ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, भारत-चीन यांसारख्या प्राचीन व आपल्या चाकोरीत शतकानुशतके चालत असलेल्या संस्कृतींना त्या चाकोरीतून काढून, एका अनोळखी व बिकट मार्गाला लावले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षण-संस्थात अतोनात महत्व आलेले आहे. या शाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मुलांनी (व मुलींनीसुद्धा) विज्ञानशाखेला जावे ही पालकांचीही महत्त्वाकांक्षा असते. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात, हे असते.
विषय «श्रद्धा-अंधश्रद्धा»
भोंदू ‘भगवान’, भोळे भक्त!
‘त्यांच्या’ चेहऱ्यावर एक निरागस बाल्य विलसत असते. डोळ्यांत मायेचा अपार सागर दडलेला दिसतो. त्यांनी हात उचलताच तेजस्वी प्रकाशकिरणांनी आसमंत उजळून निघाल्याचा भास होतो आणि त्यांच्या हास्यातून प्रेमाचे झरे ओसंडू लागतात. तोच विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे असे भासू लागते. त्याच्या चमत्कारांनी असंख्य आजार बरे होतात, त्याच्या कृपाप्रसादाने निपुत्रिकांना संतानप्राप्ती होते, निर्धनांना धनलाभ होतो. भौतिक समस्यांचे सारे डोंगर भुईसपाट होतात. त्याच्या दैवी शक्तीचा सर्वत्र बोलबाला सुरू होतो आणि संसारतापाने पोळलेल्यांची त्यांच्या दारी मुक्तीसाठी रीघ लागते. त्यांचा एक कृपाकटाक्ष व्हावा, यासाठी ताटकळण्याचीही त्यांची तयारी असते.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
अंधश्रद्धानिर्मूलनाचे वाटसरू श्री. नरेन्द्र दाभोलकर ह्यांची हत्या झाली. तेव्हापासून ह्या विषयावर बरीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ह्यानिमित्ताने, श्रद्धा काय आहे. अंधश्रद्धा कशाला म्हणायचे, हे समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या व चिंतनास प्रवृत्त करणाऱ्या विनोबांच्या विचारपुष्पांना मी त्यांच्याच भाषेत आपल्यापुढे ठेवीत आहे –
१) श्रद्धा आणि बुद्धी * श्रद्धा आणि बुद्धी यां ध्ये फरक जरूर आहे, परंतु विरोध मात्र मुळीच नाही. बुद्धीचे उगमस्थान विचारशक्ती आहे, तर श्रद्धेचे उगमस्थान प्राण-शक्ती आहे. * बुद्धीचे काम आहे ज्ञान सांगणे, श्रद्धेचे काम त्या ज्ञानावर स्थिर करणे आहे.
स्त्रिया आणि अंधश्रद्धा-निर्मूलन
तिमिरातून तेजाकडे : समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे या पुस्तकाची पहिली आवृत्ती एप्रिल २०१० ला प्रकाशित झाली. त्यातील एका प्रकरणात ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय डॉ. दाभोलकरांनी सविस्तर मांडला आहे. हा विषय डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता कारण स्त्रिया त्यांच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीमुळे, गुदमरून टाकणाऱ्या वातावरणामुळे अंधश्रद्धांना जास्त सहजपणे बळी पडतात; एवढेच नव्हे तर अंधश्रद्धेचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात; कित्येक वेळा त्या पार पाडीत असलेल्या पूजाअर्चा, कर्मकाण्डे निरर्थक आहेत, वेळ-पैसा-मेहनत यांचा अपव्यय त्यामध्ये होतो हे पटूनसुद्धा त्यांना यातून बाहेर पडता येत नाही.
