विषय «विवेकवाद»

चैतन्याचा प्रश्न

Culver City मधील This Is Not a Café.
संध्याकाळची वेळ. मोठ्या काचांपलीकडे रस्त्यावर रहदारी संथपणे सरकताना.
आत कॉफी मशीनची घरघर, आणि तीन जण एका कोपऱ्यातल्या टेबलवर.

सोमणे – समोर गरम मद्रास फिल्टर कॉफी.
कासवे – डबल एस्प्रेसो.
खेकडे – ओट मिल्क कॅपुचिनोवरच्या फेसात बोटे फिरवत.

सोमणे (फिल्टर कॉफीचा सुगंध नाकात शिरू देत, मग खिडकीकडे पाहत, नंतर कासवेकडे वळून) : कासवे, एक गोष्ट मी खूप दिवसांपासून पाहतोय. तुमच्या त्या तर्कवादी चर्चा, पेपर्स, मॉडेल्स, छान आहेत, पण त्यातचैतन्याला कुठे जागा आहे?

पुढे वाचा

जिज्ञासा म्हणजे नेमके काय?

जिज्ञासा ही मानवी मेंदूची सर्वांत मूलभूत, परंतु अत्यंत गुंतागुंतीची आणि उत्क्रांतीदृष्ट्या अत्यावश्यक अशी प्रवृत्ती मानली जाते. माणूस हा केवळ जगण्यासाठी लढणारा प्राणी नाही तर स्वतःला आणि विश्वाला समजून घेण्यासाठी सतत धडपडणारा जीव आहे. ‘जिज्ञासा’ ह्या शब्दाचा अर्थ जरी भाषिक पातळीवर जिद्द, ज्ञान आणि साहस ह्यांची एकत्रित अभिव्यक्ति वाटत असला, तरी मेंदूविज्ञान, संज्ञानशास्त्र, उत्क्रांतिविज्ञान आणि मानसशास्त्र ह्यांच्या चौकटीतून पाहिल्यास ती एक बहुआयामी, जैविक, सामाजिक, आणि सांस्कृतिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा मेंदूच्या रचनेशी, माहितीप्रक्रियेशी, बक्षीसप्रणालीशी आणि जगण्याच्या रणनीतीशी घनिष्ठपणे जोडलेली आहे. जरी व्युत्पत्तीशास्त्रीयदृष्ट्या हा शब्द जिज्ञा (ज्ञात करू इच्छितो) ह्या धातूपासून निर्माण झाला असला, तरी त्यात जिद्दीचा आग्रह, ज्ञानाची भूक आणि साहसाची तयारी हे तीनही भावार्थ अंतर्भूत होतात.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादातील प्रामाण्याचे निकष

नवभारत मासिकाच्या नोव्हेंबर १९८२ च्या अंकात प्रा. मे.पुं. रेगे ह्यांचा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा लेख प्रकाशित झाला होता. प्रस्तुत अंकासाठी ह्या लेखावरील प्रतिवाद आला तेव्हा, मूळ लेखही सोबतच पुनर्प्रकाशित करावा असे वाटले. असे केल्याने वाचकांची मूळ विचारांशी ओळख होईल आणि ह्या प्रतिवादातील संदर्भदेखील लक्षात येतील.


सर्वप्रथम rationalism ह्या शब्दाने ज्या दोन उपपत्ती संबोधल्या जातात त्याबद्दल लिहिणे इथे संयुक्तिक ठरेल. मनुष्याला इंद्रियांद्वारे झालेले अनुभव फसवे असू शकतात. रात्रीच्यावेळी अंधुक प्रकाशात एखादी दोरीदेखील साप वाटू शकते. अशावेळी इंद्रियांद्वारे होणाऱ्या अनुभवाने तयार झालेल्या ज्ञानावर शंका उपस्थित करणे उचित ठरते.

पुढे वाचा

ब्राइट्स सोसायटीतर्फे आयोजित नास्तिक परिषद – २०२५

सेवाग्राम, वर्धा येथे १४ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ब्राइट्स सोसायटीने नास्तिक परिषद आयोजित केली होती. ह्या तीन दिवसीय निवासी परिषदेत देशभरातून सुमारे ३०० जण सहभागी झाले होते. परिषदेत सहभागी झालेल्यांपैकी काहींच्या प्रतिक्रिया प्रकाशित करीत आहोत 

ब्राइट सोसायटीविषयी

समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, समाज व बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक ह्यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी, तसेच कला, विज्ञान–तंत्रज्ञान, उद्योग, समाजसेवा, राजकारण, आदि विविध क्षेत्रांतील नास्तिकांचे योगदान गौरविण्यासाठी ब्राइट्स सोसायटी २०१४ पासून प्रयत्नरत आहे. ब्राइट्स सोसायटीने नास्तिक्य विषयावर चित्रस्पर्धा व चित्रप्रदर्शनी भरवली, तसेच बुद्धिप्रामाण्य, तर्कशीलता ह्या विषयांवरील तीन पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत.

पुढे वाचा

आजचा चार्वाक

चार्वाकाविषयी आजच्या अनेक माणसांना विशेष आकर्षण का वाटते? ह्याचे सरळ उत्तर असे की तो निखळपणे जडवादी होता. ‘निखळपणे ’ असे म्हणायचे कारण असे की इतर काही भारतीय दर्शनेही जडवादाकडे झुकणारी आहेत. उदाहरणार्थ, वैशेषिक दर्शन. जे काही आहे ते सर्व परमाणूंचे बनलेले आहे, असे ते मानते, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पण प्रारंभी जरी ते ईश्वर मानीत नव्हते असे समजायला जागा आहे, तरी पुढे त्याने ईश्वराला सामावून घेतले. शिवाय ते कर्मसिद्धांतही स्वीकारते. म्हणजे व्यक्तींच्या कर्मानुसार त्यांना सुखदुःखरूप फळे भोगावी लागतात असे ते मानते.

