मासिक संग्रह: डिसेंबर, २०१४

बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजाची नीतिमत्ता

आमच्या बुद्धिजीवि मध्यमवर्गीयांच्या संस्कृतीची स्थिति आज शीड नसलेल्या तारवाप्रमाणें झाली आहे. स्वार्थाच्या आणि अहंकाराच्या भोवऱ्यांत ती सांपडल्यानें बाहेर पडण्याचा मार्ग तिला आज दिसत नाही. पारतंत्र्य जाऊन स्वातंत्र्य आलें, द्विभाषिक जाऊन संयुक्त महाराष्ट्र आलें, बाहेरचें जग अशा तऱ्हेनें कितीतरी बदललें, तरी या बदलत्या जगाचे पावलावर पाऊल टाकून स्वत: बदलणें बुद्धीच्या घमेंडीमुळें या संस्कृतीला अपमानाचें वाटतें. मेथ्यु अर्नॉल्ड या आंग्ल टीकाकारानें अशा जातीच्या लोकांना ‘Philistines’ असें संबोधून खऱ्या सांस्कृतिक गुणांचा अभाव असलेल्या अशा लोकांमुळें समाजांत अराजक माजतें, असें म्हटलें आहे. अशा तऱ्हेचें अराजक सध्यां महाराष्ट्रांत माजलें आहे.

पुढे वाचा

मन केले ग्वाही : (भाग एक) खिळखिळी लोकशाही

आजचा सुधारक या मासिकाचे प्रकाशन सुरू झाल्याला लवकरच पंचवीस वर्षे होतील. एप्रिल एकोणीसशे नव्वद ते मार्च दोन हजार पंधरा या काळात जगात मोठाले बदल झाले. काही बदल संख्यात्मक, quantitative होते, तर काही गुणात्मक, qualitative होते. काही मात्र या दोन्ही वर्गांपैक्षा मूलभूत होते, आलोक-बदल किंवा paradigm shift दर्जाचे.
या बदलांबद्दलचे माझे आकलन तपासायचा हा एक प्रयत्न आहे, विस्कळीत, अपूर्ण, असमाधानकारकही. पण असे प्रयत्न करणे आवश्यकही वाटते.

शीतयुद्ध आणि त्यानंतर

एकोणीसशे नव्वदच्या आधीची पंचेचाळीस वर्षे सर्व जग शीतयुद्धाच्या छायेत होते. ताबडतोब आधीची पंधरा वर्षे ब्रिटनमध्ये (यूनायटेड किंग्डम) स्थितिवादी हुजूरपक्ष सत्तेत होता.

पुढे वाचा

बुरूज ढासळत आहेत… सावध

आजचं चंद्रपूर तेव्हा चांदा होतं. माझ्या बालपणी चांदा हे नाव रूढ होतं. नव्हे  मनात तेच नाव घर करून होतं. चांद्याबद्दल अनेक आख्यायिका ऐकवल्या जात. चांदा फार मोठं आहे असं वाटायचं. बीएनआर या झुकझुक गाडीनं चांद्याला यायचो. गडिसुर्ला हे मूल तालुक्यातलं माझं गाव. गावच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरावर चढलं की दूरवर मूल दिसायचं. लहान लहान बंगले दिसायचे. डोंगराच्या पायथ्याशी आसोलामेंढाचा पाट वाहताना मनोवेधक वाटायचा. आंबराईत रांगेने उभी असलेली झाडी हिरवी गच्च वाटे. डोंगरावरून पूर्वेला नजर टाकली तर वाहणारी वैनगंगा नदी दिसायची. मार्कंड्याचं मंदिर दिसायचं.

पुढे वाचा

हे प्रेतांचे कारखाने थांबवा!

माणूस भोवतालचे जग बदलू शकतो, घडवू शकतो अन् या व्यवहारातूनच स्वतःलाही घडवत जातो. ही माणसाची व्याख्या मानली तर शिक्षणाने माणूस हा माणूस होतो. प्राण्यांच्या पिल्लांना न शिकविता ती अन्न मिळवू शकतात, मोठी होऊ शकतात. पण माणसासारखे जगणे मुळातच शक्य करायला शिक्षण आवश्यक आहे. समाजात वाढताना अनेक मार्गांनी हे शिक्षण आपण शोषत असतो, पण शाळा कॉलेजातल्या शिक्षणाचा त्यात सर्वांत मोठा व महत्त्वाचा वाटा असतो हे उघड आहे.
खरे शिक्षण नेहमी दुहेरी असते. माणूस बाहेरच्या जगाचा एक भाग आहेच, पण तो या जगाचा पूर्ण गुलाम नाही.

