विषय «इतर»

पुण्याचा वाचक मेळावा

1 मे 2004 रोजी संध्याकाळी पुण्याला स्नेहसदन येथे आजचा सुधारकच्या वाचकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी आजचा सुधारकचे सुरुवातीपासूनचे वाचक आणि हितचिंतक ज्येष्ठ साहित्यिक श्री विजय तेंडुलकर होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आ.सु.चे वाचक आले होते. शंभरएक वाचकांच्या उपस्थितीत जी चर्चा झाली तिचा अहवाल पुढे देत आहोत.

आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री. रा.प. नेने म्हणाले की इतर अनेक मासिके बंद पडत असताना एक वैचारिक मासिक सातत्याने चौदा वर्षे चालविण्याचे धाडस आ. सु.ने केले आहे. हे साध्य करण्यासाठी वाचकांचे सहकार्य आवश्यक असतेच. त्यांचे विचार आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला आहे.

पुढे वाचा

संपादकीय

टेलिव्हिजनच्या वृत्तवाहिन्या भारतीयांच्या रोजमर्रा वापरातल्या शब्द- भांडाराला सूज आणत आहेत. अनेक नव्या संकल्पना आणि त्यांच्यासाठी वापरले जाणारे नवे शब्दप्रयोग यांच्यातून हा ‘फुगारा’ आणला जातो आहे. तसे हे नेहमीच घडत असते, पण निवडणुकींच्या काळात याला ऊत येतो. मे 2004 च्या निवडणूक काळातही हा सुजवटा-फुगवटा प्रकार भरपूर प्रमाणात दिसला. काही उदाहरणे तपासण्याजोगी आहेत.

जसे, कोणतेही सरकार नव्याने सत्तेवर आले की सुरुवातीचे काही दिवस मतदार व माध्यमे सरकारवर टीका करत नाहीत. “त्यांना काय करायचे आहे ते पाहू तर! पापपुण्याचा हिशोब उलटीकडे गेला तर मग हल्ले करू!”

पुढे वाचा

नास्तिकसाधना

साधना अथवा तपस्या यांना कोणत्याही क्षेत्रात खूप महत्त्व आहे. एखादे ज्ञान अथवा कौशल्य स्वतःमध्ये मुरवण्यासाठी वर्षानुवर्षे झपाटून जाऊन आणि सातत्याने प्रयत्न करीत राहणे म्हणजे साधना, तपस्या हा याच अर्थाचा शब्द. विज्ञान, कला, क्रीडा यांसारख्या कुठल्याही क्षेत्रात कठोर साधनेशिवाय काही साधण्याची शक्यता नाही. पण मुळात हे दोन्ही शब्द आध्यात्मिक साधनेसाठी वापरले गेले आहेत आणि आजही त्या क्षेत्रातच त्यांचा वापर मुख्यतः होतो. आध्यात्मिक साधना कशासाठी करतात? तर साक्षात्कारी, ज्ञानी, योगी, संत असे काहीतरी होण्यासाठी. या प्रकरणात मला काही अंशी धक्कादायक वाटेल असे एक विधान करायचे आहे; ते म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने आध्यात्मिक साधना करणाऱ्या साधकापेक्षा नास्तिक माणसाला संतपदाला जाणे जास्त सहज आणि सोपे आहे.

पुढे वाचा

सर्व काही पूर्वनियत आहे काय ? जनुकीय नियतवाद

विज्ञानाच्या प्रगतीबरोबर शास्त्रज्ञांना असे वाटू लागले की विश्वातील प्रत्येक बाबीची माहिती करून घेणे शक्य होईल, इतकेच नव्हे तर, घडणाऱ्या प्रत्येक घटनेची कारणपरंपरा आपण सांगू शकू. ह्याचाच पुढचा भाग म्हणजे एकदा का आपल्याला विज्ञानाचे नियम माहीत झाले तर पुढे काय होणार आहे ह्याचे भाकीतपण आपण करू शकू. जर आपण बरोबर भाकीत करू शकलो, तर पुढे काय होणार आहे, ते पूर्वनिश्चित आहे, असे म्हणावयास प्रत्यवाय नसावा. ह्यालाच वैज्ञानिक पूर्वनियतवाद असे म्हटले गेले. 1930 च्या सुमारास वैज्ञानिक पूर्वनियतवादाची चर्चा होती. पुढे कालांतराने वैज्ञानिक पूर्वनियतवादाबद्दलचा उत्साह कमी झाला.

पुढे वाचा

‘व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम ?’ च्या निमित्ताने (भाग-२)

इब्न वर्राक यांनी एक अत्यंत महत्त्वाची नोंद केली आहे. 1989 साली ‘ला इस्लाम क्वश्चन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यामध्ये पंचवीस अरब लेखकांना विचारल्या गेलेल्या पाच प्रश्नांच्या उत्तरांचे संकलन आहे. ते प्रश्न होते : (1) इस्लामची वैश्विक मांडणी आजही टिकून आहे का? (2) आधुनिक राष्ट्रासाठी इस्लामिक राज्यव्यवस्था लागू होऊ शकते का? (3) मुस्लिम आणि अरब लोकांच्या विकासासाठी इस्लामी व्यवस्थेचे सरकार असणे आवश्यक आहे का? (4) बहुसंख्य मुस्लिम देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इस्लामी पुनरुज्जीवनाचा जो विचार दिसतो तो योग्य आहे का? (5) आज इस्लामचा प्रमुख शत्रू कोण आहे?

