माझ्यात जाणीव आली कुठून?
आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्काळातील फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते व विनाकारण समाप्तही होते. किती गुंतागुंत व गोंधळ? फक्त आयुष्याचा विचार करण्यासाठी जाणीव नावाची चीज असल्यामुळे असले भंपक प्रश्न आपल्याला सुचत असावेत, असेही वाटण्याची शक्यता आहे.