Category «इतर»

राष्ट्राचे आरोग्य मुलाखत

1986 मध्ये डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्याची पदवी संपादन करून भारतात परतले. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील गडचिरोलीसारख्या अति मागास भागात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ग्रामीण आणि आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याचा स्त्री-रोग-विज्ञानाच्या (gynaecological) दृष्टिकोनातून अभ्यास करायला डॉ. राणी बंग ह्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारची चिकित्सा ही त्या क्षेत्रातील नवी पायवाट तर ठरलीच पण जागतिक पातळीवरही त्यांनी केलेले काम अनन्य स्वरूपाचे मानले गेले. ह्या अभ्यासाचा आधार घेऊनच भारत सरकारने आपले जननारोग्य आणि बालकांचे आरोग्य (Reproductive and Child Health – RCH) विषयी धोरण आखले.

पुढे वाचा

शतखंडित शहरे

[शहरे टिकवावयाची असतील तर त्यासाठी शहरी प्रक्रियांकडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल. कारण या प्रक्रियांचे प्रवाही स्रोतच शहराचे स्वरूप आणि भवितव्य ठरवितात.]
स्पिरो कोस्तोफ –1992
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत विकसित पश्चिमी जगांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. त्यामागे लपलेल्या आर्थिक कारणांचा शोध पा चात्त्य अभ्यासक नानाविध प्रकारांनी घेत असतात. अमेरिकेतील रीगनचा अध्यक्षीय काळ आणि इंग्लंडमधील मार्गारेट थैचर यांची राजवट एकाच वेळी तेथील आर्थिक धोरणांना मोठेच क्रांतिकारी वळण देणारी होती. सर्वप्रथम खाजगीकरणाची हाक त्यांनी दिली आणि बघता बघता जगातील बहुसंख्य देशांत ती लाट पसरली.

पुढे वाचा

मी नास्तिक का आहे?

“वृथा अहंकार किंवा गर्वामुळे माणूस ईश्वराचे अस्तित्व कसे नाकारायला लागेल हे मला अजिबात समजू शकत नाही. एखाद्यास जर पात्रता नसताना अमाप लोकप्रियता मिळाली असेल तर तो दुसऱ्या कुणा थोर माणसाचे थोरपण नाकारू शकेल हे समजू शकते. पण मुळात आस्तिक माणूस अहंकारापोटी ईश्वराचे अस्तित्व नाकारू शकेल हे पटत नाही. असे दोनच कारणांनी घडू शकते. एकतर हा अहंकारी माणूस स्वतःस देवाचा प्रतिस्पर्धी तरी समजत असेल किंवा स्वतःसच देव मानीत असेल. पण मग त्यापैकी कोणत्याही बाबतीत तो खऱ्या अर्थाने नास्तिक असू शकत नाही. स्वतःला देवाचा प्रतिस्पर्धी मानणारा माणूस देवाचे अस्तित्व नाकारीत नसतोच.

पुढे वाचा

अनुभववादी नीतिमीमांसेवरील आक्षेपांस उत्तर

फेब्रुवारी 2003 च्या आजचा सुधारक मधील माझ्या लेखात मी अनुभववावादी नीतिमीमांसेचे विवरण आणि समर्थन केले. त्या लेखाच्या शेवटी अनुभववादाच्या टीकाकारांचे काही आक्षेप आहेत असे मी म्हणालो. त्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा आहे.
पहिला आक्षेप असा होता की नैतिक वाक्यांचे प्रमुख कार्य कर्मोपदेश आहे ही सर्वमान्य गोष्ट आहे. ती सर्व वाक्ये स्पष्टपणे किंवा व्यंजनेने, उपदेशपर, आदेशपर किंवा prescription असून आपण काय करावे हे सांगणारी आहेत. शुद्ध कथनात्मक किंवा निवेदक (indication) वाक्याप्रमाणे ती वस्तुस्थितीचे वर्णन करणारी नसतात. पण हे म्हणणे पूर्णपणे खरे नाही, कारण बहुतेक नैतिक वाक्यांना वर्णनपर अर्थही थोडाफार असतो.

पुढे वाचा

उत्क्रांतीची तोंडओळख (लेख-१)

काही दिवसांपूर्वी वाचनात आले की मानवी गर्भाला सुद्धा उचकी लागते. पुढे शास्त्रज्ञाचे मत दिले होते की ‘उचकी लागणे’ हा उत्क्रांतीचा एक टप्पा असू शकतो. त्याचा सखोल अभ्यास अजून व्हायचा आहे. वाचून मजाही वाटली अन् आ चर्यही. नंतर लक्षात आले की हे सोदाहरण सिद्ध व्हायला अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत आपण कुठे असणार?
उत्क्रांती म्हणताच नाव समोर आले, ‘डार्विन’, आणि पुढे ‘बलिष्ठ अतिजीविता’, म्हणजे Survival of the fittest! पण मुळात डार्विनने ‘बलिष्ठ अतिजीविता’ ही संज्ञा वापरलीच नव्हती. त्याचे म्हणणे होते की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राण्यांमध्ये एका विशिष्ट क्रमाने बदल होत असतात.