पुढे वाचा

जनआंदोलनं – साधीसरळ गुंतागुंत

महानदीवरील हिराकूड धरण संबळपूर विद्यापीठाच्या जवळ आहे. हिराकूड धरण प्रकल्पामुळे दीड लाख एकर जमीन ओलिताखाली आली. त्याशिवाय काही शे मेगावॉट विजेची निर्मिती होते. पण धरणाच्या परिसरातील आदिवासींच्या गावात वीज पोचलेली नाही. संबळपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने एका गावकर्यालला ह्यासंबंधात छेडलं. तर आदिवासी उत्तरला, “दिव्याखाली अंधार असतो.” पण त्या अंधारातही अवकाश असतो. तो दिसत नाही. विकासाची संकल्पना सरळ-सोपी असते कारण ती दिव्यासारखी दिसते. विकासाची संकल्पना गुंतागुंतीची असते कारण त्या दिव्याखालच्या अंधारातला प्रदेश आपल्या नजरेला दिसत नाही. त्या आदिवासीचे उद्गार प्राध्यापकाला दार्शनिक वाटले.
विकास म्हणजे काय, ह्याची उकल करताना त्या प्राध्यापकानं म्हटलं, “मानवी श्रम आणि ज्ञान ह्यांच्या संयोगातून उत्पादक शक्तींचा विकास होतो.

पुढे वाचा

डावा आदर्शवाद आणि खुली बाजारपेठ

‘चळवळी’ या विषयावर लिहायचा विचार करत असतानाच नर्मदा बचाव आन्दोलनाच्या ‘हरसूद मेळाव्या’ला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करून देणारी मेल आली आणि त्यासोबतच त्या मेळाव्याचे चित्रीकरण असणारी व्हीडीओ क्लीप देखील. ही क्लीप पाहताना हरसूदच्या मेळाव्याच्या आठवणी ताज्या झाल्या. हरसूद हे गाव नर्मदेवरील धरणप्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणारे गाव. मेधा पाटकरांच्या आगळ्यावेगळ्या शैलीच्या अभूतपूर्व नेतृत्वाखालील नर्मदा बचाव आंदोलनाने नर्मदा प्रकल्प, हरसूद ही नावे जगाच्या काना कोपऱ्यात पोहचवली होती. येथे हे विसरता कामा नये की पंचवीस वर्षापूर्वी अजून आजची माध्यमक्रांती व्हायची होती. आणि तरीही नर्मदा बचाओ आंदोलनाने ही किमया साधली होती.

पुढे वाचा

ईश्वर – एक मुक्त चिंतन

“आस्तिक विरुद्ध नास्तिक” असा एक कायमचा घोळ समाजाच्या वैचारिक विश्वात चालू असतो. हा घोळ आस्तिकांनी घातला आहे. नास्तिकांची विचारसरणी सुस्पष्ट असते. निरीक्षण-परीक्षण-प्रत्यक्ष प्रयोग-गणितीय पडताळणी ह्या वैज्ञानिक प्रक्रियेतून निष्पन्न झालेले सत्य विवेकाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत असल्यामुळे नास्तिकांच्या मनात कुठलाही संदेह नसतो. आस्तिकांजवळ मात्र काल्पनिक गृहीतकांशिवाय कोणतेच साधन नसते. निराधार परंपरांवर डोळे मिटून श्रद्धा ठेवीत ते अंधारात चाचपडत असतात. कुठलीही प्रायोगिक सिद्धता न लाभलेल्या गूढ, गहन, अनाकलनीय, धूसर अशा गोष्टींचे आस्तिकांना विलक्षण आकर्षण असते. सुबोधतेपेक्षा दुर्बोधतेकडे ओढा असणे, स्पष्टतेपेक्षा धूसरता अधिक आवडणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, ज्ञानाऐवजी अज्ञानात सुख वाटणे , आकारापेक्षा निराकारात रमावेसे वाटणे हा वैचारिक जगतातील मोठा विरोधाभास आहे.

पुढे वाचा

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

पी साईनाथ यांच्या वार्तांकनातुन ग्रामीण, दुर्लक्षीत, पिडीत समाजाची परिस्थीती मुख्य इंग्रजी दैनिकातुन दिसु लागली. हाच वारसा सांगणारे, इंग्रजीतुन वार्तांकन करणारे जयदीप हर्डीकर यांनी A Village Awaits Doomsday(Penguin Books) हे पुस्तक लिहीले आहे.

सृष्टिक्रम

जातिसंस्थेच्या उपपत्तीविषयी मी जी मांडणी केली आहे, ती अपुरी आहे असे माझ्या वाचकांशिवाय मलाही वाटत होते. माझ्या मित्रांचा माझ्या लिखाणावर आणखी एक आक्षेप आहे; तो आक्षेप असा की मी ब्राह्मणांना झुकते माप दिले आहे. त्यांनी जो अन्य जातींवर पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे त्याची जबाबदारी त्यांच्यावर न टाकता मी सृष्टिक्रमावर किंवा कालचक्रावर टाकीत आहे. त्यामुळे आता ब्राह्मणांना कुठलेही प्रायश्चित्त घेण्याची गरज उरली नाही व हे माझे करणे योग्य नाही.

भारतात उच्चवर्णीयांनी अन्य जातींवर अन्याय केला, हे खरेच आहे. ते मी मुळीच नाकारत नाही.

पुढे वाचा