Author archives

लेखनाच्या अराजकासंबंधाने (३)

माझ्या शुद्धलेखनविषयक प्रतिपादनास विरोध करणारी ३-४ पत्रे आली आहेत आणि २ लेख अन्यत्र प्रकाशित झाले आहेत. त्यांचा येथे परामर्श घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व पत्रलेखकांचा आणि माझा मतभेद मुख्यतः एकाच ठिकाणी आहे. त्यांना उच्चाराप्रमाणे लेखन पाहिजे आणि मला त्याची गरज वाटत नाही. लेखन हे कधीच उच्चाराप्रमाणे नसते. ते वाचकांना पूर्वपरिचित असलेल्या उच्चाराची आठवण करून देणारे असतें ही एक गोष्ट ; आणि लेखनापासून अर्थबोध होण्यासाठी त्याचा उच्चार मनांतदेखील करण्याची गरज नाही, तसा उच्चार करून पाहण्यांत वाचकाचा कालापव्यय होतो; आणि आपल्याला जरी तशा संवयी लागलेल्या असल्या तरी त्या संवयी प्रयत्नपूर्वक मोडायला हव्या ही दुसरी गोष्ट.

पुढे वाचा

सायकल आणि कार (उत्तरार्ध)

आजच्या घडीला सायकलचा इतिहास व महत्त्व सांगण्याचे कारण म्हणजे कारचा वाढता खप, पेट्रोल-डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमती, त्यामुळे वाढत जाणारे प्रदूषण व वाहनांच्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. १९ व्या शतकातील ऊर्जा समस्येवर घोड्याच्या शक्तीऐवजी मानवी शक्तीचा वापर करणाऱ्या सायकलचा शोध लागला तसे आज खनिज तेलाच्या समस्येवर पर्यायी ऊर्जा म्हणून बायो-डिझेल व हायड्रोजन यांचा वापर करता येईल का याची चाचपणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. परंतु हे मोठ्या प्रमाणावर केव्हा शक्य होईल हे सांगता येत नाही. अमेरिकेतील अॅमरी लव्हिन्स हा मनुष्य गेली ३० वर्षे तेलाबद्दल व त्याच्या वापराबद्दलच्या कार्यक्षमता वाढवण्याबाबत विवेचन करीत आहे.

पुढे वाचा

देशभक्ती आणि राष्ट्रवाद

देशभक्ती (patriotism) आणि (nationalism) ह्या दोन शब्दांत फरक आहे. त्यांचा अर्थ आणि संकल्पना समजून घेतल्याशिवाय त्यांचा योग्य वापर होणार नाही.

ह्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण आपल्या अस्मितेचा अभ्यास केला पाहिजे. आपली अस्मिता ही आपल्या स्वप्रेमावर आधारित असते. मी, माझे देशबांधव, समाज ज्याच्याशी मी रक्ताच्या नात्याने बांधला गेलेलो आहे त्याच्यावरच्या प्रेमामुळे सर्व समाजाला ‘आम्ही’ म्हणले जाते. तर आपल्याशिवाय दुसऱ्याला ‘ते’ म्हणून संबोधले जाते. ‘आम्ही’वरचे प्रेम ही घन (positive) भावना आहे, तर ‘ते’ ह्या शत्रूरूप दुसऱ्यांच्या द्वेष करून मी माझे स्वप्रेम किंवा आम्हीवरचे प्रेम अभिव्यक्त करत असलो किंवा ते मजबत करत असलो तर तो अस्मितेचा ऋण आविष्कार होय.

पुढे वाचा

शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था

कृषिप्रधान संस्कृतीतूनच कामाची वाटणी (division of labour) सुरू झाली. हळूहळू वस्तुविनिमयही वाढला आणि नागरी समूह उदयाला आला. कारखानदारी आल्यावर तर नागरीकरणाने जोरच धरला आणि नागरी मानवीसमूह, ग्रामीण मानवीसमूह हे स्पष्टपणे विलग झाले. वस्तुविनिमय पैशाच्या माध्यमातूनच सुरू झाला. माणसांचे आमनेसामने संबंध व्यवहार बंद झाले. जे अनेक व्यवहार अपरोक्ष होत ते आता परोक्ष व्हायला लागले. दृश्य, सहज जाणवणारे नातेसंबंध व परस्परावलंबन तितके उघड राहिले नाही. आज असे जाणवायला लागले आहे की शहरी पांढरपेशा समाज, संघटित कारखानदारी समाज आणि ग्रामीण कृषीवल समाज यांच्यात काही एक किमान संवादही उरलेला नाही आणि त्यामुळे अनेक बाबतींत संघर्षाच्याच भूमिका घेण्याकडे कल दिसू लागला आहे.

पुढे वाचा

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या श्रद्धा, ज्ञान आणि परंपरा ह्यांनी कसे संस्कारित झालेले असते हे युरोपिअन तैलचित्रांच्या माध्यमातून तपासते. पुस्तकातील सात निबंधांमधून लेखक वाचकाच्या मनात प्रश्न जागे करू इच्छितात. काही निबंध शब्द आणि प्रतिमा ह्यांचा वापर करतात तर काही निबंध फक्त प्रतिमांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडतात.