पुढे वाचा

महाराष्ट्राची वित्तीय स्थिती व उपाय : जागतिक बँकेचा अहवाल (उत्तरार्ध)

विकास व विषमता
अहवाल म्हणतो ते काही अंशी खरे आहे की, महाराष्ट्राच्या साधारण बरोबरीचे दरडोई उत्पन्न असणाऱ्या हरियाणा राज्याच्या तीनपट आणि पंजाब राज्याच्या पाचपट विषमता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावर असून येथे दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. राज्याचा पश्चिम आणि दक्षिण भाग अतिश्रीमंत आहे तर मध्य आणि पूर्व भाग गरीब आहे. त्याचे कारण अहवालात दिलेले नाही ते असे की पंजाब-हरियाणातील समृद्धी प्रामुख्याने सार्वत्रिक असलेल्या सिंचनामुळे व त्या आधारावर दर हेक्टरी उच्च उत्पादन– उत्पन्न यामुळे आहे. त्यामुळे समृद्धी सार्वत्रिक आहे.

पुढे वाचा

भारतीय संस्कृती व गर्भपात (उत्तरार्ध)

भारतामध्ये सुरुवातीपासून शस्त्रक्रियेवर अवलंबून राहण्याची परंपरा सुरू झाली. त्यालाही 1953 च्या सुमारास ‘bad in taste’ संबोधिले गेले तरी जगात सर्व ठिकाणी हळूहळू त्याचा वापर वाढीस लागला. येथे नोंदवावेसे वाटते की भारतात बऱ्याच भागात संतति-नियमन करण्याची आंतरिक इच्छाच नव्हती. त्यामुळे गर्भपात, शस्त्रक्रिया किंवा कोठल्याच उपलब्ध मार्गांचा आधार घेण्याची बहुजनांना तितक्या प्रमाणात जरूरी वाटली नाही. आजही बऱ्याच मोठ्या राज्यांत निम्मेएक लोक त्यापासून दूर असलेले आढळतात. ह्या उलट मुलगे हवेत, मुली नकोत ही वृत्ती मात्र भारतभर नित्यनियमाने सर्वांत आढळते.
एक काळ असा होती की मुली झाल्या तर त्यांना मारीत.

पुढे वाचा

नवमध्यमवर्गाचे राजकारण

चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली. भारतामध्ये या प्रक्रियेची गती गोगलगाईची, तर चीनमध्ये गरुडझेपेची. भारतामधील या कमी गतीची अनेक कारणे दिली जातात. येथील लोकशाहीचे अस्तित्व हेही एक कारण दिले जाते. चीनमध्ये कामगार-कपातीचे भांडवल करून कामगार नेते भांडवलदार होत नाहीत, अशा कलाने त्या विचाराची मांडणी केली जाते. खरे तर लोकशाही समाजरचनेमध्ये लोकमान्यतेच्या पायावरती आर्थिक उदारमतवादाने जास्त गतीने पुढे जायला पाहिजे होते.

पुढे वाचा

असहिष्णुतेचे दुर्लक्षित परिणाम

जवळजवळ सर्व जगात धार्मिक असहिष्णुता आणि दहशतवाद यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक विचारवंत या दोन्ही अनर्थकारक घटनांची चिकित्सा करून त्यांना प्रतिबंध कसा घालावा, याविषयी अभ्यासपूर्ण लेखन करीत असतात. या विचारवंतां-मध्ये समाजशास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, पत्रपंडित, राजकीय मुत्सद्दी, विविध धर्मांच्या अनुयायांचे नेतृत्व करणारे धुरीण, इत्यादींचा समावेश असतो. परंतु अशा विचारवंतां-मध्ये मानसोपचारतज्ज्ञ सामील झालेले क्वचितच दृष्टोत्पत्तीस येते. वस्तुतः माणसाच्या मनातील वैरभाव, द्वेष आणि चिंता यांच्यासारख्या विघातक भावनांचे उच्चाटन करून, त्याला सहनशीलतेची व परमतसहिष्णुतेची कास धरून समाजातील इतर माणसांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्यास मदत करणे, हे मानसोपचारशास्त्राचे एक उद्दिष्ट असते.

पुढे वाचा

शाळा

शिक्षणाचा विचार करायला लागले की एक कविता आठवते. मिरोस्लाव होलब नावाचा झेकोस्लोव्हाकिया देशातला एक झक्क कवी आहे. तो डॉक्टर होता. आधी पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करायचा, नंतर इम्युनॉलॉजीच्या शास्त्रात त्याने संशोधन केले. त्याच्या बऱ्याच कविता विज्ञानाशी संबंधित आहेत. ‘ऑक्सिडेशन’, ‘मायक्रोस्कोपखाली’, ‘अग्नीचा शोध’ अशी त्याच्या कवितांची नावे. शिक्षणावरच्या या त्याच्या कवितेचे नाव आहे ‘शाळा’. तिच्यामध्ये बाराव्या ओळीत थोडासा बदल करून घेऊन तिचा अनुवाद असा आहे:
एक झाड दारातून प्रवेश करतं, वाकून नमस्कार करत म्हणतं, मी झाड आहे. एक अश्रूचा काळा थेंब, (4)
आकाशातून खाली पडतो अन् म्हणतो, मी पक्षी आहे.

पुढे वाचा