आजचा सुधारकच्या जून ९९ (१०.३) ह्या अंकामध्ये माझे ‘मराठी भाषाप्रेमींना अनावृत पत्र’ प्रकाशित झाले. त्यावर बरीच उत्तरे आली. त्यांपैकी काही सप्टेंबर ९९ अंकामध्ये प्रसिद्ध झाली. काहींनी ऑगस्टअखेरपर्यंत उत्तर लिहून पाठवितो असे आश्वासन दिले होते पण ती उत्तरे सप्टेंबरअखेरपर्यंत, अजून, आलेली नाहीत, आणि आता येण्याची शक्यताही नाही, म्हणून ह्या चर्चेचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. शिवाय आता संपादक बदलले असल्यामुळे हा विषय लवकर आटोपता घेतलेला बरा.
हस्ताक्षर चांगले काढावे हा विवादाचा विषय नाही – पण शुद्धलेखन हा विवादाचा विषय झालेला आहे ह्याची कारणे पुष्कळ आहेत.