मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०२२

दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… ?

भारतात बहुतांश आदिवासी समुदाय आहेत. त्यापैकी फासेपारधी हा एक समाज. हा समाज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. फासेपारधी समाजातल्या माणसांवर आत्ताही हल्ले होतात. पोलिसांकडून आणि न्यायव्यवस्थेकडून वेळोवेळी छळवणूक होत राहते. त्यात आता आणखी भर म्हणजे बेड्या-तांड्यांपासून जवळ असणाऱ्या गावातल्या लोकांकडून होणारा अत्याचार.

चार महिन्यांपूर्वीची एक घटना आहे. टिटवा बेड्यावरच्या दोन पारधी तरुणांना बाजूच्या गावातल्या लोकांनी खूप मारलं. गावात वीजपुरवठा करणारी डीपी जाळून टाकली. सहा महिने बेड्यावरची बाया-माणसं, लहान लेकरं अंधारात राहिली. हे प्रकरण गावातल्या सरपंचाच्या मध्यस्थीनं मिटवण्यात आलं; परंतु मारहाण झालेल्या तरुणांना न्याय मिळाला नाही.

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग ४)

आणीबाणीच्या काळापासून मला काश्मीरमधे अनेक वेळा जाण्याची संधी मिळाली असून या ४७ वर्षांत मी किती वेळा गेलो आहे तेदेखील मला आठवत नाही. तसेच १९७५-७७ मध्ये आतंकवाद हा शब्ददेखील ऐकलेला मला आठवत नाही.

उलट बलराज पूरी व वेद भसीन यांसारख्या जुन्या समाजवादी मित्रांनी सांगितलेले आठवते की “काश्मीरच्या इतिहासात १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार असताना प्रथमच फ्री आणि फेअर निवडणूक पार पडली. त्यानंतर दहा वर्षांनी १९८७ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन केंद्रातील सरकारने प्रचंड प्रमाणात हस्तक्षेप करून, संरक्षणदलाची मदत घेऊन संपूर्ण निवडणूक आपल्याला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आटोपली.

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग ३)

(प्रस्तुत लेखकाचे ‘काश्मीरचे वर्तमान’ ह्या लेखाचे दोन भाग आजचा सुधारक’ने डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ या अंकांमध्ये प्रकाशित केले होते. ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा काश्मीरला जाऊन आल्यानंतरचे त्यांचे अनुभव त्यांनी पुन्हा एकदा ‘आजचा सुधारक’मध्ये प्रकाशित करण्यासाठी पाठवले आहेत. ते भाग ३ व भाग ४ असे आपण प्रकाशित करतो आहोत. देशाच्या राजकीय पटलावरील बदलाचा काश्मीरच्या सामाजिक स्थितीवर किती आणि कसा प्रभाव पडला आहे याचे इत्थंभूत वर्णन त्यांनी येथे केले आहे.)

काश्मीरला बळाद्वारे कुणीही जिंकू शकत नाही, केवळ पुण्याने आणि प्रेमानेच जिंकू शकता.

पुढे वाचा

न्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा…! (एक संक्षिप्त आकलन)

पृथ्वीवरील मानवेतिहासातील आजवरचा सर्वांत भयानक व खतरनाक असा कोरोना व्हायरस नुकताच येऊन गेला आणि तो अजूनही आपले अस्तित्व अधूनमधून दाखवतच असतो. या कोरोना व्हायरसने जगातील असंख्य मानवदेह नष्ट केले असून अजूनही त्याचा हा प्रचंड प्रकोप त्याने पूर्णरूपेण थांबवलेला नाही. अशा या कोरोना व्हायरसपेक्षासुद्धा कितीतरी पटीने भयानक व खतरनाक असा एक व्हायरस गेल्या शतकापासूनच मानवेतिहासात आपले अस्तित्व नोंदवून हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. एवढेच नव्हे तर तो व्हायरस रोजच्यारोज आणखीन अपायकारक होत जात आहे. दुर्दैवाने बहुतांश मानवजातीला याची अजूनही पुरेपूर जाणीव झाल्याचे दिसून येत नाही.

