ज्याला लोक इतिहास समजतात तो म्हणजे ईजिप्त, बॅबिलोनिया, इराण, मॅसिडोनिया आणि रोम इत्यादींच्या साम्राज्यांपासून थेट आपल्या काळापर्यंतचा इतिहास. ते त्याला मानवाचा इतिहास म्हणतात, पण त्यांना अभिप्रेत असलेली गोष्ट. (जी ते शाळेत शिकतात) म्हणजे राजकीय शक्तींचा इतिहास होय.
मानवाचा इतिहास नाही; मानवी जीवनाच्या विविध अंगांचे अनेक इतिहास तेवढे आहेत. आणि त्यांच्यापैकी एक राजकीय शक्तींचा इतिहास आहे. त्यालाच जगाचा इतिहास असे भारदस्त नाव दिले जाते. पण हे मानवाच्या कोणत्याही शिष्ट संकल्पनेचा अधिक्षेप करणारे आहे असे माझे मत आहे. पैशाच्या अफरातफरींचा, दरवडेखोरीचा किंवा विषप्रयोगाचा इतिहास मानवजातीचा इतिहास मानण्यासारखे ते आहे.
Author archives
पत्रव्यवहार
संपादक
आजचा सुधारक
गेल्या तीन चार महिन्यांच्या आजच्या सुधारक च्या अंकातल्या काही चांगल्यालेखांमध्ये जी अनवधानाने अगर अति उत्साहाने केलेली चूक अगर अतिवास्तव विधानेजाणवली त्याबद्दल हे पत्र.
१. नंदा खरे (सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे, नोव्हें. १९९५) यांचीसाक्षात्काराविरुद्ध अंतस्फूर्त ज्ञान या विषयाची मीमांसा उत्कृष्ट आहे. खरे तर जे अंतःस्फूर्तीचे अनुभव रामानुजन किंवा केकुले ह्यांना आले तसे थोड्या फार फरकाने बर्या.चसामान्य संशोधकांनाही येत असतातच. निदान मी स्वतः, अत्यंत सामान्य माणूस असूनही, असा अनुभव घेतलेला आहे. (मात्र मी ध्वन्यर्थानेही स्वतःची रामानुजनबरोबर तुलना करीत आहे असा हास्यास्पद अर्थ कुणीही काढू नये.)
एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान
जीवशास्त्र व आनुवंशिकताविज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सुज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल. वैद्यकशास्त्राप्रमाणे जन्माला आलेला मुलगा गर्भावस्थेतूनच काही ना काही आनुवंशिक रोगांची शिकार झालेला असतो. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे मुलींमध्ये मुलांपेक्षा जरूरीपेक्षा जादा आढळणारे एक्स हे गुणसूत्र असावे. मुलामध्ये एखादे बिघडलेले गुणसूत्र असेल तर ती चूक निस्तरण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही.
समाजसुधारणा, पुनर्घटना आणि डॉ. केतकर
अमेरिकेस गेल्यानंतर आपण काय करावे याचे मनापुढे कोणतेच कल्पनाचित्र नव्हते’ असे म्हणणारे केतकर, तेथील विद्यार्जन आटोपताच,
जाई देशी, कार्यलागे स्वजनांच्या कल्याणा
असे कृतनिश्चय होऊन परतले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यातज्ञानकोशाचा उपयोग त्यांनी पाहिला होता. तयार ज्ञान तत्काळ हाताशी असणे याचा फायदा इंग्रजी सुशिक्षितांस सहज मिळत होता. तसा ज्ञानकोश मराठीच असावा असे त्यांना वाटू लागले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वरील अमेरिकन समाजाचे काही आक्षेप त्यांना पटले होते; त्यामुळे ज्ञानकोशात सर्व ज्ञानाचा संग्रह व्हायचा असला तरी तो संग्रह ज्ञानकोश ज्या समाजासाठी असेल त्याच्या गरजांप्रमाणे ठेवला पाहिजे असे त्यांनी ठरविले.
लैंगिक मुक्ती आणि स्वैराचार
स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक भारतीय व आशियामधल्या (बहुतेक) स्त्रीपुरुषांना समजणे कठीण जाते याचा प्रत्यय परत श्री गलांडे यांच्या (नोव्हें. ९५) पत्रातून आला. म्हणून परत लैंगिक मुक्ती व स्वैराचार ह्यांच्या (माझ्या) व्याख्या लिहिते.
लैंगिक स्वातंत्र्य अथवा मुक्ती असणे म्हणजे शरीरसंबंधास हो किंवा नाही म्हणण्याची संपूर्ण समाजमान्य मुक्तता.
स्वैराचार म्हणजे असंख्य मित्रमैत्रिणींशी अल्प परिचयात शरीरसंबंध, मजा म्हणून one night stand व वेश्यागमन.
स्त्रियांची अत्यंत हानी त्यांच्या लैंगिक पावित्र्याला अवास्तव दिलेल्या महत्त्वामुळे झालेली आहे. म्हणून मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे.
