला ही शक्यता, हे स्वातंत्र्य भविष्यातल्या पिढ्यांना मिळून हवे आहे. एक जबाबदार वैज्ञानिक म्हणून असे अज्ञानाचे तत्त्वज्ञान मांडणे मला गरजेचे वाटते. [रिचर्ड पी. फाईनमनच्या १९६३ सालच्या सीॲटल येथील भाषणातून डोंट यू हॅव टाईम टु थिंक ?

पुढे वाचा