विचार तर कराल
डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणपणे १९९४-९५ च्या दरम्यान झाला. आम्ही सारे त्यांना डॉ. दाभोलकर वा नुसते डॉक्टर म्हणत असू पण त्यांच्या पुस्तकांवर दाभोलकर असे लिहिले जाते. त्यावेळी वास्तुशास्त्रावर दादरला एक सभा होती. एक वास्तुशास्त्रावर बोलणारे वकील, एक प्रतिवाद करणारे आर्किटेक्ट, दाभोलकर आणि अध्यक्ष एक निवृत्त न्यायमूर्ती अशी ती सभा होती. दाभोलकरांचे भाषण विनोदी आणि वास्तुशास्त्राची खिल्ली उडवणारे होते. मुद्दे इतके बिनतोड होते की प्रतिवाद करण्याची संधी मिळूनही वकील महाशयांना फारसे काही बोलता आले नाही.
ह्याच दरम्यान माझा ‘आजचा सुधारक’शी परिचय झाला.
समज – गैरसमज
‘महाराष्ट्र’ नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतअधिनियम’ असा या विधेयकाचा मथळा आहे पण सोयीसाठी आपण ‘जादूटोणा विरोधी कायदा’ असा या विधेयकाचा उल्लेख करू. इ.स.२००५ मध्ये हे विधेयक विधिमंडळात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हापासून अनेक प्रकारचे आक्षेप घेण्यात आले. गेल्या ८ वर्षात निर्माण झालेल्या वा हितसंबंधीयांनी मुद्दाम निर्माण केलेल्या पसरवलेल्या समजासंबंधी अचूक वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहचवणे नितांत गरजेचे आहे. आजवर विधिमंडळपरिसरात विरोध करणाऱ्या पत्रकां धून, भाषणां धून वा प्रामाणिक धार्मिक माणसांनी उपस्थित केलेल्यापैकी काही प्रश्नांची निवड केली आहे.
जादूटोणाविरोधी अध्यादेश (मूळ पाठ)
सन २०१३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१४ अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या किंवा अद्भुत शक्तीच्या किंवा भूतपिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती व सामाजिक जाणीव निर्माण करण्याकरिता तसेच समाजात निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अध्यादेश.
आमचा देवा-धर्माला विरोध नाही – अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती
का हो तुम्ही देवाच्या धर्माच्या का विरुद्ध आहात? अंधश्रद्धांच्या नावाखाली तुम्ही देवाविषयीची श्रद्धा व आमचा धर्मच उखडवायला निघाला आहात का? तुम्ही समाजातील देव, धर्म घालवून सारी अनीती माजवणार आहात काय? असे प्रश्न १९८२ पासून सातत्याने आम्हाला विचारले जात आहेत. कधी केवळ कुतूहलाने तर अनेकदा गर्भित धमकीसह, कधी व्यक्तिगत पातळीवर असे प्रश्न विचारले जातात. कधी धार्मिक संघटनांर्फत विचारले जातात. प्रश्न कसाही विचारला जावो, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी या प्रश्नाचे एक अतूट नाते निर्माण झाले एवढे मात्र खरे. का हो, तुम्ही तर देव-धर्म यांना मुळीच हात लावत नाही.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
धर्माचा पाया श्रद्धा आहे हे खुद्द धार्मिकच मान्य करतात. फक्त त्याचे म्हणे असे असते की ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे, डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही तिच्या सत्यत्वावरील अढळ विशास.
धर्मावरील श्रद्धा याच जातीची आहे. ईशर, पापपुण्य, स्वर्गनरक, परलोक, पुनर्जन्म, इत्यादि कोणत्याही गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींची साधक प्रमाणे देण्याचे असंख्य प्रयत्न मी-मी म्हणणाऱ्यांकडून आजवर केले गेले आहेत. परंतु त्यांपैकी एकही अंशतः देखील निर्णायक नाही हे असंख्य वेळा दाखवून झाले आहे.
माझे आध्यात्मिक आकलन
दोन महिन्यापूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. असे असतानाही हा विषय घेतला होता याचे कारण होते. एकतर धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न चालू होता. महाराष्ट्रात व दिल्लीतही त्याच मंडळींच्या हातात सत्ता होती.