Category «इतर»

नीतीची भाषा

आपला जागेपणीचा सर्व काळ भाषेचा उपयोग करण्यात व्यतीत होतो. आपण दररोज शेकडो, नव्हे हजारो, वाक्ये सहजपणे उच्चारतो. त्यांपैकी काही वाक्ये श्रोत्याला/ना काही माहिती देण्याकरिता असतात. काही आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण वापरतो, तर काही नको असलेली गोष्ट दूर करण्याकरिता. एखादे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, ते उच्चारणाऱ्या व्यक्तीचा ते उच्चारण्याचा उद्देश काय आहे, इत्यादि गोष्टी आपल्याला वाक्याच्या रचनेवरून कळतात. उदा. केवळ माहिती देणे एवढाच हेतू असलेल्या वाक्यरचनेला indicative (कथनात्मक, वर्णनपर) रचना म्हणतात. एखादी गोष्ट करवून घेण्याकरिता वापरलेल्या रचनेला आज्ञार्थी किंवा विज्ञाप-नार्थी रचना म्हणतात.

पुढे वाचा

जाहिरातबाजीचे संकट

जपानमध्ये तुमचा स्वतःचा उद्योग होता, इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ. तुमच्या उत्पादनांमध्ये दोष दाखवायला जागा नव्हती. मग तुमच्या देशावर एक खोटेपणाची लाट येऊन आदळली, व्यापार म्हणजे व्यापारच आणि इमानदारी म्हणजे फक्त एक चांगले धोरण, असे मानणाऱ्या प्रदेशातून ही लाट आली. शहरी क्षेत्रे काबीज करून आता इमानदारीने मेहेनत करणाऱ्या क्षेत्रावर हल्ला करणाऱ्या खोट्या आणि अतिशयोक्त जाहिरातींकडे स्वागत करणाऱ्या गिरिशिखरांवरही आता हल्ला होतो आहे. आपल्या कुरूप आणि रानवट सजावटींमधून घेणारा हा वाणिज्यवाद सर्व मानवजातीवर महा-अरिष्ट आणतो आहे, कारण कौशल्यावर तो ताकदीचे ‘आदर्श’ कलम करतो आहे.

पुढे वाचा

विवेकवाद Reason आणि श्रद्धा

विवेकवादाचा अर्थ, गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे कदाचित त्याचा प्रधान अर्थ, कोणतेही विधान निर्णायक पुराव्यावाचून खरे न मानणे, आणि पुराव्याच्या प्रमाणात त्याच्यावर वि वास ठेवणे; निर्णायक पुरावा असेल तर विधान पूर्णपणे स्वीकारणे आणि नसेल तर जो पुरावा असेल त्याच्या प्रमाणात स्वीकारणे. अनेक वाचकांच्या दृष्टीने हे म्हणणे बरोबर नाही; ते म्हणतील की विधान स्वीकारण्याची ही अट अवश्य विधाने सोडल्यास इतर कोणत्याही विधानाचा पुरावा निर्णायक असू शकत नाही. परलोक, ईश्वर, मरणोत्तर अस्तित्व इत्यादि विषयांचा पुरावा देण्यासारखा नसतो, ती विधाने आपण श्रद्धेने स्वीकारतो.

पण हा आक्षेप घेणाऱ्या लोकांना विवेकवादाचा अर्थ समजलाच नाही असे म्हणणे भाग आहे.

पुढे वाचा

(पुरुषकार्याची चढती शिडी)

“पुरुष हा शेवटी पुरुष आहे आणि स्त्री ही स्त्रीच आहे. मग ते कितीही शिकोत, काहीही करोत.” “स्त्रिय चरित्रं पुरुषस्य भाग्यं, देवो न जानाति कुतो मनुष्यः””लिंगभेद सोडला तर बाकी सर्व बाबतीत स्त्रिया का नाही पुरुषांची बरोबरी करू शकणार?””स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता
असते, आणि पुरुष? पुरुष अनंतकाळचा प्रियकर आणि क्षणाचाच पिता असतो?” “Men are from Mars & Women are from Venus.”
प्रत्येकजण म्हणतो, स्त्री आणि पुरुष यांचे वागणे जन्मजातच वेगळे असते. ते का वेगळे असते आणि कोणकोणत्या बाबतींत वेगळे असते हे मात्र नीटपणे कुणी सांगू शकत नाही.

पुढे वाचा

नवधर्मस्थापनेतून सामाजिक पुनर्रचना होऊ शकेल?

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह.साळुखे यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने नव्या धर्माची स्थापना करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असल्याची बातमी वर्तमानपत्रांतून काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाली आणि त्यावर उलटसुलट चर्चाही तेव्हापासून सुरू आहे. हे कार्य तसे प्रचंड मोठे आणि आव्हानात्मक आहे. धर्माचे तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान, पूजापद्धती वगैरे कृतिरूप अभिव्यक्ती आणि रीतिरिवाज, दंडक, नीतितत्त्वे, यमनियम, आदर्श, मर्यादा, सामाजिक संबंध वगैरेच्या स्वरूपातील समाजनियमनात्मक प्रणाली–अशा तिन्ही बाजूंनी उभारणी धर्मस्थापनेसाठी आवश्यक असते. डॉ. साळुखे यांचा अधिकार आणि अनुभव ध्यानात घेता ते एकटाकी पद्धतीनेही हे आव्हान पेलू शकतील याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

पुढे वाचा

हिंदूंचे हित कशात आहे?