राष्ट्रवादाच्या उठावाची माहितीपूर्ण चिकित्सा
जगाच्या नव्या रचनेत राष्ट्रवादाचे स्थान काय राहील, हा प्रश्न सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना वारंवार पडतो. विशेषतः दुसऱ्यार महायुद्धानंतर ही चर्चा सुरू झालीआणि इतिहासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यानंतर या चर्चेने जोर धरलेला दिसून येतो. सुरुवातीला दळणवळणक्रांती आणि आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य यामुळे राष्ट्रीय ।।। अस्मिता पुसट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘बहुराष्ट्रीय भांडवलशाहीमुळे राष्ट्रवादाचा अस्त होईल, असे काहींना वाटत होते, तर दुसऱ्या- बाजूला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने ही प्रक्रिया लवकर घडून येईल, असे बरेच जण मानत होते. प्रत्यक्षात । काय घडते आहे? विविध देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करणार्या- तज्ज्ञांचे निबंध संकलित करून डेव्हिड हुसॉन यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
धर्म आणि विवेक
दि. य. देशपांडे यांचा ‘धर्म, सुधारणा आणि विवेक (आ. सु., जानेवारी १९९६) हा लेख वाचून सुचलेले विचार पुढे मांडायचे आहेत.
दि. य. यांचे प्रतिपादन असे की ‘धर्म आणि ‘सुधारणा या शब्दांना एकत्र केल्याने ‘वदतो व्याघात होतो. कारण, ‘धर्म हा श्रद्धेवर म्हणजे पुराव्याशिवाय केलेल्या विधानांवर
आधारलेला असतो, उलट सुधारणा बुद्धीवर, विवेकावर आधारलेली असते, श्रद्धा आणि विवेक यांचा परस्पर विरोध असतो. ते म्हणतात, “मला मात्र धर्मसुधारणा ही कल्पनाच वन्ध्यापुत्र या कल्पनेसारखी दोन परस्परविरुद्ध कल्पनांच्या संयोगाने बनलेली संकल्पना वाटते.”
‘धर्मसुधारणा’ हा प्रकार तर्कतः अशक्य (वाटत) असला तरी तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहेच.
महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास
महाराष्ट्रातील विद्यापीठांत आणि महाविद्यालयांत तत्त्वज्ञानाचे जे अध्ययनअध्यापन सध्या चालू आहे त्याचे स्वरूप काय आहे? आणि त्याची अवस्था काय आहे?
वाचक विचारतील, काय झालं आहे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला? आमची तर सर्व काही आलबेल आहे अशी कल्पना आहे. तत्त्वज्ञानाचे उद्बोधनवर्ग (refresher courses) नेमाने होताहेत आणि त्यात सर्व प्राध्यापक न चुकता हजेरी लावताहेत. वर्षातून दहा-पाच तरी पीएच.डी. बाहेर पडत आहेत. सेमिनार्स, वर्कशॉप्स, समरस्कूल्स इ. दरवर्षी होताहेत. एकूण चित्र तर फारच आशादायी दिसतंय.’ काही विचारतील की ‘तत्त्वज्ञानाचीच विशेष दखल घ्यायचे कारण काय? अन्य विषयांची जी स्थिती आहे तिच्याहून तत्त्वज्ञानाची वेगळी असण्याचे कारण काय?’
वास्तवे आणि मूल्ये
निसर्ग किंवा इतिहास कोणीही आपण काय करावे हे शिकवू शकत नाही. नैसर्गिक किंवा ऐतिहासिक वास्तवे (facts) यांपैकी कोणीही आपले निर्णय घेऊ शकत नाही. आपण कोणती साध्ये स्वीकारणार आहोत हे ती सांगू शकत नाहीत. निसर्गात किंवा इतिहासात हेतू आणि अर्थ आपण घालतो. मनुष्ये समान नाहीत; परंतु समान हक्कांकरिता झगडायचे आपण ठरवू शकतो. राज्यासारख्या मानवी संस्था विवेकी नसतात; परंतु आपण त्यांना विवेकी करण्याकरिता लढा करण्याचे ठरवू शकतो. आपण आणि आपली साधारण भाषा सामान्यपणे विवेकी नसून भावनिक असते; पण आपण थोडे अधिक विवेकी होण्याचे ठरवू शकतो, आणि आपली भाषा आपले रोमांचवादी शिक्षणतज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ‘आत्माविष्काराकरिता नव्हे, तर विवेकी संज्ञापनाकरिता (communication) वापरण्याचे स्वतःला शिकवू शकतो.
पत्रव्यवहार
संपादक,
आजचा सुधारक नागपूर
श्री. दिवाकर मोहनी यांनी “कुटुंब’ या शीर्षकाच्या ३ लेखांमध्ये प्रामुख्याने समाजातील कुटुंबरचनेच्या उणीवांचा ऊहापोह करून, कौटुंबिक स्वार्थामुळे समाजाचे अहित होते असा सिद्धांत मांडला आहे, व तो मांडण्यापूर्वी त्यांनी बराच सूक्ष्म मूलभूत मानवीय धारणांचा विचार केल्याचे स्पष्ट जाणवते. कुटुंबाची संकल्पना व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वार्थावरच कुटुंबाची प्रगती व उत्थान अवलंबून असते या हल्लीच्या सर्वमान्य विचारसरणीमुळे समाजाच्या समस्या अधिक बिकट होतात व त्यांचा अंत होण्याचा सुतराम
संभव नाही असे ते सुचवितात.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक रचनेत-विशेषतः समाजाच्या कुटुंबाधारित विभागात – आमूलाग्र बदल केल्याखेरीज तरणोपाय नाही असा त्यांना विश्वास आहे.