विषय «अर्थकारण»

माप सुधारा

गेल्या ऑक्टोबरात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकलस सार्कोझी म्हणाले की विकासाच्या आकडेवारीत सुख हा घटकही देशांनी धरायला हवा. यावर अर्थातच टीका झाली, कारण सार्कोझी निवडून आले तेच मुळी श्रीमंतीच्या आश्वासनांवर. फ्रेंच लोक सुट्या फार घेतात. इतरही काही खास फ्रेंच वृत्ती आहेत. आता सार्कोझी या साऱ्याला अंकबद्ध करा असे म्हणताहेत. आता सुखासारखी मोजायला अवघड संकल्पना आकडेवारीत घ्यायचा प्रयत्न करणे, हे काहीसे वचनभंगासारखे दिसत आहे. पण सार्कोझी ठोक अंतर्गत उत्पाद, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (यापुढे GDP) या संकल्पनेवर हल्ला करत आहेत. तो निदेशक फक्त दरवर्षी किती पैशाचे देशातल्या देशात हस्तांतरण होते, हे मोजतो.

पुढे वाचा

एक क्रान्ती : दोन वाद (भाग १)

प्रस्तावना:
इसवी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील बहुतांश माणसे शेती व पशुपालन ह्यांवर जगत असत. त्यांच्या जीवनपद्धतीचे वर्णन अन्नोत्पादक असे केले जाते. त्यामागील राजकीय-आर्थिक-सामाजिक व्यवस्थेचे वर्णन सामंती , फ्यूडल (feudal) असे केले जाते. अठराव्या शतकाच्या मध्यावर मात्र एक नवी जीवनपद्धती उद्भवली. आधी इंग्लंडात उद्भवलेली ही पद्धत पुढे युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, अशी पसरत आज जगाच्या बहुतेक भागांपर्यंत पोचली आहे. आजही जगातली अनेक माणसे शुद्ध अन्नोत्पादक जीवनपद्धतीने जगतातच, पण बहुसंख्येचे बळ मात्र नव्या औद्योगिक जीवनपद्धतीने जगणाऱ्यांकडेच आहे.

औद्योगिक जीवनपद्धतीचा उद्भव औद्योगिक क्रांती, The Industrial Revolution, या आर्नल्ड टॉयन्बीने सुचवलेल्या नावाने ओळखला जातो.

पुढे वाचा

नगरे आणि आर्थिक विकास

आर्थिक दृष्टीने बघता छोट्या भौगोलिक परिसरात मोठी लोकसंख्या एकवटण्याची प्रक्रिया ही सर्व समाजाकराता फायदेशीर असते. नागरीकरणाची प्रक्रिया आर्थिक कारणांमुळेच घडत असते हे उघड आहे. या प्रक्रियेमुळे संपत्ती निर्माण झाली नसती तर ही प्रक्रिया कधीच वाढली नसती. जेव्हा लोकांची दाटी वाढते तेव्हा उत्पादनही वाढते. या दाटीवाटीमुळे काही लोकांच्या अंगभूत वैशिष्ट्यांना प्रगट व्हायची संधी मिळते. ज्या माणसांकडे काही विशेष कसब असते त्याचा वापर करून त्यांना त्यात प्रावीण्यही मिळवता येते. माणसांच्या आकांक्षापूर्तीसाठी मोठा परिसर उपलब्ध होतो, आणि अशाच ठिकाणी व्यक्तींच्या क्षमता उजेडात येतात. सत्ताधाऱ्यांना व्यापारी नगरांमधून खूप कर मिळतो याची चांगली जाणीव असते.

पुढे वाचा

आहेरे / नाहीरे

@ सिलिकन व्हॅली, कॅलिफोर्निया
(सॅन फ्रान्सिस्कोपासून आग्नेयेकडे पसरलेला शहरी पट्टा म्हणजे सिलिकन व्हॅली. विसाव्या शतकाच्या शेवटी ही जगाची तंत्रवैज्ञानिक राजधानी होती.)

कॉनी टॉर्ट २५ वर्षांची अविवाहित माता आहे, चार मुलांची. ती एका कुबट वासाच्या, भेगाळलेल्या भिंतींच्या, खिडक्यांना घोंगड्या लटकवलेल्या खोलीसाठी महिना ४०० डॉलर्स देते. शेजारची ॲडोबी सिस्टिम्स इं. ही सॉफ्टवेअर कंपनी वर्षाला एक अब्ज डॉलर्सची कमाई करते. “सिलिकन व्हॅली? नाही ऐकलं हे नाव,” कॉनी म्हणाली. तिला महिना ५०० डॉलर्स अपंगत्व भत्ता मिळतो. “इथले सगळेच जण तंत्रवैज्ञानिक पेशात नाहीत. आम्ही खूपसे लोक पोरांना जेमतेम जगवतो.”

पुढे वाचा

नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भात कर्मचारी संघटनांकडे दृष्टिक्षेप

नवीन आर्थिक धोरणांच्या संदर्भात भारतीय कर्मचार्‍यांच्या संघटनांचे धोरण विरोधी व स्वार्थी आहे. उदाहरणार्थ भारतातील ५४,००० (यांपैकी केवळ १०० शाखा बंद झाल्या तरी) ५३,९०० राष्ट्रीयीकृत बँक शाखांतील अवाढव्य (बहुधा २० लाख) कर्मचारीवर्ग थोडेसे अपवाद वगळता, रा. स्व. संघ व भा.ज.प. मनोवृत्तीचा आहे व त्यांच्या संघटनाही त्याच मनोवृत्तीच्या असतात. ह्या कर्मचार्‍यांची वृत्ती कशाप्रकारची आहे? रशियात सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण होत आहे म्हणून टाळ्या पिटायच्या व भारतातील खाजगीकरणाविरुद्ध प्राणपणाने लढा देण्याची भाषा करायची! बँक कर्मचारी व त्यांच्या संघटनांप्रमाणेच, त्यांचेच सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायबंधू व त्यांच्या संघटना उदाहरणार्थ आयुर्विमा, राज्य परिवहन, विद्युत मंडळ, इत्यादि बँक कर्मचार्‍यांचाच कित्ता गिरवतात.

पुढे वाचा