पुढे वाचा

सुखाचा शोध

सुखाच्या मागे मागे आपण धावत रहावे का?
कदाचित हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा वाटेल. परंतु सुखी माणसाचा सदरा सापडणे व वाळवंटातील मृगजळ पकडणे दोन्ही सारखेच ठरतील. सुखाचा शोध घेण्याचा मार्ग फारच खडतर आहे याची जाणीव बहुतेकांना आहे व या मार्गावरील खड्ड्यात पडणार्‍यांची, टक्के टोणपे सहन करत राहणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नाही. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात परमसुख मिळणार आहे या आशेने आपण मार्गक्रमणातील दु:ख, वेदना, त्रास, विसरून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. भरपूर पगाराची नोकरी, मुबलक (अतिरिक्त!) पैसा (disposable income), प्रशस्त घरात वास्तव्य, आवडत्या संगातीबरोबरचे कौटुंबिक सौख्य, आरोग्यमय जीवन, इत्यादीत अडकून घेतल्यामुळे आयुष्यात या व्यतिरिक्त काही गोष्टी असू शकतात, त्यातूनही मानसिक समाधान मिळू शकते, हे आपण विसरत आहोत.

पुढे वाचा

सुखाची बहुआयामी संकल्पना आणि भारतीय दृष्टिकोन

भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत एक अत्यंत मानवी असा आशीर्वाद वारंवार उच्चारला जातो “सर्वेऽपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः”. याचा सरळ अर्थ असा की सर्व लोक सुखी व्हावेत, सर्व लोक निरोगी राहावेत. प्राचीन ऋषींच्या चिंतनातून उमटलेली ही भावना इतकी वैश्विक होती की तिच्यात कोणत्याही जाती, धर्म, वर्ण, राष्ट्र यांचे बंधन नव्हते. ही भावना म्हणजे भारतीय विचारसरणीच्या सार्वत्रिक मानवी दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहे. मानवी जीवनाचा ध्यास केवळ मोक्ष, परलोक, आत्मसाक्षात्कार एवढ्यावर मर्यादित नसून, प्रत्यक्ष जगात लोकांनी सुखाने जगावे, ही देखील ह्या विचारांच्या मुळाशी असलेली आकांक्षा होती.

पुढे वाचा

सांगली नास्तिक परिषद – का? व कशासाठी? 

ब्राईट्स सोसायटीतर्फे गेली १० वर्षे आपण अनेक उपक्रम राबवतो आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राईट्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून ब्राईट्स सोसायटीने सभा, नास्तिक संमेलने, भाषणे, चर्चासत्रे आणि चर्चा आयोजित केल्या आहेत. या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. निमंत्रित वक्त्यांमध्ये समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखक, संपादक, स्तंभलेखक, कायदेतज्ज्ञ, राजकारणी, अभ्यासक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा समावेश होतो. ब्राईट्स सोसायटीने मराठीत एक पुस्तकही प्रकाशित केलेले आहे.

पुढे वाचा

कुचंबणा होत असेल तर त्यातून बाहेर काढणे हे उद्दिष्ट

आपल्या ब्राईट्स संस्थेच्या उद्दिष्टांचा जो छापील, कायदेशीर असा एक कागद माझ्याकडे आहे, त्याच्यात साधारण दहा बारा उद्दिष्टं लिहिलेली आहेत. त्यातलं एक मुख्य उद्दिष्ट आहे की, आपण ज्या समाजात राहतो तिथे काहीतरी लोकशिक्षण आपण केलं पाहिजे. २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्यावेळेला विचारांची जी एक घुसळण झाली त्या घुसळणीतून ब्राईट्स संस्थेची स्थापना झाली. आज त्याला दहा वर्षं झाली. त्यावेळी एक उद्दिष्ट असंही होतं की, कुठल्याही नास्तिक माणसाला मी “नास्तिक” आहे याची लाज न बाळगता सांगता आलं पाहिजे. 

खूप वर्षांपूर्वी मी एक सर्व्हे घेतला होता.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्ष नहीं, हमें धर्मविहिन बनना है

मेरी सबसे जो अच्छी पहचान करवानी है, वो फिल्म में ही हुई है। फिल्म वालों को मुझसे शायद कुछ दुश्मनी है, इसलिए वो लोग हमेशा फिल्मों में मेरी पोल-खोल करते रहते हैं। Gandhi my father नाम की एक फिल्म आयी थी, जो मेरे दोस्त फिरोज अब्बास खान ने बनाई थी। बापू और उनके बड़े बेटे हरिलाल के बीच में जो संघर्ष हुआ था उसपर वो फिल्म बनी थी। उसके एक सीन में अक्षय खन्ना जिसने हरिलाल का पात्र निभाया था, वो दारू के नशे में धूत रात को अपने मोहल्ले में पहुँचता है। जिन्दगी भर सब लोगों की फटकारे पड़ती रहने के कारण वो उब चुका होता है और उस सीन में वो बहुत डिस्टर्ब्ड होकर, एक्साइट होकर रात के अंधेरे में शोर मचाता है। एक डाइलोग उसमें लिखा था, “हां, मैं गांधी की बिगडी हुई संतान हूं।” फिरोज अब्बास खान ने रिलीज के पहले मुझे बुलाया की, “आकर देख लो ये फिल्म ठीक लगती है या नहीं?”

पुढे वाचा