आपल्या देशात गेल्या तीन दशकांत अल्पसंख्य समाजाविरुद्ध योजनाबद्ध हत्याकांड सातत्याने होत आहे. ७० च्या दशकात भिवंडीला, ८० च्या दशकात दिल्लीला, ९० च्या दशकात मुंबईला आणि २००० च्या दशकात गुजराथमध्ये. प्रत्येक नियोजित हत्याकांडात पूर्वीच्या दशकातल्या हत्याकांडापेक्षा जास्त अमानुषता आणि संघटित क्रौर्य झाले. गुजरातमधल्या हत्याकांडात हिडीसपणा, बीभत्सपणा यांचा उच्चांक झाला. त्यातल्या अमानुषतेच्या कहाण्या नाझी अत्याचारांनाही लाजवणाऱ्या आहेत. मुख्यतः हे अत्याचार स्त्रियांवर झाले. २७ फेब्रुवारीला गोध्रा येथे रेल्वेच्या एका डब्याला आग लावून ७८ हिंदू प्रवाशांना जिवंत जाळून मारण्यात आले होते. तीही घटना दुर्दैवी आणि अमानुष होती.

पुढे वाचा

भारतीय संस्कृती व स्टेम सेल्स

भारतीय संस्कृती आणि स्टेम सेल्स या सकृद्दर्शनी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी शीर्षकात एकत्र गुंफल्या आहेत. “ वा, युवा, मघवा” प्रमाणेच हे वाटेल, पण मी काही ‘पाणिनी’ असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे या दोन्हीमधील ‘अ-व्याकरणीय’ संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी मी अर्थातच स्वीकारतो. पण त्यापूर्वी या दोन्ही गोष्टींच्या मला अभिप्रेत असलेल्या व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करणे योग्य ठरेल.

भारतीय संस्कृती :– माणूस या जगात कसा वागतो, कसा बोलतो, कसा विचार करतो याला एकत्रितपणे मानवी वर्तणूक किंवा वागणूक (Human Behaviour) असे म्हणतात. मानवी वर्तणूक ही दोनच गोष्टींवर अवलंबून असते.

पुढे वाचा

पावसानंतरचे ऊन

माणसाच्या मुलावर जन्मतःच धर्म लादला जातो, ही व्यथित करणारी घटना आहे. प्राण्यांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांना धर्म नसतो; निसर्गदत्त असा फक्त ‘स्वधर्म’ असतो. जगणे—-मैथुन आणि मृत्यू या जीवनचक्राबाहेर त्यांचे जीवन युगानुयुगे गेलेले नाही. प्राण्यांना नाही अशी एक महान गोष्ट माणसाला प्राप्त झाली आहे. ती म्हणजे विकसित आणि विकसित होणारा मेंदू. या मेंदूच्या जोरावर माणसाने मोठे भौतिक कर्तृत्व दाखविले आहे. तसेच अफाट कल्पनाशक्तीचेही वि व निर्माण केले आहे. विविध कलांचे नि साहित्याचे, मानवी जीवनातील दालन हे याचेच प्रगल्भ द्योतक आहे. ‘देवा’ची संकल्पना ही अशीच एक मानवाच्या उत्तुंग कल्पनाशक्तीतून साकार झालेली साहित्यिक संकल्पना आहे.

पुढे वाचा

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि जगाच्या कोपऱ्यातील एक शेतकरी

हॅना अंजेरीला जागतिक व्यापारातील खाचाखोचा माहीत नाहीत, पण ती ज्याला ‘फ्री मार्केटिंग’ म्हणते अशा खुल्या बाजारपेठेची ताकद ती ओळखून आहे. माझ्या घराशेजारच्या पेट्रोल पंपाजवळ ही पंचेचाळीस वर्षांची नैरोबिअन महिला भाज्या विकते. रोज सकाळी आपल्या बारक्याशा मळ्यातून ती थोडे टमॅटो, कांदे, शेंगा वगैरे गोळा करते आणि दिवसभर पेट्रोल घेणाऱ्यांना ते विकते. नफा जेमतेमच असतो, पण त्या थोड्याशा डॉलरांचा उपयोग ती आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी करते. तिला स्वतःचे भाजीचे दुकान उघडायचे आहे, पण भांडवलाची अडचण आहे. मटार सोलत बसलेल्या मैत्रिणीकडे पाहत हॅना म्हणते, “स्पर्धा फार आहे.

पुढे वाचा

दुष्टचक्र

दुष्टचक्र बदलाची स्पष्टता नाही म्हणून उभारी नाही, उभारी नाही म्हणून शिस्त नाही, आणि शिस्त नाही म्हणून बदलाची शक्यता आणखी लांब गेली, असं दुष्टचक्र आहे, आणि ते सगळ्याच बाबतीत आहे. शिक्षणाच्या बाबतीत आहे, रोजगाराच्या बाबतीत आहे, वस्तीतल्या सुविधा मिळवण्याच्या बाबतीत आहे. राजकीय शिस्तीशिवाय उभारी फक्त नेत्यांनाच (स्थानिकही); बाकी जनता ‘गरीब बिचारी कुणी हाका’ अशीच.
दुसरं एक वाटतं. इतिहासाचं ओझं अजूनही वागवणाऱ्या या समाजाला ‘अमुक काम करायला घाण वाटते. त्यामुळे यातून बाहेर पडायला पाहिजे’ अशी ऊर्मी वाटत नाही. श्रमाचं महत्त्व मलाही पटतं, पण एकाच प्रकारचे श्रम एकाच समाजाला सतत करावे लागताना पाहिलं की हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पुढे वाचा