पुढे वाचा

सार्वकालिकता – एक विचार

सार्वकालिकता अर्थात शाश्वतता ही मानवी जीवनाची एक जमेची बाजू आहे. पण ही जमेची बाजू नेहमीच योग्य असते असे नव्हे. सार्वकालिकतेचा स्पष्ट अर्थ ‘कालसुसंगत’ असा व्यवहारात असता तर सार्वकालिकता या शब्दालाच योग्य अर्थ प्राप्त झाला असता. पण सार्वकालिकता या शब्दाचा बहुतांशी वेळा समाज व्यवहारात अर्थ घेतला जातो तो ‘पारंपरिक’ या अर्थाने. इथे मोठा घोटाळा होतो. कारण परंपरागत चालत आलेली कोणतीही गोष्ट जणू पवित्रच असते आणि त्याच्यामध्ये कदापि बदल करू नये असे समाजमन अर्थात बहुतांशी लोकांचे सांगणे असते. सार्वकालिक या शब्दाला जेव्हा परंपरागत या शब्दाचा अर्थ प्राप्त होतो तेव्हा समाजात अनेक प्रश्न, वाद तयार होतात.

पुढे वाचा

ओॲसीस

मूळं वाळवंटातही रोखून धरतात ओलावा
जीवघेणं ऊन सोसूनही
टिकवून ठेवतात अस्तित्व
मातीशी घट्ट नातं जोडून
शोधू पाहतात ओॲसीस

विस्तारणाऱ्या मुळांना माती नाही अडवत
दोघेही असतात गुंतलेले

आभाळही नाही थांबवत वाढणाऱ्या फांद्यांना
सारं घडतं आपल्याच अवतीभवती
तरी माणसाची नजर खुंटलेलीच…!

जि. वाशिम
मो. 7875173828

कलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व

वकिलीचे शिक्षण घेताना मला प्रकर्षाने असे जाणवायचे की, समोर आलेल्या पुराव्यावरून निकाल तर दिला जातो. पण तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’सारखी नाटके आपल्या समाजातील स्थितीला दर्शवतात. वास्तवातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट गोड करता येतो पण समाजात केवळ ठोस पुराव्याअभावी कितीतरी अपराधी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. किंवा निरपराध लोक कायद्याच्या चकाट्यात अडकलेले दिसतात. कायदा आहे, तशा त्याला पळवाटाही आहेत आणि सद्य:स्थितीत या पळवाटा अधिराज्य करताना दिसतात. समाजात एखादा गुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी एक प्रकारची भीती बसावी या उद्देशाने शिक्षेचे स्वरूप ठरवलेले असते.

पुढे वाचा

मराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच

लेखक – डॉ. विवेक घोटाळे

मराठा वर्चस्व किती खरे किती आभासी
जात, राजकारण आणि अर्थकारण हा आधुनिक सामाजिक शास्त्रीय संसोधनाचा केंद्रबिंदू नसला तरी महत्त्वपूर्ण बिंदू आहे. मराठा वर्चस्व आणि महाराष्ट्रीय कॉंग्रेस व्यवस्थावर्चस्व या दोन संकल्पना एकध्वनी वाटाव्या अशी परिस्थिती महाराष्ट्रात एकेकाळी होती. आजमितीला कॉंग्रेस व्यवस्थेचे मराठाधारित आर्थिक वर्चस्वाचे प्रतिमान राजकीय सत्तेच्या केंद्रस्थानी नसले तरी राजकीय सत्ताव्यवहाराच्या चौकटीचा तो एक कोन आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचे संशोधक व पुण्यातील युनिक फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक घोटाळे यांचे ‘मराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच’ हे चिकित्सक पुस्तक प्रकाशित झाले आहे.

पुढे वाचा

देख तेरे संसार की हालत…

‘धर्मापेक्षा मोठे कोणी नाही, मग कोणाच्या जिवाला धोका असला किंवा एखाद्याचा जीव गेला तरी चालेल’ अश्या वृत्तीवर प्रहार करणारा ‘भोंगा’ चित्रपट नुकताच पाहण्यात आला. Hypoxic Ischemic Encephalopathy या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याची प्रकृती दिवसभरातून पाच वेळा होणाऱ्या मशिदीतील अजानच्या आवाजाने अधिक खालावते. त्या भोंग्याच्या आवाजाचा परिणाम मुलाच्या मेंदूवर आणि मनावर होत असून, “तुम्ही एकतर घर बदला किंवा त्या भोंग्याचा आवाजतरी कमी करा”, असा सल्ला डॉक्टर देतात. सोबत उपचार सुरूच असतात. घर बदलणे शक्य नसल्याने कुटुंबीय, गावातील सुजाण नागरिक भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी संबंधितांकडे विनवणी करतात.

पुढे वाचा