पुढे वाचा

पत्रव्यवहार

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 वादविवाद ज्ञानसंवर्धनासाठी आवश्यक आहेत. आ. सु.मध्ये अनेक विषयांवर वादविवाद झाले. परंतु त्यात खेळाचे नियम मोडणारी पत्रे कमी असत. एप्रिल 2004 च्या अंकातील वसंत त्रिंबक जुमडे यांचे पत्र त्यांपैकी आहे. बहुतेक वादांमध्ये काही मूलभूत गृहीतकांना दोन्ही पक्षांची मान्यता असते. जुमडे यांच्या “… चर्चा व त्यातून दोषारोप हे ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने उपयोगी पडत नाहीत”, या दाव्यालाच बुद्धिप्रामाण्यवादाचा विरोध आहे, कारण “चर्चा हवी की नको”, या प्रश्नाचे उत्तर चर्चेने शोधले तर होकारार्थीच येईल. चर्चा नको अशी मागणी करणाऱ्या जुमडे यांना युक्तिवाद करण्याचाही हक्क नाही.

पुढे वाचा

बॅक्टीरियांचे वंशज

एक जीवजात म्हणून पाहता आपण अजूनही स्वतःबद्दलच्या धारणांमध्ये जे विक्षिप्त वाटते त्याला घाबरतो. डार्विन होऊन गेल्यावरही किंवा डार्विनमुळेही, एक संस्कृती म्हणून आपल्याला आजही उत्क्रांतीमागचे विज्ञान समजत नाही. विज्ञान आणि संस्कृति यांच्यात संघर्ष झाला तर नेहमीच संस्कृतीचा विजय होतो. (पण) उत्क्रांतीच्या शास्त्रांची जास्त समजून घेण्याची पात्रता आहे – हो, माणसे उत्क्रांत झाली आहेत, पण कपी किंवा इतर सस्तन प्राण्यांपासूनच नव्हे. आपल्या पूर्वजांमध्ये एक लांबलचक बॅक्टीरियांची यादी आहे, अंतिमतः अगदी पहिला बक्टीरियाही त्यात येतो. [लिन मार्गुलिसच्या ‘सिंबायॉटिक प्लॅनेट’ (बेसिक बुक्स, 1998) च्या पुस्तकाच्या उपोद्घातातून]

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग २)

संख्यांची लेखनपद्धती 0, शून्याची संकल्पना साकारल्याशिवाय हे शक्य होणार नव्हते. म्हणून दशक संकल्पनेनंतर ) ची संकल्पना सुचणे हा गणिताच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पण मोठ्या संख्या लिहिता येण्यासाठी आणखी एका संबोधाचे आकलन होणे आवश्यक होय. लिहिताना आपण कागदाच्या पानाचा, किंवा फळ्याचा (जमिनीवरील धुळीचासुद्धा) उपयोग करतो. पानाला डावी बाजू, उजवी बाजू, तसेच खालची बाजू असते. पानावर उभी रेघै ओढल्यास रेघेच्या डावीकडे आणि उजवीकडे अशा बाजू असतात. 0 ते 9 ह्या दहा चिह्नांचा उपयोग करून दोन अंकी संख्या लिहू शकू का? दोन अंकी संख्येत किती दहा आहेत आणि (दहा पेक्षा कमी) सुटे एकक किती हे सांगता येत असल्यामुळे रेघेच्या डावीकडे दशक अंक लिहून आणि उजवीकडे (एकाच ओळीत) एकक लिहून इष्ट संख्येचा बोध होतो.

पुढे वाचा

‘आम्ही नागरिक’

शासनाच्या क्रियांमुळे व निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या हक्कांमध्ये सतत झीज होत असल्याचे आपण सारे अनुभवत आहोत. हे राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत घडत आहे. आता ही झीज थांबवून एकत्रित नागरी क्रियांमधून नागरिकांचे हक्क पुन्हा मागण्याची वेळ आली आहे. या हेतूने ‘आम्ही नागरिक’ (We, The People) या नावाने एक संस्था स्थापण्यात येत आहे

. 1) केंद्रीभूत मुद्दे : खालील बाबतीत नागरिकांच्या हक्कांचे पुनःप्रस्थापन करणे – क) कायद्याचे राज्य, नेमकेपणाने सांगायचे तर नागरिकप्रेमी कायदा, सुव्यवस्था व निराकरणाच्या यंत्रणांची मागणी करणे. ख) समन्यायी, परिणामकारक व कार्यक्षम तऱ्हेने सार्वजनिक सेवा (Public Services) लोकांपर्यंत पोचवणे.

पुढे वाचा

सर्व काही पूर्वनियत आहे काय ?

(स्टीफन हॉकिंग ह्यांचा परिचय आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याची आवश्यकता नाही. “Black Holes and Baby Universes and other Esays” ह्या पुस्तकातील “Is Everything Determined” ह्या लेखाचे भाषांतर/रूपांतर खाली आहे. हा लेख म्हणजे हॉकिंग ह्यांनी 1990 मध्ये केंब्रिज विश्वविद्यालयात दिलेले व्याख्यान आहे. हा लेख प्रकाशित करण्यास हॉकिंग ह्यांनी दिलेल्या परवानगीकरता मी त्यांचा आभारी आहे. सुधाकर देशमुख)

शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर या नाटकात कॅशियस ब्रूटसला म्हणतो “काही वेळा तरी माणूस आपल्या प्राक्तनाचा नियंता असतो.” खरोखरच आपण दैवाला आपल्या मुठीत ठेवू शकतो का? का आपण जे काही करतो ते सर्व पूर्वनियत असते?

पुढे वाचा