मासिक संग्रह: जुलै, 2010

‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’

कार्ल मार्क्सने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी म्हटले होते की, बाजारपेठ ही विनिमय व नियमनाची बाब आहे, पण जेव्हा बाजारपेठ हे जीवनाचे तत्त्वज्ञान होते आणि ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’, म्हणजे खासगी संपत्ती हेच सर्व मानवी व्यवहाराचे ‘चलन’ होते, तेव्हा समाजच रानटी स्थितीत जातो. त्या रानटी स्थितीतून समाज बाहेर पडत गेला तेव्हा नैतिकता आणि सांस्कृतिकता जन्माला आली. त्या प्रवासातच साहित्य-संगीत-कला निर्माण झाले. ‘कल्चर’ आणि ‘सिव्हिलायझेशन’ निर्माण झाले. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान बाजारशक्तींपासून मुक्त झाले. विक्रेय वस्तू आणि अमूल्य वस्तू हा भेद आवश्यक होता. ‘ज्ञान’ ही संकल्पना उदात्त मानली गेली ती त्यामुळेच.

पुढे वाचा

प्रोमीथियन अग्नी

पुस्तकाचे नाव “Promethean Fire Reflections on the origin of the mind’ आहे. लेखक – Charles S. Lumsden & Edward O. Wilson. नाव तर जड आहे. [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]
जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाजायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि मासा १० वी नंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे!

पुढे वाचा

इतिहासजमा ?

(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार) सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.

पुढे वाचा

‘व्हॉटेव्हर’

मध्ययुग – अंधकारयुगानंतर आपण विवेकाचे युग (The Age of Reason) घडवून आपले जग बदलून टाकले. अधूनमधून आपण रक्तलांच्छित युद्धेही लढलो, पण सोबतच साहित्य, कला, विज्ञान, वैद्यक यांत उत्तम कामेही केली. कायद्याचे राज्य बऱ्याच पृथ्वीतलावर प्रस्थापित झाले. बऱ्याच जागी लोकशाही व्यवस्थाही घडल्या. आपल्या एका पिढीत ऐहिक दारिद्र्याचे परिणाम ज्या प्रमाणात कमी झाले, तेवढे आधीच्या संपूर्ण मानवी इतिहासात झाले नव्हते. राजकीय व आर्थिक व्यवस्थांच्या वापराने आपण नात्झी व सोविएत हुकुमशाह्यांवर मात केली. हे सारे असूनही आज आत्मविश्वासाचा अभाव, आपल्या कृतींच्या परिणामकारकतेवरचा विश्वास क्षीण होणे, निराशावाद, अशाने आपला समाज ग्रस्त आहे.

पुढे वाचा

पुन्हा ‘सुप्रजनन’!

[हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ ? हे एडवर्ड ॲल्बीचे बहुचर्चित नाटक (थहे ळी अषीरळवष तळीसळपळर थेश्रष?, Edward Albee, Pocket Books, १९६२) व नंतर अनेक आवृत्त्या). त्यावर १९६५ च्या सुमाराला एक चित्रपटही निघाला (रिचर्ड बर्टन, एलिझाबेथ टेलर).
एक विनापत्य, पराभूत वयस्क जोडपे : जॉर्ज हा इतिहासाचा प्राध्यापक, वय ४६ वर्षे आणि मार्था, विद्यापीठाच्या अध्यक्षाची मुलगी, वय ५२ वर्षे. एका रात्री या जोडप्याकडे दोन पाहुणे येतात : निक् हा जीवशास्त्राचा प्राध्यापक, वय २८ वर्षे; आणि त्याची पत्नी हनी, वय २७ वर्षे. मार्था निक्कडे आकर्षित झालेली असते.

पुढे वाचा

मेकॉलेचे चारित्र्यहननः एक लाजिरवाणा अध्याय

ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते. आज प्रत्यक्षात अनेक लेखक ही पथ्ये पाळत नाहीत त्यामुळे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. काही वेळा असा प्रकार अज्ञानातून होतो व ते क्षम्यही आहे. पण बऱ्याच वेळा तद्दन खोटा प्रचार जाणूनबुजून केला जातो व ते अश्लाघ्य आहे.

