विषय «भाषा»

गुणाकाराची बेरीज – वजाबाकी

लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.

पुढे वाचा

मराठीला वाचवायचे? आणि ते का बरे?

‘मराठी भाषेला वाचवा!’ अशा प्रकारची हाकाटी हल्ली केली जात आहे. या हाकाटीतले आवाहन जसे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय नेतृत्वाला केलेले असते तसेच ते थेट लोकांनाही केलेले असते. त्यापुढे जाऊन, मराठी भाषा कशी वाचवायची याबद्दल लोकजागृती करणे, काही धोरण स्वीकारणे, आणि निरनिराळे नियम बांधणे अशाप्रकारचे कार्यक्रम आखले जातात. मराठी भाषा कशापासून वाचवायची याही प्रश्नाची विविध उत्तरे दिली जातात—इंग्रजीच्या किंवा हिंदीच्या आक्रमणापासून वाचवायची, अरबी-फार्सीच्या प्रभावापासून भाषा शुद्ध करायची, अगदी संस्कृत भाषेच्या अतिरेकी प्रभावापासून तिला वाचवायची अशी काही उत्तरे मिळत असतात. मराठी-भाषकांना कोणत्या न्यूनगंडाने पछाडले आहे याची चिंता केली जाते.

पुढे वाचा

‘मराठी’ ची चर्चा आणखी एकदा; पुन्हा पुन्हा

एक वांद्रे कॉलनी,’ म्हणून कंडक्टरना तिकीट मागितले की ते आणि अन्य सहप्रवाशीही चमत्कारिकपणे आपल्याकडे पाहताहेत असे वाटते. ‘हे घ्या बांद्रा कॉलनी’ म्हणत कंडक्टर मला दुरुस्त करतात. कोणीतरी ‘बँड्रा’ उच्चारुनही तिकीट मागतात. ते मात्र तितकेसे त्यांना चमत्कारिक वाटताना दिसत नाही. गंमत म्हणजे बसचा फलक ‘वांद्रे वसाहत’ असताना हे चालत असते. मी फक्त ‘वांद्रे’ म्हणत असतो. ‘वसाहत’ म्हणत नाही. ‘कॉलनी’ असेच म्हणतो. कंडक्टरना ‘कंडक्टर’ किंवा ‘मास्तर’ म्हणतो. ‘वाहक’ म्हणत नाही. ड्रायव्हरना तर ‘चालक’ म्हणण्याची मला हिंमतच होत नाही.
तरीही माझा हा किमान मराठीचा आग्रह जवळच्यांना जास्तीचा वाटतो.

पुढे वाचा