पुढे वाचा

उपभोगासाठी भीतीचे संचलन

… एका सांसदीय वादविवादात चर्चिलने आपली वास्तवावरील पकड दाखवून दिली. संरक्षणखर्च का वाढवावा, हे सांगताना तो म्हणाला, “…आपण क्षीण वारसा आणि निरागस इतिहास असलेले तरुण समाज नाही आहोत. आपण जगाची संपत्ती आणि व्यापार यांचा सर्वथा प्रमाणाबाहेर भाग स्वतःसाठी हडपला आहे. आपण हवे तेवढे भूक्षेत्र घेतले आहे. ही आपली मालमत्ता हिंसेने कमावलेली आणि प्रामुख्याने बळजोरीने राखलेली आहे. आम्हाला ही सत्ता शांतपणे भोगू द्या, हा आपला दावा आपल्याला जितका विवेकाधारित वाटतो, तेवढा इतरांना बहुतेक वेळी वाटत नाही.”
यातील शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण भारतात द्यायची गरज नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रतिवाद करता आला असता. “भारतीय व इतर गरीब देशातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला” अशी अतिव्याप्त व टोकाची विधानेदेखील आसु मध्ये येण्याच्या पात्रतेची वाटत नाहीत. आपली निवड अधिक चोखंदळ असावी.
(२) संदर्भः महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ १३४/आसु/जून २००५
महानगराच्या वाढीबरोबर झोपडपट्टीची वाढ होणारच, असे अटळ समीकरण बांधणे सोपे, पण चुकीचे आहे..
झोपडपट्टीत राहणाऱ्या बहुतेक सर्वांची आर्थिक क्षमता भाड्याने जागा घेऊन राहण्याची किंवा स्वतःचे लहानसे घर बांधण्याची असते. पण नागरी कमाल जमीन धारणा कायदा व भाडे नियंत्रण कायदा यामुळे कायदेशीरपणे भाड्याने देण्यासाठी चाळी बांधणे बंदच झाले, असलेल्या चाळींची देखभाल अशक्य झाली, व जमिनींच्या किमती अवास्तव वाढून स्वतःचे घर बांधणे अशक्य झाले.

पुढे वाचा

सायकल आणि कार (पूर्वार्ध)

विल्यम वॅगस्टाफ ह्या ९१ वर्षीय माणसाचे नुकतेच लंडन येथे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने आपली वैशिष्ट्यपूर्ण सायकल लंडन येथील ट्रान्सपोर्ट म्युझियमला भेट दिली. ह्या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे वॅगस्टाफने ती ७५ वर्षे वापरली. वयाच्या २० व्यावर्षी बचत करून १९२९ साली ही सायकल त्याने विकत घेतली होती. केवळ शेवटची दोन वर्षे आजारी असल्यामुळे सायकलचा वापर त्याला करता आला नाही. वयाच्या नव्वदीनंतरही आठवड्यातून २ ते ३ वेळा तो सायकल चालवत असे. इंजिनिअर म्हणून टेलिफोन खात्यात काम करीत असताना त्याचे दररोज २० किमी सायकलिंग होत असे.

पुढे वाचा

विवेकवाद-भाग ९(अ) : नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (प्रथम प्रकाशन डिसेंबर १९९० – जानेवारी १९९१ अंक १.९-१०, लेखक: दि. य. देशपांडे)

नवा सुधारक च्या ऑक्टोबर अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या आगरकरांच्या उताऱ्याचे शीर्षक आहे, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’. या विषयावर स्पष्टीकरणात्मक असे काही लिहावयाचा आज विचार आहे.
आजपर्यंत ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे जे आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यांसंबंधाने काही चमत्कारिक विचारणा आमच्याकडे केल्या गेल्या आहेत. एक वाचक म्हणाले की तुमच्या विवेकवादात भावनांना काहीच स्थान नाही काय ? तुमच्या लेखांवरून आमचा असा समज झाला आहे की तुम्हाला फक्त तर्ककर्कश गोष्टीच मान्य दिसतात. तुमच्या व्यवस्थेत भावनेला काहीच स्थान दिसत नाही. दुसरे एक वाचक म्हणाले की तुम्ही धर्मांवर असे तुटून पडला आहात की तुमच्या विवेकवादात केवळ सुखप्राप्तीलाच तेवढे स्थान आहे.

पुढे वाचा

सोशलिझम इज डेड, लाँग लिव्ह सोशलिझम्

आजच्या सुधारक च्या मे २००५ चा अंक गिरणी विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला. त्यात अहमदाबाद येथील ज्या कापड गिरण्या बंद झाल्या व त्यात काम करणाऱ्या मजुरांची दैना झाली त्याचे चित्रण इंग्रजीत थीज्ञळपस ळप हिश चळश्रश्र छे चीश ह्या शीर्षकाखालील पुस्तकात प्रा. यान ब्रेमन व छायाचित्रकार पार्थिव शहा ह्या दोघांनी केले. त्या पुस्तकाचा मराठी (सैल) अनुवाद, त्यावर प्रा. स.ह. देशपांडे, श्रीमती नीरा आडारकर, अधिवक्ता एस्.डी.ठाकूर, स्मिता गुप्ता ह्यांच्या टिप्पणी व प्रस्तुत लेखकाची ‘प्रस्तावना’ असा तो अंक होता. त्यावर अभ्यासक श्री. नी. र. व-हाडपांडे ह्यांनी आपली प्रतिक्रिया पाठविली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

पुढे वाचा