पुढे वाचा

इतिहासाच्या पुनर्लेखनातले धोके

अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्रीयुत सूरजभान यांच्या काही कल्पना विचित्र आहेत. भारतीयांना इतिहासाशी काही घेणेदेणे नाही, या मताला त्या कल्पना दुजोरा देतात. सूरजभान सांगतात की सर्व पुस्तकांमधून दलितांची हेटाळणी करणारे उल्लेख काढून टाकायला हवेत. याची सुरुवात म्हणून संत तुलसीदासांच्या रामचरितमानसातील प्रसिद्ध ओळी
“ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी ये सब ताडन के अधिकारी’ गाळाव्या, असे सूरजभान सुचवतात.
आता वरील ओळी खेडूत, दलित, पशू आणि स्त्रियांना अपनामास्पद आहेत, हे तर खरेच आहे. ढोल बडवावा तसे या साऱ्यांना बडवावे, असे त्या सांगतात.

पुढे वाचा

‘भोगले जे दुःख त्याला’ एक आगळे आत्मचरित्र

आजपर्यंत अनेक उपेक्षितांनी आत्मचरित्र लिहून आपले अंतरंग उघड केले आहे. समाजाकडून, कुटुंबीयांकडून विशेषतः सासरच्या, झालेल्या अनन्वित शारीरिक, मानसिक अत्याचारांच्या अमानुष कहाण्या आपल्या वाचनात आल्या आहेत. मनात वाटलेली कटुता, क्षोभ, प्रचंड भावनिक खळबळ व मरणप्राय उद्विग्नता या सर्व भावभावनांना वाट करून देण्याचे उत्तम साधन म्हणजे आत्मचरित्र. समाजापर्यंत पोचण्याचा समाजमान्य मार्ग. ही प्रत्येक व्यक्तीची मानसिक गरज आहे. मैत्रिणींशी हितगुज, आप्तेष्टांशी संवाद व अतीच झाले, ताणतणाव असह्य झाला तर समुपदेशकाचे साहाय्य ह्यांपैकी कुठल्यातरी मार्गाने आजच्या समाजात आपण तणावमुक्तीसाठी प्रयत्न करत असतो. आत्मचरित्र लिहिणे प्रत्येकाला शक्य नसले तरी प्रत्येक जीवन ही कादंबरी नक्कीच असते.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-२)

[End of Ideology (तत्त्वादर्शाचा अंत!) ही कळीची संकल्पना गेल्या लेखांशात आली. Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), मध्यमवर्गाचा संभ्रम, या काही कळीच्या राजकीय संकल्पना प्रत्यक्षदर्शी व सोप्या पद्धतीने स्पष्ट करणारा हा लेखांश आहे, मूलभूत महत्त्वाचा.]
या लोकशाहीच्या नमुन्याची रचना करताना, देशी विदेशी घटनेच्या रचनाकारांचा विचार करताना त्यांच्याकडून कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे. घटना बनविताना मानवी स्वभाव, मानवी समूहांचे समूह म्हणून वागण्यामागचे विचार किंवा वागणूक याचा पूर्ण विचार केला आहे किंवा कसे, याचा अंदाज येत नाही. कारण जेव्हा आपण लोकशाहीतल्या नेत्याचे मूळ विचार व नंतर वागणूक पाहतो तेव्हा आपल्याला खटकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात.

पुढे वाचा

“अन्नाचा अधिकार”

भारतातील गोरगरीब लोकांची उपासमार सुरू आहे. ही समस्या किती गंभीर आहे याचा दोन पद्धतीने मागोवा घेता येतो. त्यातील पहिला प्रकार म्हणजे भारतातील किती लोकांना निरोगी जीवनासाठी आवश्यक एवढी पोषणमूल्ये देणारा आहार मिळत नाही याचा अंदाज घेणे. दुसऱ्या प्रकारामध्ये जागतिक पातळीवर ‘भुकेच्या समस्ये’च्या संदर्भात भारताचे स्थान इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते तपासणे. आपल्या पंतप्रधानांनी ‘देशातील एकाही नागरिकाला एक दिवसही अनैच्छिक उपास करण्याची वेळ येऊ देणार नाही’ अशी जाहीर ग्वाही दिली असली तरी वास्तवात देशातील बहुसंख्य जनता अर्धपोटी जीवन कंठित आहे वा कुपोषणग्रस्त आहे.

पुढे वाचा