मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०२३

परीक्षण – पेशींचे गाणे

Book: The Song of The Cells: An Exploration of Medicine and the New Human
Siddhartha Mukherjee, Imprint: India Allen Lane, October 2022

‘पेशींचे गाणे’ ह्या आपल्या नव्या पुस्तकात प्रसिद्ध लेखक आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी म्हणतात, “आपण म्हणजे आपल्या शरीरात नांदणारी पेशींची संस्कृती!” पुस्तकाचे शीर्षक आणि पुस्तकाबद्दल लेखकाच्या दिल्लीत झालेल्या वार्तालापाचे वृत्त वाचले, तेव्हा पुस्तक वाचलेच पाहिजे असे वाटले. गंमत म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला माझ्याच शरीरातले पेशींचे गाणे ऐकू यायला लागले, थोडेसे समजायला लागले. आपले शहर जसे बहुविध नागरिकांमुळे तयार होते, तसेच आपले शरीर म्हणजे आपली बहुविध पेशींनी तयार होणार संस्कृती हे लेखकाने वापरलेले रूपक मला एक आर्किटेक्ट आणि नगरविज्ञान विषयाची अभ्यासक म्हणून विशेष भावले.

पुढे वाचा

धर्मग्रंथ-दहन आंदोलने

या लेखात भारत आणि दोन प्रगत देशांतील धर्मग्रंथ-दहन आंदोलने आणि संबंधित कायद्यांचा संक्षिप्त आढावा घेऊन वस्तुस्थितीचे विश्लेषण केले आहे.

यावर्षी डेन्मार्क आणि स्वीडनमधील कुराण जाळण्याच्या, आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अश्या घटना समोर आल्या आहेत. वकील आणि उजव्या विचारसरणीचे डॅनिश राजकारणी रासमस पैलुडन यांनी २१ जानेवारी रोजी स्टॉकहोम येथील तुर्कस्तानच्या दूतावासासमोर इस्लाम आणि मुस्लिम स्थलांतराच्या विरोधात तासभर भाषण केले आणि त्यानंतर कुराणची प्रत जाहीरपणे जाळली. स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या सलवान मोमिका नावाच्या आणखी एका इसमाने २८ जून रोजी इस्लामी ईद-उल-अजहा सणादरम्यान स्टॉकहोमच्या सर्वांत मोठ्या मशिदीसमोर कुराणची पाने फाडून जाहीरपणे जाळली.

पुढे वाचा

गुणवत्ता विरुद्ध आरक्षण

गुणवत्ता विरुद्ध आरक्षण हा आपल्या समाजात निरंतर सुरू असलेला आणि विशिष्ट गंड निर्माण करणारा प्रश्न आहे.

खरे तर घटनाकारांनी विशिष्ट समाजघटकांसाठी स्वातंत्र्यानंतर काही मर्यादित काळासाठी आरक्षणाची तरतूद ठेवली होती. तथापि राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी आरक्षण हा घटनेचा मूलभूत अधिकार असल्यासारखे प्रस्थापित केले. सध्या तर आरक्षणाविरुद्ध जो कोणी काही बोलायचा, करायचा प्रयत्न करेल तो राष्ट्रद्रोही असे ठरवण्याइतकी गंभीर परिस्थिती आहे. घटनाकारांनी नेमून दिलेल्या कालावधीत विशिष्ट समाजाचा विकास आपण करू शकलो नाही याचे वैमनस्य अथवा अपराधीपण राज्यकर्त्यांना कधीच वाटले नाही आणि त्याचा उपयोग करून आपला विकास करून घेण्याची संधी गमावल्याचे वैषम्य तशा समाजघटकांनाही वाटले नाही. 

पुढे वाचा

भ… भवितव्याचा!

शिक्षणव्यवस्थेविरुद्ध लढा हा पूर्वीपासून चालत आला आहे. पूर्वी काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. आजकाल कायद्याने सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी शिक्षणातील नेमके मर्म काय याबाबतीत वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर; जेव्हा व्यक्ती सक्षम होऊन कारकीर्द घडवण्याच्या मार्गावर असतो तेव्हादेखील त्याचे मार्गदर्शन न झाल्याचे जाणवते. बहुतांश भाग ग्रामीण असून भारतामध्ये भवितव्याच्या केवळ ठराविक दिशाच निवडल्या जातात. त्यामागे परंपरागत जुने विचार, आर्थिक समस्या अशा वेगवेगळी कारणे आहेत. भवितव्य ऐन शिखरावर असताना आपण निवडलेला अभ्यासक्रम शिकूनदेखील त्यात गुणवत्ता नाही हे विद्यार्थ्यांस जाणवते.

पुढे वाचा

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २

निसर्ग ही भौतिक पदार्थांची एक व्यवस्था होय, असे निसर्गाविषयीचे मत मान्य केल्यास, निसर्गाकडे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा उत्पादनाचा स्त्रोत म्हणून पाहता येईल, अशी अनेक अर्थशास्त्रज्ञांची निसर्गाविषयीची भूमिका असते. मार्क्सही याला अपवाद नाही. 

मानव निसर्गात, निसर्गाच्या साह्याने जगणारा प्राणी आहे म्हणजे तो निसर्गावर जगणारा प्राणी आहे, असे म्हणण्यात हे अभिप्रेत असते की ज्या भौतिक पदार्थांची एक व्यवस्था निसर्ग असतो त्या भौतिक पदार्थांमध्ये – त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे – मानवाची गरजपूर्ती करण्याची शक्ती असते. या शक्तीला पदार्थांतील ‘उपयोगिता’ असे म्हणता येईल. पदार्थांतील उपयोगितेमुळे म्हणजेच त्यांच्या अंगी असलेल्या मूलभूत गुणधर्मांमुळे पदार्थांना जे मूल्य प्राप्त होते, त्यांना अर्थशास्त्रज्ञ ‘उपयोगमूल्ये’ असे म्हणतात.

पुढे वाचा

परीक्षण – निर्वासित

मूळ पुस्तक : निर्वासित (आत्मकथन), लेखक : उषा रामवाणी,  
उषःकाल पब्लिकेशन, मुंबई १ जून २०२३

निर्वासित म्हणून ओळखले जाणारे सिंधी लोक महाराष्ट्रातील गावागावातून व्यापारी म्हणून स्थिरावले. पण त्या समाजातील मान्यतांपेक्षा निराळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या मुलीला आईवडिलांच्याच घरात निर्वासित असल्यासारखे वाटले. अशा उपेक्षित मुलीचा संघर्ष किती तीव्र असेल? उषा रामवाणी यांच्या ‘निर्वासित’ या आत्मकथनातून त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड, मायेचा ओलावा मिळण्यासाठी आसुसलेले हळवे मन दिसते. अर्थार्जनासाठी खडतर वाटचाल त्यांनी केली. अथक प्रयत्न केले. मराठी भाषेवर केवळ प्रभुत्व नव्हे तर प्रेम असणाऱ्या या तडफदार स्त्रीची संघर्षगाथा वाचनीय तर आहेच पण डोळ्यात अंजन घालणारीही आहे. 

पुढे वाचा